एमएलएम कंपन्या आणि आर्थिक साक्षरता

Amway या प्रसिध्द एमएलएम कंपनीवर भारतातील ‘ईडी'ने काही दिवसांपूर्वी कारवाई करत कंपनीच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तांवर टाच आणली.
ED
EDagrowon
Published on
Updated on

भारतात साडे तीन हजाराहून जास्त मल्टिलेयर्ड मार्केटिंग कंपन्या (एमएलएम)(MLM) आहेत.(जिज्ञासूंनी सुचेता दलाल यांच्या moneylife मधील लेख वाचावा. ) Amway या प्रसिध्द एमएलएम कंपनीवर भारतातील ‘ईडी'ने काही दिवसांपूर्वी कारवाई करत कंपनीच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तांवर टाच आणली. २०२२ सालात Amway ने अंदाजे २८ हजार कोटी रुपयांचा धंदा केला आणि सर्व वितरकांनी मिळून ७,५०० कोटी रुपयांचे कमिशन कमावले. १९९६ साली फक्त २१ कोटी रुपये भांगभांडवल घालणाऱ्या या कंपनीने गेल्या २५ वर्षांत एकूण लाभांश, रॉयल्टी (Royalty)आणि इतर सेवांसाठी २,८६० कोटी रुपयांचे परकीय चलन बाहेर पाठवले. यात कळीचा मुद्दा आहेः ग्राहकांना थेट वस्तुमाल पोचवणाऱ्या कंपन्या आणि मल्टिलेयर्ड(Multilayered) कंपन्या यांतील फरकाचा.

एमएलएम कंपनीमध्ये एक पिरॅमिड तयार केला जातो. खालच्या पायरीवर अधिकाधिक लोकांना सामावून घेतले जाते. खालच्या पायरीवरील लोकांनी केलेल्या विक्रीतून काही हिस्सा वरच्या पायरीवरील आधीच्या एजन्टांना मिळत जातो. पिरॅमिड फुगत राहतो. अधिक कमिशन मिळावे म्हणून वस्तुमालाचे भाव देखील स्पर्धक मालाच्या तुलनेत खूप जास्त ठेवले जातात, असा Amwayवर आरोप आहे.

ED
थेट शेतकऱ्यांकडून दर्जेदार हापूस खरेदी करा ः पाटील

Amway हे तथाकथित कंपनीचे नावच मुळात American Way वरून घेतले गेले आहे; पण यातून अमेरिकेला झोडपून काढण्याचा हेतू नाही,
तर एकूणच आर्थिकदृष्ट्या बव्हंशी निरक्षर असणाऱ्या भारतीय समाजाला आर्थिक साक्षर करण्याचे आव्हान अधोरेखित करण्याचे प्रयोजन आहे. PEARL, QNET सारख्या अनेक कंपन्यांनी हजारो कोटी रुपयांचा गंडा मध्यमवर्गीय/ गरीब कुटुंबाना घातला आहे. सहारा, शारदा चिटफंड आणि बचती गोळा करणाऱ्या अशा अनेक कंपन्यांनी गोळा केलेले पैशाचे आकडे बघितले तरी छाती दडपून जाते. गावोगाव, जिल्हा पातळीवर काय चालते याची गणतीच नाही.

सोशल मीडियावर, वर्तमानपत्रांतून भांडवलशाही, साटेलोटे, क्रोनिझम यावर लिहिणारे माझ्यासारखे अनेक जण आहेत. पण आमच्यासारख्याकडून नाव घेण्याजोगी एक संस्था उभी राहिली नाही, याची खंत सतत वाटत राहते. लोकजागृतीला पर्याय नाही आणि लोकजागृतीचे काम फक्त संस्थात्मक काम आहे; बाकी सारे प्रयत्न वाळूत पाणी ओतण्यासारखे आहेत. दशकानुदशके मुळे धरून भरीव काम करणाऱ्या संस्था उभ्या करू न शकणे ही एकूणच जनकेंद्री सामाजिक/ राजकीय शक्तींची दुखरी बाजू आहे. अनेक प्रश्नाची मुळे त्यात आहेत.

(लेखक प्रख्यात अर्थविश्लेषक असून टाटा समाजविज्ञान संस्थेत अध्यापन करतात.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com