Soybean Rate : हिंगोलीत सोयाबीनला सरासरी ५३७२ रुपये दर

कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत धान्य बाजारात शनिवारी (ता. २६) सोयाबीनची १८५० क्विंटल आवक झाली. सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान ५०५० ते कमाल ५६९५ रुपये तर सरासरी ५३७२ रुपये दर मिळाले.
soybean rate
soybean rate agrowon
Published on
Updated on

हिंगोली ः कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत धान्य बाजारात शनिवारी (ता. २६) सोयाबीनची १८५० क्विंटल आवक झाली. सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान ५०५० ते कमाल ५६९५ रुपये तर सरासरी ५३७२ रुपये दर मिळाले.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवार (ता.२१) ते शनिवार (ता. २६ ) या कालावधीत सोयाबीनची (Soybean Rate) ८८९९ क्विंटल आवक (Soybean Arrival) होऊन प्रतिक्विंटल सरासरी ५३६७ ते ५५७५ रुपये दर मिळाले.

soybean rate
Soybean Market : सोयाबीन दरात काहीशी सुधारणा

सोमवारी (ता.२१) सोयाबीनची १३५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५३०० ते कमाल ५८०५ रुपये, तर सरासरी ५५५२ रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता.२२) सोयाबीनची १६९९ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५२८० ते कमाल ५८७० रुपये तर सरासरी ५५७५ रुपये दर मिळाले.

soybean rate
Soybean Rate : सोयाबीन अजूनही सहा हजारांच्या खालीच

गुरुवारी (ता.२४) सोयाबीनची २५०० क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल किमान ५१९० ते कमाल ५८०० रुपये तर सरासरी ५४९५ रुपये मिळाले. शुक्रवारी (ता.२५) १५०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५००० ते कमाल ५७३५ रुपये तर सरासरी ५३६७ रुपये दर मिळाले.

सोयाबीन साठवून ठेवण्याकडे कल

मागील आठवड्याच्या तुलनेत सोयाबीनची सरासरी दरात काही प्रमाणात घसरण झाली आहे. दर सहा हजार रुपयांवर जातील, या अपेक्षेने अनेक शेतकरी सोयाबीन साठवून ठेवत आहेत. पुढील काळात दर वाढतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com