Cotton Market : परभणी, हिंगोली जिल्ह्यात ७ लाख ६८ हजार क्विंटल कापसाची खरेदी

Cotton Procurement : परभणी व हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या कापूस खरेदी हंगामात शुक्रवार (ता. ३) पर्यंत सीआय आणि खासगी मिळून एकूण ७ लाख ६८ हजार ६५५ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे.
Cotton Market
Cotton MarketAgrwon
Published on
Updated on

Parbhani News : परभणी व हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या कापूस खरेदी हंगामात शुक्रवार (ता. ३) पर्यंत सीआय आणि खासगी मिळून एकूण ७ लाख ६८ हजार ६५५ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. त्यात भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) ११ केंद्रावर ५ लाख २६ हजार १७३ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली.

सीसीआयकडून हमीभावाने ओलाव्याच्या प्रमाणानुसार प्रतिक्विंटल किमान ७१०० ते कमाल ७४७१ रुपये दर देण्यात आले. खासगी व्यापाऱ्यांकडून २ लाख ५२ हजार ४२ क्विंटल कापसाची प्रतिक्विंटल किमान ६९०० ते कमाल ७००० रुपये दराने खरेदी करण्यात आली. कापूस साठविण्यासाठी जागा नसल्यामुळे अनेक ठिकाणची सीसीआयची कापूस खरेदी बंद होती.

Cotton Market
Cotton Arrival till December : शेतकऱ्यांनी विकला ४१ टक्के कापूस; ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान यंदा जास्त कापसाची विक्री

राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या परभणी झोन अंतर्गंत यंदा परभणी, बोरी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, गंगाखेड, ताडकळस, हिंगोली, वसमत, जवळाबाजार या ११ ठिकाणच्या २० जिनिंग कारखान्यांमध्ये सीसीआय तर्फे किमान आधारभूत किंमत दराने कापूस खरेदी केली जात आहे.

शुक्रवार (ता. ३) पर्यंत परभणी जिल्ह्यातील ८ खरेदी केंद्रावरील १ जिनिंग कारखान्यांमध्ये ४ लाख ३५ हजार ९२६ क्विंटल कापसाची खरेदी झाली असून ओलाव्याच्या प्रमाणानुसार प्रतिक्विंटल किमान ७१०० ते कमाल ७४७१ रुपये दर देण्यात आले.

हिंगोलीतील ३ खरेदी केंद्रावर ९० हजार २४७ क्विंटल कापूस खरेदी झाली असून प्रतिक्विंटल किमान ७१७० ते कमाल ७४७१ रुपये दर मिळाले.परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील ११ कृषी उत्पन्न बाजार समित्यांअंतर्गंत ४४ जिनिंग कारखान्यांमध्ये खासगी व्यापाऱ्याकडून कापूस खरेदी सुरु आहे.

Cotton Market
Cotton Sale : देशात कापसाची पहिल्या तिमाहीत ४१ टक्के विक्री

शुक्रवार (ता. ३) पर्यंत परभणीत ३९ जिनिंग कारखान्यांमध्ये २ लाख ३६ हजार ५५५ क्विंटल कापूस खरेदी झाली असून प्रतिक्विंटल किमान ६९०० ते कमाल ७१४० रुपये दर मिळाले. हिंगोलीत ५ जिनिंग कारखान्यांमध्ये १५ हजार क्विंटल कापूस खरेदी झाली असून प्रतिक्विंटल किमान ६८०० ते कमाल ७००० रुपये दर मिळाले.

परभणी-हिंगोली जिल्हे कापूस खरेदी स्थिती (क्विंटलमध्ये) सीसीआयची खरेदी

केंद्र ठिकाण जिनिंग संख्या कापूस खरेदी दर रुपये

परभणी २ ३३२०९ ७१२४ ते ७४२१

जिंतूर १ ७५०० ७१०० ते ७४२१

बोरी २ ८१३८४ ७१७२ ते ७४७१

सेलू ५ ९४७४४ ७१७२ ते ७४७१

मानवत ३ १२८१०९ ७१७२ ते ७४७१

पाथरी १ १६९०१ ७१७२ ते ७४४५

गंगाखेड २ ५९५२८ ७४५३ ते ७५२१

ताडकळस १ १४५५१ ७२४६ ते ७४७१

हिंगोली १ २७६०८ ७१७० ते ७४४१

वसमत १ ९५६० ७१७२ ते७४४१

जवळा बाजार १ ५३०७९ ७१७० ते ७४४१

परभणी-हिंगोली जिल्हे कापूस खरेदी स्थिती (क्विंटलमध्ये) खासगी कापूस खरेदी

बाजार समिती जिनिंग संख्या कापूस खरेदी दर रुपये

परभणी ४ २५५९८ ७००० ते ७१६०

जिंतूर ४ १४३९१ ६९५० ते ७१५०

बोरी १ ३५५४ ६९०० ते ७१००

सेलू ६ ३५६१९ ६९०० ते ७१६५

मानवत १३ ९१०१९ ६९५० ते ७१५०

पाथरी २ ११९८१ ६८५० ते ७०५०

सोनपेठ १ १०३६७ ६९०० ते ७१००

गंगाखेड ६ ३४१३५ ६९८०ते ७१८०

ताडकळस २ ८६९३ ६९०० ते ७१००

हिंगोली ४ १२४१५ ६८०० ते ७०००

जवळा बाजार १ ३०७२ ६९०० ते ७१००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com