Kharif sowing : कृषीमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन, पेरण्या कधी कराव्यात हे नेमके सांगितले

Abdul satar : राज्यात सर्वत्र पावसाला सुरुवात झाली आहे. पण, शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी (Sowing) करावी का? पेरणीसाठी योग्य पाऊस झाला आहे का? याबाबत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे.
Abdul Sattar
Abdul Sattaragrowon
Published on
Updated on

Kharif season sowing : यंदा माॅन्सूनच्या पावसाने उशीर केला. त्यामुळे राज्यभरातील खरीप हंगामांच्या पेरण्या रखडल्या असून अनेक भागात  समाधानकारक पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता किमान ७० ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

Abdul Sattar
Monsoon 2023: राज्यात पेरणीयोग्य पाऊस कधी पडेल? पेरण्या यंदा लांबणार का?| ॲग्रोवन

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे  कापूस पीक सुधारित लागवड तंत्रज्ञान व्यवस्थापनाबाबत आयोजित शेतकरी परिसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते.  यावेळी ग्रीन टीव्ही इंडिया , धनुका ऍग्रीटेक, सिएट लिमिटेड, कृषी विभागाचे अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.  याप्रसंगी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते प्रयोगशील शेतकऱ्यांना  प्रमाणपत्र तसेच आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 च्या अनुषंगाने शेतकऱ्यांना राळ पिकाचे वाटप करण्यात आले.

Abdul Sattar
Monsoon 2023: पुढील दोन दिवसात देशाच्या आणखी भागात माॅन्सून पोचण्याची शक्यता | Agrowon

अब्दुल सत्तार म्हणाले,  जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच शेतकरी पावसाची वाट बघत होते. बिपरजाॅय चक्रीवादळामुळे राज्यात दरवर्षीपेक्षा उशीरा मान्सून दाखल झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापूस आणि सोयाबीनची पेरणीस सुरुवात केली आहे. पण शेतकऱ्यांना पेरणीची घाई करु नये. पेरणीसाठी ७५ ते १०० मिलीमीटर पावसाची आवश्यकता असते. त्यामुळं शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य पाऊस पडत नाही तोपर्यंत पेरणी करु नये.

कापूस पीक सुधारित लागवड तंत्रज्ञान बाबत तसेच पेरण्या उशिरा होत असल्याने कापूस व इतर पीक लागवड तसेच खतांच्या व्यवस्थापनासाठी कृषी विभागाने गावागावांत जावून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे असे निर्देश देखील कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
 

Abdul Sattar
Snail Control : पहिल्याच पावसात करा शंखी गोगलगायीच्या नियंत्रणाचे नियोजन

शेती हा उद्योग व्हावा यातून शेतकरी सक्षम व्हावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागाच्या माध्यमातून महत्वकांक्षी निर्णय घेण्यात आले आहे. शेतकऱ्यांना फक्त १ रुपयांत पीकविमा , केंद्र सरकारप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी ६ हजार रुपये मानधन असे अनेक निर्णय घेतले असल्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

सिल्लोड - सोयगाव तालुक्यात मका आणि कापूस पिकांची सर्वाधिक लागवड होते. त्यामुळे गेल्या आठवड्यात सिल्लोड येथे मका संशोधन केंद्र उभारणीला शासनाने मान्यता दिली. त्याच पध्दतीने तालुक्यात कापूस उपकेंद्र सुरू करण्यात येणार असून सदरील प्रस्ताव मंजुरी स्तरावर असल्याची माहिती मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com