शेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय फायदेशीर
संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा निर्णय घेत शंतनू चंद्रशेखर महल्ले यांने धाडसी पाऊल उचलले आहे. केवळ शेंगा विक्रीवरच न थांबता शेवगा पानापासून पावडरनिर्मितीचा ध्यास घेतला आहे. त्यासाठी कंपनी स्थापन केली असून, आकर्षक पॅकिंगसह निर्यातीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मूळचे रामगाव येथील रहिवासी असलेल्या महल्ले कुटुंबीयांची लोही (जि. यवतमाळ) शिवारात २० एकर शेती आहे. गेल्या १० वर्षांपासून महल्ले कुटुंबीय पारंपरिक पद्धतीने सोयाबीन, तूर आदी पिके घेत. मात्र, त्यातून समाधानकारक उत्पादन मिळत नव्हते. पॉलीटेक्निक पदविका पूर्ण केल्यानंतर शंतनू चंद्रशेखर महल्ले याने शेतीमध्ये लक्ष घातले. यावर मार्ग काढण्यासाठी शंतनूने इंटरनेटवर विविध पिकांचा तुलनात्मक अभ्यास सुरू केला. त्यातून शेवगा पिकाविषयी माहिती मिळाली. कमी पाण्यामध्ये वाढीसह औषधी गुणधर्मांसाठी उपयुक्त असलेल्या शेवग्याची संपूर्ण वीस एकर क्षेत्रामध्ये लागवड करण्याचा धाडसी निर्णय घेतला. सप्टेंबर २०१८ मध्ये १२ फूट बाय ५ फूट अंतरावर १०,५०० रोपांची लागवड केली. प्रतिरोप १३ रुपये खर्च आला.
हा खर्च असा वसूल होईल
शेवगा पानांची पावडरनिर्मिती शेवगा शेंगाइतकीच त्याची पानेही पोषक घटकांनी परिपूर्ण असल्याने जागतिकस्तरावर चांगली मागणी असल्याचे शंतनूला समजले. शेवगा पानांची पावडरनिर्मिती आणि विक्री या व्यवसायात उतरण्याचा निर्णय शंतनू याने घेतला. त्याने आई रोहिणी यांच्यासह ओनली मी सुपर फुडस या नावाने प्रोप्रायटरी फर्म स्थापन केली. त्याची कंपनी ॲक्टअंतर्गत नोंदणी केली असून, रोहिणी महल्ले या व्यवस्थापकीय संचालक आहेत. पावडरनिर्मिती व विक्री ः
शंतनु महल्ले, ९१७५३२२०१०
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.