CCI Cotton Procurement : ‘सीसीआय’च्या कापूस खरेदी प्रक्रियेत रुई उताऱ्यात हेराफेरी

Cotton Market : भारतीय कापूस निगम (सीसीआय) मार्फत बाजार समितीअंतर्गत सुरू असलेल्या खरेदी केंद्रांवर कापसामधून निघणाऱ्या रुईमध्ये अफरातफर होत असल्याची तक्रार पणनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे करण्यात आली आहे.
CCI Cotton Procurement
Cotton Market Agrowon
Published on
Updated on

Akola News : भारतीय कापूस निगम (सीसीआय) मार्फत बाजार समितीअंतर्गत सुरू असलेल्या खरेदी केंद्रांवर कापसामधून निघणाऱ्या रुईमध्ये अफरातफर होत असल्याची तक्रार पणनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे करण्यात आली आहे.

यामध्ये मोठी अनियमितता दिसून येत असून दोषींची चौकशी करण्याची मागणी तक्रारकर्ते विनायक सरनाईक यांनी केली आहे. तर या प्रकरणात सहनिबंधकामार्फत तत्काळ चौकशी करावी, अशी सूचना या विभागामार्फत देण्यात आली आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कार्यकारी परिषद सदस्य असलेले सरनाईक यांनी निवेदनात म्हटले, की किमान आधारभूत किमतीमध्ये शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्याची जबाबदारी शासनाने व भारतीय कापूस निगम या भारताच्या सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेने काहींना दिली आहे.

CCI Cotton Procurement
CCI Cotton Procurement : ‘सीसीआय’ची कापूस खरेदी पुन्हा बंद

या योजनेची अंमलबजावणी करीत असताना खरेदीदारांनी स्वतःला आर्थिक लाभ मिळवून घेण्यासाठी कापसाच्या प्रत्यक्षात येणारा उताऱ्या (Lint percentage, waste cotton seed) चुकीची नोंद घेत कागदपत्रे तयार करीत या हंगामात कोट्यवधी रुपयांची शासनाची फसवणूक केली आहे.

भारतीय कापूस निगमशी जिनिंग धारकांनी केलेल्या करारानुसार ऑक्टोबर २०२४ मध्ये ३२.३५ टक्के, नोव्हेंबरमध्ये ३२.७० टक्के, डिसेंबरमध्ये ३३.१० टक्के आणि जानेवारी महिन्यात ३३.३० टक्के इतके कमीत कमी प्रमाणात कापसाच्या रुईचे प्रेसिंग करून ते सीसीआयच्या स्वाधीन करणे आवश्यक आहे. मात्र असे असताना कमीत कमी प्रमाणापेक्षा अधिक प्राप्त झालेली रुई सीसीआयकडे जमा न करता त्यामध्ये अफरातफर करण्यात आलेली आहे, असा दावा तक्रारदाराने केला आहे.

CCI Cotton Procurement
CCI Cotton Procurement : कापूस खरेदी केंद्राबाबत ‘सीसीआय’ची चुकीची माहिती

सध्याच्या बाजार भावानुसार एक किलो रुईची किमत जवळपास १५६ रुपये आहे. प्रति एक क्विंटल कापसामागे जवळपास साडेतीन किलोपेक्षा अधिक रुईची अफरातफर केली जात असल्याचा दावाही तक्रारीत केला आहे. सीसीआयची लाखो क्विंटल कापसाची खरेदी झालेली असून यातून मोठ्या प्रमाणात रुई तयार होत आहे.

त्यातही सुरुवातीला येणारा कापूस अत्यंत चांगल्या दर्जाचा असतो. त्यात रुईचे प्रमाण अधिक राहते. खरेदी मात्र ३२.३५ टक्क्यानेच या काळात केली जाते. हा प्रकार शासनाची फसवणूक करणारा आहे. रुई व्यतिरिक्त इतर बाबी तपासल्या तर घोटाळ्याची व्याप्ती मोठी होऊ शकते, असाही दावा केला जात आहे. सरनाईक यांच्या तक्रारीची दखल पणन विभागाने घेतली असून घोटाळ्यासंदर्भात चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com