टोमॅटोतील विषाणूजन्य रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन

टोमॅटोतील विषाणूजन्य रोगांची लक्षणे मागील भागामध्ये पाहिली. या भागामध्ये रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन करण्यािविषयी माहिती घेऊ.
टोमॅटोतील विषाणूजन्य रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन
टोमॅटोतील विषाणूजन्य रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन
Published on
Updated on

अ) प्रतिबंधात्मक किंवा पूर्वनियंत्रण ः 

  •   विषाणूजन्य रोग प्रतिकारक किंवा सहनशील जातीचे बियाणे निवडावे.
  •   रोप लागवडीपूर्वी इमिडाक्लोप्रिड (१७.८ एस.एल) ०.४ मिलि प्रति लिटर पाणी या द्रावणात रोपांची मुळे १०-१५ मिनिटे बुडवावीत.
  •   बियाण्याची पेरणी झाल्यानंतर ६०-१०० मेश नायलॉन नेट किंवा पांढरे पातळ मलमल कापड २ मीटर उंचीपर्यंत मच्छरदाणीसारखे गादीवाफ्यास लावावे. यामुळे रोगाचा प्रसार करणाऱ्या किडीपासून रोपांचे संरक्षण होईल.
  •   ज्या परिसरात किंवा शेतात वर्षानुवर्षं तिन्ही हंगामात टोमॅटो पीक घेतले जाते, अशा ठिकाणी रोग व किडी प्रस्थापित झालेल्या असतात. त्यांची साखळी तोडण्यासाठी पिकांची फेरपालटाशिवाय पर्याय नसतो. पीक फेरपालटीचे नियोजन करावे. 
  •   लागवडीपूर्वी २५-३० दिवस अगोदर टोमॅटो शेताभोवती सर्व बाजूने ५-६ ओळी मका पेरावा. पांढऱ्या माशीला काही प्रमाणात अटकाव होतो. 
  •   लागवडीवेळी वाफ्यावर पांढरा, पिवळा, काळा किंवा निळ्या प्लॅस्टिक पेपरचे आच्छादन करावे. यामुळे पांढऱ्या माशीचे प्रमाण कमी राहत असल्याचे निष्कर्ष आहेत.
  •   रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी पिवळे चिकट सापळे ठरावीक अंतरावर लावावेत. (एकरी ३० ते ३५)  
  •   पीत तणविरहित स्वच्छ ठेवावे. 
  •   टोमॅटोभोवती यजमान पिकांची लागवड टाळावी.
  • ब) उपचारात्मक नियंत्रण    विषाणूजन्य रोगाची लक्षणे दिसताच रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत.    रस शोषक किडींच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवून थोडाही प्रादुर्भाव दिसताच वनस्पतिजन्य, जैविक किंवा रासायनिक कीडनाशकांच्या फवारणीचे नियोजन करावे.

    जैविक नियंत्रणासाठी,    व्हर्टिसिलियम लेकॅनी ५ ग्रॅम किंवा मेटॅऱ्हाझीयम ॲनीसोप्ली (१.१५ डब्ल्यू.पी.) ५ ग्रॅम प्रति लिटर. वातावरणात आर्द्रता अधिक असताना व संध्याकाळी फवारणी फायदेशीर.

    पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी,  प्रमाण प्रति ५०० लिटर पाणी प्रति हेक्टर.   इमिडाक्लोप्रीड (१७.८% एस.एल.) १५० मिलि किंवा    स्पायरोमेसिफेन (२२.९०% एस.सी.) ६२५ मिलि किंवा    थायामेथोक्झाम (२५% डब्ल्यू.जी.) २०० ग्रॅम किंवा    इमिडाक्लोप्रिड (७०% डब्ल्यू.जी.) ९०० ग्रॅम किंवा    डायफेन्थ्यूरॉन (५०% डब्ल्यू.पी.) ६०० ग्रॅम किंवा    प्रॉपरगाईट (५०%) अधिक बायफेंथ्रीन (५% डब्ल्यू / डब्ल्यू. एस. इ.) (संयुक्त कीटकनाशक) ११०० मिलि.  कीडनाशक बदलून पुढील फवारणी करावी.   फुलकिडे  नियंत्रणासाठी, प्रमाण प्रति ५०० लिटर पाणी प्रति हेक्टर.   इमिडाक्लोप्रिड (७०% डब्ल्यू.जी.) ९० ग्रॅम किंवा    सायंॲण्ट्रानिलिप्रोल (१०.२६% ओ.डी.) ९०० मिलि किंवा    थायामेथोक्झाम (७०% डब्ल्यू.एस.) ६०० मिलि किंवा    थायामेथोक्झाम (१२.६०%) अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (९.५० % झेड. सी.) (संयुक्त कीटकनाशक) १२५ मिलि.

    मावा  नियंत्रणासाठी,  प्रमाण प्रति ५०० लिटर पाणी प्रति हेक्टर.   थायामेथोक्झाम (७०% डब्ल्यू.एस.) ६०० मिलि किंवा    डायमिथोएट (३०% ईसी) ९९० मिलि.    फळांची शेवटची तोडणी झाल्यानंतर झाडे उपटून नष्ट करावीत. रोगग्रस्त पीक शेतात तसेच राहिल्यास नवीन लागवड केलेल्या पिकावर किडी व रोगांचा संसर्ग वाढतो. 

    - डॉ. तानाजी नरुटे,  ९४२२३९२३७० (वनस्पती रोगशास्त्र व कृषी अणुजीवशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, महाराष्ट्र )

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon - Agriculture News
    agrowon.esakal.com