Cotton Rate : कापूसपट्ट्यात खेडा खरेदीतून कापसाचे आगाऊ सौदे

गेल्या हंगामात जागतिकस्तरावर कापसाला मागणी वाढली. त्याच्या परिणामी कापसाचा बाजार चांगलाच तेजीत आला. वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यांतर्गत असलेल्या सिंदी रेल्वे बाजार समितीत कापसाचे दर बारा हजार रुपये क्विंटलपर्यंत पोहोचले होते.
Cotton Rate
Cotton RateAgrowon

यवतमाळ : बोंड अळी (Cotton Boll Worm) त्यासोबतच संततधार पाऊस व अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) कापसाचे उत्पादन (Cotton Production) यंदा कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारात दरही तेजीत (Cotton Market Rate) राहण्याची शक्यता पाहता व्यापारी खेडा खरेदीच्या (Cotton Kheda Procurment) माध्यमातून शेतकऱ्यांकडून कापूस फुटण्याआधीच सौदे करण्यावर भर देत असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे.

Cotton Rate
Cotton : कापसाची उत्पादकता वाढविण्यास हवे नवे तंत्रज्ञान

गेल्या हंगामात जागतिकस्तरावर कापसाला मागणी वाढली. त्याच्या परिणामी कापसाचा बाजार चांगलाच तेजीत आला. वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यांतर्गत असलेल्या सिंदी रेल्वे बाजार समितीत कापसाचे दर बारा हजार रुपये क्विंटलपर्यंत पोहोचले होते. यंदा अमेरिकेत काही भागांत दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने कापसाच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, तर भारतात यंदा कापूस लागवड क्षेत्र सरासरी इतकी पोहोचले आहे. सरासरीच्या १३० लाख हेक्टरपैकी १२५ लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे.

परंतु हंगामाच्या सुरुवातीला पावसाने दिलेली उघडीप त्यानंतर जुलै महिन्यात संततधार व अतिवृष्टी, ऑगस्ट महिन्यातील पूर परिस्थिती त्यानंतर गुलाबी बोंड अळीचा वाढता प्रादुर्भाव यामुळे भारतातही उत्पादकतेला फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या साऱ्याच्या परिणामी कापसाचे दर गेले हंगामाच्या तुलनेत अधिक राहतील, अशी व्यापारी वर्तुळात चर्चा आहे. त्याच्याच परिणामी शेतकऱ्यांकडून त्यांची आर्थिक गरज ओळखत नऊ ते दहा हजार रुपये प्रति क्विंटल या दराने खेडा खरेदीच्या माध्यमातून आगाऊच कापसाचे बुकिंग केले जात आहे.

अपेक्षित किंमत गृहीत धरून कापसाचा सौदा केला जातो. कापूस निघाल्यानंतर तो कापूस सावकार किंवा व्यापाऱ्याला द्यावा लागतो. यामध्ये शेतकऱ्यांचा फायदा कमी व नुकसान जास्त होते. पण कौटुंबिक गरजा भागण्यासाठी पैशाची निकड असल्याने शेतकरी हा आतबट्ट्याचा व्यवहार करतात. राळेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये असे व्यवहार होत असले तरी माडपट्टी भागात तसेच कळंब तालुक्याला लागून असलेल्या भागातही अशा प्रकारचे व्यवहार होत आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com