Crop Advisory : हवामान अंदाजानूसार पीक व्यवस्थापन

हवामान अंदाजानूसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिलेल्या सल्ल्यानूसार कापूस, गहू, भुईमूग, सुर्यफूल, मका पिकात पुढील उपाययोजना कराव्यात.
Crop Advisory
Crop AdvisoryAgrowon

हवामान अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील ३ दिवसात किमान तापमानात हळूहळू २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होऊन त्यानंतर हळूहळू २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. हवामान अंदाजानूसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिलेल्या सल्ल्यानूसार कापूस, गहू, भुईमूग, सुर्यफूल, मका पिकात पुढील उपाययोजना कराव्यात. 

Crop Advisory
Mango crop Advisory : मोहोर अवस्थेतील आंबा बागेचे व्यवस्थापन

- कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड म्हणजेच खोडवा घेऊ नये. कापूस पिकाची शेवटची वेचणी पूर्ण झाल्यावर पालापाचोळा, पराट्या जमा करून त्यांची योग्य विल्हेवाट लावावी. 

-काढणीस तयार असलेल्या तूर पिकाची काढणी करावी व काढणी केलेल्या तूरीची वाळल्यानंतर मळणी करून सूरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. रब्बी भुईमूग पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. 

Crop Advisory
Crop Advisory : फळबाग, भाजीपाला, चारापिकाचे व्यवस्थापन कसे कराल?

- उशीरा पेरणी केलेल्या भुईमूग पिकात मावा, फुलकिडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड (१७.८ एस एल) २ मिली किंवा क्विनॉलफॉस (२५ ईसी) २० मिली किंवा

ऑक्झीडीमेटॉन मिथाईल (२५ ईसी) २० मिली किंवा लॅम्बडासायहॅलोथ्रीन (५ ईसी) ६ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 

-उशीरा पेरणी केलेल्या मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट (५ टक्के) ४ ग्रॅम किंवा स्पिनेटोरम (११.७ एससी) ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी.

फवारणी करत असताना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. वेळेवर पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकास पोटरी येण्याच्या आवस्थेत पाणी द्यावे.

उशीरा पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट (५टक्के) ४ ग्रॅम किंवा स्पिनेटोरम (११.७ एससी) ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी.

फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. 

- रब्बी सूर्यफूल पिकाला दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये असतांना पाणी द्यावे. 

- गहू पिकास फुटवे फुटण्याच्या आवस्थेत पाणी द्यावे. गहू पिकावरील तांबेरा रोगाच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिकोनॅझोल (२५ % ईसी) १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com