थेट शेतकऱ्यांकडून दर्जेदार हापूस खरेदी करा ः पाटील

पुण्यातील मार्केट यार्डातील आंबा महोत्सवाला भेट
Mango
Mango Agrowon
Published on
Updated on

पुणे ः ‘‘कोरोनाची दोन वर्षे शेती आणि शेतकऱ्यांसाठी अडचणीची गेली. त्यानंतर या वर्षी होत असलेल्या आंबा महोत्सवातून ग्राहकांनी थेट शेतकऱ्यांकडून दर्जेदार हापूस खरेदी करावा’’, असे आवाहन पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने मार्केट यार्ड परिसरात आयोजित आंबा महोत्सवाला मंत्री पाटील यांनी शुक्रवारी (ता. २२) भेट दिली. या वेळी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक आणि पणन संचालक सुनील पवार, पणन सहसंचालक विनायक कोकरे, पुणे बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड, पणन मंडळाचे सहाय्यक सरव्यवस्थापक मंगेश कदम उपस्थित होते.

Mango
लासलगावमार्गे ‘हापूस’ अमेरिकेला रवाना

मंत्री पाटील यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधत आंबा उत्पादन, विपणन आणि निर्यातीबाबत चर्चा केली. पाटील म्हणाले,‘‘ कृषी पणन मंडळामार्फत दरवर्षीप्रमाणे ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ योजनेअंतर्गत आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. मात्र कोरोनामुळे मागील वर्षी महोत्सवाचे आयोजन करता आले नाही. या वर्षी आयोजनामुळे शेतकरी आणि ग्राहकांना फायदा होत आहे.’’

‘‘महोत्सवामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड या जिल्ह्यांतील ६२ हापूस आंबा उत्पादक सहभागी झाले आहेत. हंगामानुसार पुढे राज्यातील केसर आंबा उत्पादकही सहभागी होतील. महोत्सवात या वर्षी सुमारे ५१ स्टॉल आंबा उत्पादकांना दिले आहेत. महोत्सव कालावधी हा १ एप्रिल ते ३१ मे अखेर असेल. तरी जास्तीत जास्त पुणेकरांनी या महोत्सवास भेट देऊन आंबा रास्त दरात खरेदी करावा,’’ असे आवाहन पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी केले.

विक्री व्यवस्थेमधील मध्यस्थांची संख्या कमी करून शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा माल मिळावा, या उद्देशाने महोत्सवाचे आयोजन २००२ पासून करण्यात येते.
बाळासाहेब पाटील, पणनमंत्री

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com