मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमानाचा पिकांवर परिणाम

मराठवाड्यातील बहुतांश क्षेत्र कोरडवाहू असून मुख्यत्त्वे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. पिकाची वाढ व विकास होऊन अधिक उत्पादन मिळण्यासाठी मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी पर्जन्यमान हा हवामान घटक खूप महत्त्वाचा आहे.
पिकामध्ये आंतरमशागत करून जमीन वाफसा स्थितीत ठेवावी
पिकामध्ये आंतरमशागत करून जमीन वाफसा स्थितीत ठेवावी

मराठवाड्यातील बहुतांश क्षेत्र कोरडवाहू असून मुख्यत्त्वे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. पिकाची वाढ व विकास होऊन अधिक उत्पादन मिळण्यासाठी मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी पर्जन्यमान हा हवामान घटक खूप महत्त्वाचा आहे. मराठवाड्यातील बहुतांश क्षेत्र कोरडवाहू असून मुख्यत्त्वे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. पिकाची वाढ व विकास होऊन अधिक उत्पादन मिळण्यासाठी मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी पर्जन्यमान हा हवामान घटक खूप महत्त्वाचा आहे. सुमारे ५० टक्के उत्पादन हे पर्जन्य या घटकावर अवलंबून आहे. पर्जन्यमान हे शेती व पिकासाठी नेहमी फायद्याचा समजला जात असला तरी सरासरीपेक्षा कमी किंवा अधिक झाल्यास त्याचा पिकांवर विपरीत परिणाम होतो. मराठवाड्याचे हवामान

  • सर्व साधारणपणे कोरडे ते उष्ण.
  • वार्षिक सरासरी पर्जन्यमान ८१४.२ मिमी तर सरासरी खरीप हंगामातील (जून ते सप्टेंबर) ६७८.९ मिमी आहे.
  • एकूण वार्षिक पर्जन्यमानापैकी जवळपास ८० ते ८५ टक्के पाऊस जून ते सप्टेंबर या काळात पडतो.
  • दहा वर्षातील खरीप हंगामातील महिनानिहाय पर्जन्यमान  मराठवाड्यातील मागील दहा वर्षातील (२०१० ते २०१९) खरीप हंगामातील पर्जन्यमानाचा अभ्यास केला असता,

  • दरवर्षी मासिक पर्जन्यमानाचे वर्गीकरण वेगवेगळे आढळून येते.
  • खरीप हंगामातील पाऊस सरासरीपेक्षा खूप कमी किंवा अधिक आढळून येतो.
  • जून महिन्याचे सरासरी पर्जन्यमान १३४.० मिमी असून, २०१३, २०१६, २०१७ व २०१८ या वर्षात पर्जन्यमानाची नोंद सरासरीपेक्षा अधिक तर बाकी वर्षात सरासरीपेक्षा कमी आढळते.
  • जुलै महिन्यातील सरासरी पर्जन्यमान १८६.२ मिमी असून, २०१०, २०११, २०१३ व २०१६ ही वर्षे वगळता बाकी वर्षात पर्जन्यमानाची नोंद ‘सरासरीपेक्षा कमी’ अशी नोंद झाली आहे.
  • ऑगस्ट महिन्यात २०१०, २०११ व २०१७ मध्ये सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमानाची नोंद झाल्याचे आढळते.
  • सप्टेंबर महिन्यात २०१६ व २०१९ ही वर्षे वगळता इतर वर्षी सरासरीपेक्षा खूप कमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.
  • खरीप हंगामातील सरासरी पर्जन्यमान ६७९.५ मिमी असून मागील दहा वर्षातील (२०१० ते २०१९) कालावधीत २०१०, २०१३ व २०१६ ही वर्षे वगळता बाकी वर्षी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.
  • यावर्षीचे हवामान व पर्जन्यमान स्थिती यावर्षी मराठवाड्यात १२ जून रोजी मॉन्सूनचे आगमन झाले. काही तालुके वगळता १४ जूनपर्यंत मॉन्सूनने संपूर्ण मराठवाडा व्यापला. जून ते ऑगस्ट या कालावधीत मराठवाड्यात आकाश ढगाळ राहून बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या तर तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. एकंदरीत यावर्षी जून ते ऑगस्ट महिन्यात मराठवाड्यातील बहुतांश भागात सरासरी इतक्या पर्जन्यमानाची नोंद झाली. या पावसामुळे जमिनीत भरपूर प्रमाणात ओलावा असून खरीप पिकाची वाढ चांगली झाली होती. मात्र, या वर्षी सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाच्या पर्जन्यमानाची (सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमानाची) नोंद झाली. (तक्ता क्र. १). मराठवाड्यातील खरीप हंगामातील पर्जन्यमानाची नोंद पाहिल्यास नांदेड जिल्हा सरासरीच्या उणे २.२ टक्के, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात सरासरी इतका तर इतर सर्व जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. अतिपावसाचे परिणाम, समस्या आणि उपाययोजना 

  • मागील तीन महिन्यात सतत ढगाळ वातावरण, दमट हवा व अति पर्जन्यमानामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे.  हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढले असून, पिके व फळबागांमध्ये किडी व बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.
  • जास्त पावसामुळे पिकात पाणी अधिक काळ साचून राहिले. परिणामी पिके काही प्रमाणात पिवळी पडून आकस्मिक मर रोगाची लक्षणे दिसून येत आहेत. शेती व फळबागांमध्ये पाणी साचू नये, यासाठी उपाययोजना कराव्यात.
  • शेतात पाणी साचल्यामुळे पिकांना जमिनीतून अन्नद्रव्ये मिळण्यास अडचण होत आहे. अशा वेळी विद्राव्य खतांची फवारणी करून अन्नद्रव्यांची पूर्तता करावी.
  • पिकात तणाचा प्रादुर्भाव वाढला आहे. उघडीप मिळताच आंतरमशागतीची कामे करून पीक तणमुक्त करावे.
  • संततधार व रिमझिम पाऊस, सतत ढगाळ हवामान व हवेत अधिक आर्द्रता इ. घटकामुळे कपाशी बोंडे सडणे तर सोयाबीन पिकाच्या शेंगांना मोड फुटणे अशा समस्या निर्माण झाल्या आहेत.
  • संपर्क -डॉ. कैलास डाखोरे, ९४०९५४८२०२ (अखिल भारतीय समन्वयीत कृषी हवामानशास्त्र संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

    Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

    ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com