Chili Market : राजुरा बाजारात मिरची २५०० रुपये क्‍विंटलवर

Chili Market Rate : हिरव्या मिरचीसाठी प्रसिद्ध असलेल्या राजुरा बाजार (ता. वरुड) येथील मार्केट यार्डात तब्बल १०० टन मिरचीची आवक होत आहे.
Chili Market
Chili MarketAgrowon
Published on
Updated on

Amaravati News : हिरव्या मिरचीसाठी प्रसिद्ध असलेल्या राजुरा बाजार (ता. वरुड) येथील मार्केट यार्डात तब्बल १०० टन मिरचीची आवक होत आहे. २४०० ते २५०० रुपये क्‍विंटल असा दर मिरचीला मिळत आहे. या मिरचीचा पुरवठा मुख्यत्वे दिल्ली, उत्तरप्रदेशात केला जात असल्याचे व्यापारी मुन्ना चांडक यांनी सांगितले.

अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी हे दोन्ही तालुके संत्रा बागांसाठी प्रसिद्ध आहेत. सुमारे ७० हजार हेक्‍टर क्षेत्र संत्रा लागवडीखाली आहे. संत्र्याच्या जोडीलाच या भागात भाजीपाला उत्पादनावरही शेतकऱ्यांनी लक्ष्य केंद्रित केले आहे. हंगामात हिरव्या मिरचीचे उत्पादन शेतकरी घेतात.

Chili Market
Chili Cultivation : कुठे वाढले तर कुठे घटले मिरचीचे क्षेत्र

हिरव्या मिरचीखालील क्षेत्रात सातत्याने वाढ होत असल्याच्या परिणामी या भागात खरेदीसाठी स्वतंत्र बाजारपेठही विकसित झाली आहे. वरुड बाजार समिती अंतर्गत राजुरा (बाजार) येथे हे मार्केट यार्ड आहे.

२७ ते ३० व्यापारी या ठिकाणी आहेत. या बाजाराचे वैशिष्ट्य म्हणजे सायंकाळी सहा वाजता या बाजारात खरेदीला सुरवात होते. पहाटे उशिरापर्यंत व्यवहार चालतात. रात्रभर शेतकरी, व्यापाऱ्यांची वर्दळ या ठिकाणी राहते.

सध्या मिरचीला २४ ते २५ रुपये किलो (२४०० ते २५०० रुपये क्‍विंटल) चा दर मिळत आहे. देशांतर्गत बाजारात मागणी, पुरवठा याव्दारे ठरणाऱ्या दराचा आधार घेत राजुरा येथे हिरव्या मिरचीचे दर दररोज ठरतात. मालाच्या खरेदीनंतर शेतकऱ्यांना हातोहात रोख पैसे देण्याची पध्दत या ठिकाणी आहे.

Chili Market
Chili Production : मिरची उत्पादनात सातत्य ठेवण्याची गरज

शेतकऱ्यांव्दारे पोत्यात माल आणल्यानंतर पोत्यातच मालाची प्रत पाहून दर ठरविले जातात. ढीग करण्याची या ठिकाणी पध्दत नसल्यामुळे खरेदीला जास्त वेळ लागत नाही, असेही व्यापारी चांडक यांनी सांगितले. गेल्या दोन वर्षांपूर्वी मिरचीवर किडरोगांचा प्रादुर्भाव वाढला होता. परिणामी उत्पादकता प्रभावित झाल्याने बाजारातील आवक घटली होती. यंदा सध्या तशी स्थिती नसल्याचेही चांडक यांनी सांगितले.

सहा महिने उलाढाल

हिरव्या मिरचीचा सहा महिन्याचा हंगाम राहतो. ऑगस्ट ते मार्च असा त्याचा कालावधी आहे. त्यानुसार वरुड, मोर्शी, काटोल या भागातून सध्या १०० टनांची आवक होत आहे. या पुढील काळात ती आणखी वाढीस लागण्याची शक्यता आहे. या ठिकाणी खरेदी होणाऱ्या मिरचीचा पुरवठा मागणीनुसार देशभरात केला जातो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com