हिंगोली बाजार समितीत हरभरा ४२०० ते ४३९१ रुपये क्विंटल

कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत धान्य बाजार (भुसार मार्केट) मध्ये सोमवारी (ता. ९) हरभऱ्याची ५०० क्विंटल आवक होती.
Chana Bajarbhav
Chana Bajarbhav Agrowon

हिंगोली ः कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत धान्य बाजार (भुसार मार्केट) मध्ये सोमवारी (ता. ९) हरभऱ्याची ५०० क्विंटल आवक होती. हरभऱ्याला प्रतिक्विंटल किमान ४२०० ते कमाल ४३९१ रुपये तर सरासरी ४२९५ रुपये दर मिळाले, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

हिंगोली बाजार समित्याच्या भुसार मार्केटमध्ये सोमवार (ता. २) ते शनिवार (ता. ७) या कालावधीत हरभऱ्याची एकूण १२०३ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटल किमान ३८५० ते कमाल ४४५१ रुपये दर मिळाले. मागील आठवड्याच्या तुलनेत हरभऱ्याची आवक कमी झाली आहे. किमान दर चार हजार रुपयांपेक्षा कमी राहिले.

शनिवारी (ता. ७) हरभऱ्याची १९८ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ३९२८ ते कमाल ४४२२ रुपये तर सरासरी ४१७५ रुपये दर मिळाले. शुक्रवारी (ता. ६)हरभऱ्याची २०५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ३९०० ते कमाल ४४५१ रुपये तर सरासरी ४१७५ रुपये दर मिळाले. बुधवारी (ता. ४) ३५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ३९५५ ते कमाल ४४२१ रुपये तर सरासरी ४१८८ रुपये दर मिळाले. सोमवारी (ता. २) हरभऱ्याची ४५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ३८५० ते कमाल ४३६० रुपये तर सरासरी ४१०५ रुपये दर मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com