Turmeric Polishing : हळदीचे पॉलिश अन् प्रतवारी

Turmeric Market : हळदीला बाजारभाव चांगला मिळत नाही. त्यासाठी हळद पॉलिश करणे गरजेचे असते.
Turmeric
Turmeric Agrowon

डॉ. मनोज माळी

हळद शिजविताना काहीलीतील पाण्यातील मातीचा थर हळदीवर बसलेला असतो. तसेच जातीपरत्वे हळदीची साल कमी जास्त जाडीची असते. ही साल हळद शिजविल्यानंतर काळपट दिसते अथवा चिरते. ही साल पॉलिश करून काढल्याशिवाय हळद आकर्षक दिसत नाही. परिणामी, हळदीला बाजारभाव चांगला मिळत नाही. त्यासाठी हळद पॉलिश करणे गरजेचे असते.

हळद पॉलिश करण्यासाठी लोखंडी ऑइलचा पिंप वापरावा. हे पिंप एका स्टँडवर ठेवावेत. हळद भरण्यासाठी पिंपाला ६.५९ इंचाचे तोंड ठेवावे. या पिंपावर १० ते १५ सेंमी अंतरावर ३ ते ६ सेंमी लांब व एक ते दीड सेंमी रुंदीची छिद्र पाडून घ्यावीत. छिद्र पाडल्यामुळे बॅरलच्या आतील भाग खरबरीत होतो.

Turmeric
Processing on Turmeric : सुधारित पद्धतीने हळदीवर प्रक्रिया

पिंपामधून एक लोखंडी दांडा बसवून त्याला पिंपाच्या बाहेर काढून दोन्ही बाजूंना हॅन्डलसारखा आकार द्यावा. त्यामुळे पिंप ड्रम स्टॅण्डवर ठेवल्यानंतर दोन व्यक्तींना तो सहजरीत्या गोलाकार फिरविता येतो. या पिंपामध्ये पॉलिश करावयाची हळद टाकून त्यात घर्षणासाठी अणुकुचीदार ५ ते ७ दगड टाकावेत. त्यानंतर ड्रम फिरविल्यावर आतील हळद जलद गतीने पॉलिश होत जाते.

या पद्धतीमध्ये दोन मजूर एका तासांत २५ ते ३० किलो हळद पॉलिश करतात. याच तत्त्वाचा वापर करून इलेक्ट्रिक मोटारीवर चालणारे २ ते १० क्विंटल क्षमतेपर्यंतचे हळद पॉलिश ड्रम बाजारामध्ये उपलब्ध आहेत. वाळलेल्या हळदीचे उत्पादन ओल्या हळदीच्या २० ते २५ टक्के इतके मिळते.

Turmeric
Turmeric Production : हळद रुसली...

हळदीची प्रतवारी

बाजारात हळद प्रतवारी करण्यासाठी विविध यंत्र उपलब्ध आहेत. या यंत्रांच्या वापरामुळे मजुरी खर्चात मोठी बचत होते. वेगवेगळ्या प्रकारात हळदीची प्रतवारी केल्यानंतर चांगल्या बारदानामध्ये पॅकिंग करावे. यामध्ये सोरेगड्ढे व शिजवलेले गड्ढे हे वेगवेगळ्या ठिकाणी पॅक करावेत. हळदीची विक्री उघड लिलाव पद्धतीने होत असल्याने प्रत्यक्षात मालाचा दर्जा, जाडी, लांबी, चकाकी, आकर्षकपणा या बाबी पाहिल्या जातात. त्यानुसार प्रतवारी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

हळद पॉलिश केल्यानंतर हळकुंडाची किमान चार प्रकारांमध्ये प्रतवारी करावी.

जाड, लांब हळकुंडे (३ ते ५ सें.मी. लांबी)

मध्यम जाड हळकुंडे (२ ते ३ सें.मी. लांबी)

लहान आकाराची हळकुंडे (२ सें.मी. पेक्षा कमी लांबी)

लहान माती व खडेविरहित कणी

- डॉ. मनोज माळी, ९४०३७ ७३६१४,

(लेखक महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, जि. सांगली येथे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com