Jowar Processing
Jowar ProcessingAgrowon

Maldandi Jowar Rate : इंदापुरात मालदांडी ज्वारीला ५००१ रुपयांचा दर

भुसार शेतमाल विक्रीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मालदांडी ज्वारीला ५००१ रुपये तर बाजरीला ३३६० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.
Published on

इंदापूर : भुसार शेतमाल विक्रीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत (Indapur APMC) मालदांडी ज्वारीला (Maldandi Jowar) ५००१ रुपये तर बाजरीला ३३६० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. या शिवाय मक्याला (Maize Rate) २२०० रुपये, गव्हाला (Wheat Rate) ३२०० रुपये क्विंटल दर इंदापूर व भिगवण बाजारात मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

Jowar Processing
Maldandi Jowar : बारामतीत मालदांडी ज्वारीला क्विंटलला ४८०१ रुपयांचा दर

इंदापूर व भिगवण उपबाजारात या सप्ताहात एकूण १७ हजार पिशव्यांची भुसार शेतीमालाची आवक झाली. यामध्ये ज्वारीच्या ३४ पोती, बाजरीच्या ३६३ पोत्यांची आवक झाली. तर मका १४,२५० पोत्यांची आवक झाली.

समितीच्या डाळिंब मार्केटमध्ये डाळिंब विक्री किमान ४० ते २५१ रुपये प्रतिकिलो या दरात होत आहे. मासे (मासळी) मार्केट इंदापूर व भिगवण येथे मोठ्या प्रमाणात मासळीची आवक होत आहेत. त्यास खरेदीसाठी आंध्रप्रदेश, कलकत्ता, कर्नाटक, तेलंगणा आदी राज्यांतून मागणी आहे. कांदा विक्री प्रतिक्विंटल ६०० ते ३२०० या दराने झाली आहे, अशी माहिती बाजार समितीचे सचिव वैभव दोसी यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com