कलिंगड, खरबूज काढणी

संकरित वाण असलेल्या कलिंगडाचे उन्हाळ्यामध्ये एकरी सरासरी २० ते ४० टनाच्या दरम्यान उत्पादन घेता येते. हिवाळ्यामध्ये सरासरी १५ ते २५ टनाच्या दरम्यान उत्पादन येते.
कलिंगड, खरबूज काढणी
कलिंगड, खरबूज काढणी

कलिंगड काढणीस तयार झाल्याची लक्षणे  फळांवर बोटाने चापट मारल्यास धातूवर मारल्यासारखा आवाज येतो. अपरिपक्व फळात असा आवाज येत नाही. तसेच फळाला हाताने दाबल्यास कर्रकर्र असा आवाज येतो.

खरबूज काढणीस तयार झाल्याची लक्षणे फळ पिकण्याची सुरुवात फुलोऱ्याच्या टोकाकडून होते. तसेच फळांच्या सालीचा रंग बदलतो. फळावर असणारी बारीक कूस निघून फळ जाळीदार व टणक बनते. फळांचा सामान्यपणे विशिष्ट सुवास येतो.  साधारणतः उन्हाळ्यामध्ये लागवड केल्यास फळ ६० ते ६५ दिवसात तयार होते. हिवाळ्यामध्ये लागवड केल्यास फळ ७० ते ७५ दिवसात तयार होते.

उत्पादन   संकरित वाण असलेल्या कलिंगडाचे उन्हाळ्यामध्ये एकरी सरासरी २० ते ४० टनाच्या दरम्यान उत्पादन घेता येते. हिवाळ्यामध्ये सरासरी १५ ते २५ टनाच्या दरम्यान उत्पादन येते.  खरबूज या पिकाचे एकरी सरासरी उत्पादन १० ते १५ टनाच्या दरम्यान उत्पादन घेता येते. उत्पादन जात, वातावरण, जमीन व शेतकऱ्याच्या व्यवस्थापनानुसार कमी-जास्त होते.

महत्त्वाचे मुद्दे 

  •  पीक दोन पाने अवस्थेपासून ते ५० टक्के फुलोऱ्यांपर्यंत गरजेपेक्षा जास्त पाणी देऊ नये.
  •  पिकास फवारणी सकाळी किंवा सायंकाळी करावी.
  •  मधमाशांच्या शेताकडे आकर्षित व्हाव्यात, यासाठी चारी बाजूने झेंडूची लागवड करावी. तसेच थंडीच्या दिवसात लागवड असल्यास गूळ-ताकाची फवारणी घेणे, मधमाशीच्या पेट्या ठेवणे यातून परागीभवनास मदत होते.
  •  भुईमुगाशेजारी कलिंगडाची लागवड करू नये.
  •  कलिंगड व इतर वेलवर्गीय पिकांवर सल्फरयुक्त बुरशीनाशकांची फवारणी करू नये.
  •  पीक फुलोरा अवस्थेत रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करू नये.
  •  एकाच जमिनीमध्ये पुन्हा पुन्हा तेच पीक घेणे टाळावे. पिकाची फेरपालट करावी. 
  • डॉ. ओमप्रकाश हिरे,  ७५८८०१५४९१,  (लेखक खासगी कंपनीत मृदा शास्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत) महाराष्ट्र

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com