Wheat Procurement: गहू खरेदीबद्दल भारतीय अन्न महामंडळ आशावादी; ३०० ते ४०० लाख टन गहू खरेदी करण्याचा विश्वास

सध्या गव्हाचे पीक चांगल्या अवस्थेत असून २०२३-२४ हंगामामध्ये सरकारी खरेदी ३०० ते ४०० लाख टन होईल, असे भारतीय अन्न महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अशोक मीना यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
Wheat Procurement
Wheat ProcurementAgrowon

Wheat market Update वाढत्या उष्णतेमुळे यंदाही गहू उत्पादन (Wheat Production) घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सरकारी खरेदीचे (Wheat Procurement) उद्दीष्ट यंदाही हुकणार का, याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.

परंतु दुसऱ्या बाजूला भारतीय अन्न महामंडळाने (Food Corporation of India- FCI) मात्र ही शक्यता फेटाळून लावत खरेदीवर परिणाम होणार नसल्याचं म्हटलं आहे.

सध्या गव्हाचे पीक चांगल्या अवस्थेत असून २०२३-२४ हंगामामध्ये सरकारी खरेदी ३०० ते ४०० लाख टन होईल, असे भारतीय अन्न महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अशोक मीना यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

सध्या उन्हाचा पारा वाढल्यामुळे गहू उत्पादनाबद्दल चिंता वाढली आहे. उष्णतेचा गहू पिकावरील परिणामाचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने एक उच्चस्तरीय समितीही नेमली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला भारतीय अन्न महामंडळाला मात्र गव्हाचे पीक चांगल्या अवस्थेत असल्याचे वाटत आहे.

Wheat Procurement
Wheat Rate : तिसऱ्या लिलावात ५ लाख टन गव्हाची विक्री

“गेल्या वर्षीपेक्षा यंदा गव्हाचा पेरा वाढला आहे. पिकाची सध्याची अवस्था अत्यंत चांगली आहे. आमची खरेदी सामान्य राहील. आम्ही यंदाच्या हंगामात ३०० ते ४०० लाख टन गहू हमीभावाने खरेदी करू,” मीना म्हणाले.

गेल्या वर्षी गहू उत्पादनात मोठी घट झाली होती. तसेच निर्यातीचे प्रमाण मोठे राहिले. त्यामुळे सरकारी खरेदी कमी झाल्याचे मीना यांनी सांगितले.

Wheat Procurement
Wheat Harvesting : गव्हाची पिके काढणीच्या अवस्थेत

गेल्या वर्षी सरकारी गहू खरेदी मोठ्या प्रमाणावर घसरली होती. केवळ १८७.९२ लाख टन गहू खरेदी करण्यात आला. त्या आधीच्या वर्षी (२०२१-२२) मात्र ४३३.४४ लाख टन गहू हमीभावाने खरेदी करण्यात आला होता.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुढील काही दिवसांत तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे; त्याचा गहू पिकावर परिणाम होईल का, या प्रश्नाला उत्तर देताना मीना म्हणाले की, गहू पिकावर काही परिणाम होणार नाही. कमी कालावधीच्या पिकाला काही फटका बसणार नाही.

केंद्र सरकारने यंदाच्या हंगामात विक्रमी ११२.१८ दशलक्ष टन गहू उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

भारतीय अन्न महामंडळ केंद्र सरकारसाठी नोडल एजन्सी म्हणून काम करते. सार्वजनिक वितरण व्यवस्था आणि इतर कल्याणकारी योजनांमधून वाटण्यासाठी अन्नधान्यांची खरेदी आणि वितरण करण्याचे काम महामंडळाकडून केले जाते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com