Wheat Procurement: गहू खरेदीसाठी केंद्र सरकार आक्रमक; गेल्या वर्षीपेक्षा ८१ टक्के जास्त गहू खरेदी करण्याचे उद्दीष्ट

गेल्या हंगामात (२०२२-२३) सगळ्यात जास्त म्हणजे २५ लाख टन गहू पंजाबमधून झाली. त्या खालोखाल मध्य प्रदेशमध्ये २० लाख टन आणि हरियाणात १५ लाख टन गहू खरेदी करण्यात आला.
food grain prices
food grain pricesagrowon
Published on
Updated on

केंद्र सरकारने येत्या हंगामासाठी (२०२३-२४) गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ८१ टक्के जास्त गहू खरेदी करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे.

यंदा ३४१.५ लाख टन गहू खरेदी करणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. गेल्या वर्षी सुमारे १८८ लाख टन गहू खरेदी करण्यात आला होता.

नवी दिल्ली येथे केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीला सर्व राज्यांचे अन्न सचिव उपस्थित होते. या बैठकीत शेतमाल खरेदीच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली.

food grain prices
Wheat Procurement: गहू खरेदीबद्दल भारतीय अन्न महामंडळ आशावादी; ३०० ते ४०० लाख टन गहू खरेदी करण्याचा विश्वास

गेल्या हंगामात (२०२२-२३) सगळ्यात जास्त म्हणजे २५ लाख टन गहू पंजाबमधून झाली. त्या खालोखाल मध्य प्रदेशमध्ये २० लाख टन आणि हरियाणात १५ लाख टन गहू खरेदी करण्यात आला.

गेल्या वर्षी सरकारचे गहू खरेदीचे उद्दीष्ट हुकले होते. देशातील गहू उत्पादनात झालेली मोठी घट आणि मोठ्या प्रमाणावर झालेली निर्यात यामुळे सरकारी खरेदीला कमी प्रतिसाद मिळाला.

गव्हाबरोबरच केंद्र सरकारने रब्बी भाताच्या खरेदीचेही उद्दीष्ट जाहीर केले. २०२२-२३ च्या हंगामासाठी १०६ लाख टन भारत खरेदी करण्यता येणार आहे.

२०२२-२३ मध्ये भरडधान्यांची खरेदी साडे सात लाख टन होण्याचा अंदाज आहे.

गेल्या हंगामात ६.३० लाख टन खरेदी झाली होती. यंदा कर्नाटक ६ लाख टन भरडधान्यांची खरेदी करणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

कर्नाटकात मध्यान्ह भोजन योजना आणि सार्वजनिक वितरण व्यवस्था (PDS) यामध्ये भरडधान्यांचा समावेश करण्यात आला आहे.

इतर राज्यांनीही त्याचे अनुकरण करण्याची सूचना बैठकीत करण्यात आली. भरडधान्यांचे उत्पादन होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये, विशेषतः आदिवासी भागांत, खरेदी केंद्र सुरू करण्यात यावेत, असे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com