शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन झाल्यानंतर पुढील कार्यासाठी भांडवलाची पूर्तता करणे आवश्यक आहे. कंपनीसाठी किती भांडवल लागेल याविषयी अंदाज करण्यासाठी अनेक बाबी विचारात घ्याव्या लागतात. शेतकरी उत्पादक कंपनी कोणत्या पिकावर काम करते तसेच किती प्रमाणात प्रक्रिया व विक्री व्यवस्था नियोजन करते यावरून व्यवसायाचे स्वरूप लक्षात येते. त्यावरून भांडवलाची गरज ठरविता येते. हंगामानुसार व्यवसायाच्या गरजा वेगवेगळ्या असतात. त्याही विचारात घेऊन भांडवलाचा अंदाज बांधावा लागतो. यासाठी व्यवसायाचे स्वरूप, बाजार परिस्थिती, साठवण व्यवस्था, पीक उत्पादनाविषयी कंपनीचे धोरण, प्रक्रियेसाठी कच्च्या मालाची गरज, साठवणगृहाचे नियोजन व निर्बंध, कंपनीचे एकूण उत्पादन व अंदाजे वार्षिक उलाढाल, कंपनीची कार्यपद्धती आणि कंपनीच्या मालमत्तेची देखभाल या सर्व विषयांचा आढावा घ्यावा. या घटकांवरून कंपनीला किती भांडवल लागेल याचा अंदाज मिळू शकेल. भांडवलाचा अंदाज ठरवताना महत्त्वाचे -
उद्योगासाठी व्यावहारिक बाबी ः कंपनीचा उद्योग सुरू करताना प्रामुख्याने त्यात गरजेनुसार वित्तपुरवठा, वित्तपुरवठ्याची साधने यांचा विचार करावा. कंपनीच्या मालासाठी ग्राहक कोणते व त्यांच्याकडून किती मागणी आहे, याचाही अंदाज सर्वेक्षणामधून मिळवावा. या अंदाजानुसार कंपनीच्या उत्पादनाचे नियोजन करावे. कंपनीचे व्यवहार करताना कंपनी कायद्याचे तंतोतंत पालन करण्याची दक्षता घ्यावी. कंपनीतर्फे सद्य:स्थितीत चालू असलेले प्रकल्प व त्यांची बाजाराशी जोडणी या बाबी अत्यंत काटेकोरपणे तपासून निर्णय घेण्याची गरज असते. कंपनीसाठी भांडवल उभे केल्यानंतर त्याचे नियोजन करताना भांडवलाची किंमतसुद्धा विचारात घ्यावी लागते. वेगवेगळ्या माध्यमातून भांडवल उभे करताना प्रत्येक टप्प्यावर त्यासाठी खर्च येतो. तो खर्च म्हणजे भांडवल उभे करण्याची किंमत होय. बाजार व्यवस्थेचा अभ्यास ः शेतकरी उत्पादक कंपनीसाठी बाजार व्यवस्थेचा अभ्यास करावा. तेथील पुरवठा, मागणी यावरून आपल्या उत्पादनाचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक असते. परिसरातील उपलब्ध कृषी उत्पादन कंपन्यांशी संपर्क साधून त्यांच्यासोबत आगाऊ करार करावेत. माल तयार झाल्यानंतर विक्रीसाठी धावपळ करण्याची गरज भासत नाही. शक्यतो कंपनीने स्वतःचा प्रक्रिया उद्योग स्थापन करण्याचा प्रयत्न करावा. अशाप्रकारे उत्पादित मालाच्या विक्रीसाठी बाजारात स्टॉल उपलब्ध करून घ्यावेत. बाजारपेठ वाढविण्यासाठी इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक कमिशन यांच्याकडून परवाना घेतल्यास आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये इलेक्ट्रॉनिकली जगात कुठेही माल विकता येतो. बाजार व्यवस्था करण्यासाठी गरज पडल्यास वेगवेगळ्या साधनातून कर्जाची उपलब्धता, मालाचे उत्पादन वाढवून योग्य बाजार मिळवावा. उत्पादनांच्या विक्रीसाठी अन्नसुरक्षेसंदर्भात एफएसएसएआय (Food Safety and Standards Authority of India-FSSAI) कडून परवाना घेणे आवश्यक आहे. आर्थिक नियोजन ः
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.