Pakistan Food Crisis : पाकिस्तानमध्ये ५७ लाख पूरग्रस्तांवर खाद्यान्नटंचाईचे संकट

पाकिस्तान सरकारची संकटाची मालिका कमी होण्याची चिन्हे नाहीत. पाकिस्तानच्या पूरग्रस्त भागातील पाणी ओसरत असताना डेंगी, मलेरियासारख्या साथरोगांचा फैलाव होण्याची भीती व्यक्त होत आहे.
Food Crisis
Food CrisisAgrowon

इस्लामाबाद (वृत्तसंस्था) : पाकिस्तान सरकारची संकटाची मालिका कमी होण्याची चिन्हे नाहीत. पाकिस्तानच्या पूरग्रस्त (Pakistan Flood) भागातील पाणी ओसरत असताना डेंगी, मलेरियासारख्या साथरोगांचा फैलाव होण्याची भीती व्यक्त होत आहे. येत्या काही महिन्यांत पुरातून वाचलेल्या सुमारे ५७ लाख नागरिकांना अन्नटंचाईच्या (Pakistan Food Shortage Crisis) संकटाशी सामना करावा लागू शकतो, अशी भीती संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार संस्थेने व्यक्त केली आहे.

Food Crisis
Food Security : आव्हान जागतिक अन्नसुरक्षेचे!

पाकिस्तानच्या आपत्ती व्यवस्थापन संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मुसळधार पाऊस आणि महापुरामुळे देशात १६९५ जणांचा मृत्यू झाला असून त्याचा फटका ३३ दशलक्ष लोकांना बसला आहे. यात २० लाखांहून अधिक घरांची पडझड झाली असून हजारो पूरग्रस्त नागरिक तात्पुरत्या निवारा छावण्यात राहत आहेत. निर्वासितांच्या छावण्यातील नागरिकांना खाद्यान्न टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

Food Crisis
Food Crisis : जगावर अन्नटंचाईची टांगती तलवार

पूरगस्त भागातील सुमारे ५७ लाख लोकांना येत्या दोन ते तीन महिन्यांत अन्नधान्य टंचाईशी मुकाबला करावा लागू शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, मदत छावण्यातील नागरिकांपैकी १६ टक्के नागरिक पूर्वीपासूनच अन्नटंचाईत राहत आहेत. पाकिस्तान सरकारने मात्र अन्नधान्य पुरवठ्याबाबत काळजीचे कारण नसल्याचे स्पष्ट करतानाच पुढील हंगामापर्यंत गव्हाचा साठा पुरेसा असून आयात केली जात असल्याचे सांगितले.

पुढील वर्षीही स्थिती खराबच

पाकिस्तानात प्रामुख्याने, सिंध, खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये आगामी काही महिने स्थिती बिकटच राहू शकते. पाणी कमी झाल्यानंतर स्थिती पूर्वपदावर येण्यास वेळ लागणार. रेल्वेचे रूळ वाहून गेल्याने रेल्वेसेवा पूर्ववत होण्यासाठी बराच काळ लागू शकतो. पूरग्रस्त भागातील लाखो लोकांना स्वच्छतागृहे नसल्याचे दिसून येत आहे. मदत छावण्यात अत्यावश्‍यक वस्तूंची कमतरता आहे.

छावण्यात १ लाख ३० हजार गर्भवती

यूएनच्या अहवालानुसार, तात्पुरत्या शिबिरात १ लाख ३० हजार गर्भवती राहत असून त्यापैकी असंख्य जणांची बाळंतपणाची तारीख जवळ आली आहे. पिण्यासाठी स्वच्छ पाणी, खाद्यपदार्थांचा अभाव, साफ सफाईचा अभाव, आरोग्य सेवेचा वाणवा यामुळे गर्भवतींची स्थिती बिकट बनली आहे. पुरामुळे पाकिस्तानचे ३० अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com