Crop Management : कापूस, तूर, मका पिकाची काय काळजी घ्याल?

पिकांची पाण्याची गरज लक्षात घेऊन पिकाला आवश्यकतेनुसार संरक्षीत पाणी देण्याची सोय करावी.
Crop Management
Crop ManagementAgrowon

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात अतिशय हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. आकाश अंशतः ढगाळ राहील. सध्या काही भागात पावसाचा खंड पडलेला आहे. पिकांची पाण्याची गरज लक्षात घेऊन पिकाला आवश्यकतेनुसार संरक्षीत पाणी देण्याची सोय करावी. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने कापूस, (Cotton) तूर (Tur) आणि मका (Maize) पिकातील आंतरमशागत आणि किड, रोग नियंत्रणासाठी पुढील सल्ला दिला आहे.

Crop Management
Cotton : कापूस पट्ट्यात बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढू लागला

कापूस पीक सध्या पाते लागणे आणि फुले उमलण्याच्या अवस्थेत आहे. पिकामध्ये दोन खुरपण्या व कोळपणी करुन पीक तणविरहीत ठेवावे. त्यामुळे जमिनीत ओलावा टिकविण्यासाठी, हवा खेळती राहण्यासाठी तसेच तणांचे नियंत्रण करण्यासाठी याचा फायदा होतो. रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी नियोनिकोटीनिक वर्गातील कीडनाशकांचा वारंवार वापर टाळावा. त्या ऐवजी रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी ४ ग्रॅम फ्लोनीकमाइड (५० डब्ल्यू जी) प्रति दहा लिटर पाण्यातून फवारावे.

तुर पीक सध्या फांद्या फुटण्याच्या अवस्थेत आहे. पीक ४५ दिवसांचे झाल्यावर झाडाचा वरून पाच सेंटीमीटर शेंडा एकदाच खुडावा. पिकावर किडींचा प्रादुर्भाव दिसून आल्यास पाच टक्के निंबोळी अर्काची किंवा अॅझाडिरेक्टींन १५०० पीपीएम ची ५ मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी पिकात एकरी पाच कामगंध सापळे लावावेत. तसेच हेक्टरी ५० ते ६० पक्षी थांबे उभारावेत. तुर पिकात वांझ रोगाचा प्रादुर्भाव दिसताच प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. रोगाचा प्रसार रोखण्यासाठी (सल्फर डब्लू पी) २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.

मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास स्पिनेटोरम ०.५ मिली प्रति लिटर पाण्यातून फवारावे. अळीचा पादुर्भाव लक्षात घेण्यासाठी प्रति एकरी चार कामगंध सापळे लावावेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com