Onion Market : नगरमध्ये कांद्याला ४७००, राहुरीत ४८०० रुपयांपर्यंत दर

Onion Rate : येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भानुदास कोतकर नेप्ती उपबाजार समितीत गावरान कांद्याला १००० ते ४७०० रुपये, तर गावरान कांद्याला ५०० ते ३६०० रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळत आहे.
Onion Market
Onion MarketAgrowon
Published on
Updated on

Nagar News : येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भानुदास कोतकर नेप्ती उपबाजार समितीत गावरान कांद्याला १००० ते ४७०० रुपये, तर गावरान कांद्याला ५०० ते ३६०० रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळत आहे. राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वांबोरी उपबाजारात कांद्याला २५०० ते ४६०० रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. मागील आठवड्यात हा दर ५२०० रुपयांपर्यंत होता.

जिल्ह्यात यंदाही कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. खरिपात दरवर्षीच्या तुलनेत अधिक कांदा लागवड झाली होती. सध्या पावसाळी लाल कांद्याची बाजारात आवक सुरू आहे. नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भानुदास कोतकर नेप्ती उपबाजार समितीत गावरान कांद्याची ३१ हजार गोण्याची तर लाल कांद्याची १६ हजार १९७ गोण्याची शनिवारी (ता. ५) आवक झाली.

Onion Market
Onion Market : कांद्याला चांगला भाव तरिही शेतकऱ्यांच्या हातात पंधरा दिवसांनी पैसे

गावरानमध्ये एक नंबरच्या कांद्याला ४ हजार ते ४७००, दोन नंबरच्या कांद्याला ३४०० ते ४ हजार, तीन नंबरच्या कांद्याला २३०० ते ३४०० तर चार नंबरच्या कांद्याला १ हजार ते २३०० रुपये व लालमध्ये एक नंबरच्या कांद्याला ३१०० ते ३६००, २ नंबरच्या कांद्याला २४०० ते ३१००, तीन नंबरच्या कांद्याला १४०० ते २४०० व चार नंबरच्या कांद्याला ५०० ते १४०० रुपयांचा दर मिळाला आहे. मागील आठवड्यापेक्षा या वेळी ३०० ते ४०० रुपयांनी दर कमी असल्याचे पाहायला मिळाले.

Onion Market
Onion Market : लोणंद बाजार समितीत हळव्या कांद्याचा हंगाम सुरू

राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी (ता. ४) गावरान कांद्याला ५०० ते ४८०० रुपयांपर्यंत दर मिळाला. १३ हजार ९५९ गोण्यांची आवक झाली. काही अपवादात्मक गोण्याला ५००० हजारांपर्यंत दर मिळाला.

राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीत दर चांगला मिळत असून, अन्य मालाचीही चांगली आवक व विक्री होत असल्याने लिलावाच्या दिवशी कांदा, व अन्य भुसार माल विक्रीला आणावा, असे आवाहन बाजार समितीने केले आहे. बांबोरी उपबाजार समितीत शनिवारी (ता. ५) २ हजार ७०० गोण्याची आवक झाली. येथेही ५०० रुपयांपासून ते ४६०० रुपयांचा दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com