पीक पोषणासाठी जस्त महत्त्वाचे...

जस्त हे पिकामधील शर्करेच्या वापरासाठी गरजेचे आहे.पिकामध्ये स्टार्च निर्मिती आणि मुळांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे. जस्तामुळे पीक कमी तापमानात देखील तग धरून राहते.
Symptoms of zinc deficiency in maize crop
Symptoms of zinc deficiency in maize crop

जस्त हे पिकामधील शर्करेच्या वापरासाठी गरजेचे आहे.पिकामध्ये स्टार्च निर्मिती आणि मुळांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे. जस्तामुळे पीक कमी तापमानात देखील तग धरून राहते.

जस्त (झिंक) हे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे. पिकांच्या चांगल्या वाढीसाठी या अन्नद्रव्याची प्रामुख्याने आवश्यकता असते. पिकांचे उत्पादन आणि गुणवत्ता टिकवून ठेवायची असेल तर झिंक वापर योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे. भात, मका यासारख्या पिकात झिंक अन्नद्रव्याचा गरजेनुसार वापर आवश्यक आहे, पण बरेच शेतकरी पिकामध्ये झिंक चा वापर आवश्यकतेनुसार करत नाहीत. परिणामी उत्पादन कमी होते.  महत्त्वाचे कार्य 

  • झाडांना प्रथिने निर्मितीस चालना मिळते.संजीवक तयार होतात. प्रामुख्याने इंडॉल ॲसिटिक ॲसिडच्या निर्मितीत सहकार्य करते, ज्यामुळे पिकाची शेंड्याची वाढ जोमदार होण्यात मदत मिळते.
  • प्रथिनांच्या निर्मितीसाठी गरजेच्या एन्झाइम्सची निर्मिती करते. 
  • पिकामधील शर्करेच्या वापरासाठी गरजेचे आहे.
  • पिकामध्ये स्टार्च निर्मिती आणि मुळांच्या वाढीसाठी गरजेचे आहे.
  • बीज आणि खोडाच्या पक्वतेवर परिणाम करते.
  • हरितलवक आणि कर्बोदकांच्या निर्मितीत गरजेचे आहे.
  • पिकाच्या पेशीमधील योग्य प्रमाणामुळे पीक कमी तापमानात देखील तग धरुन राहते.
  • कमतरता असलेल्या पिकास मुळांवरील रोग हे जास्त प्रमाणात होतात.मॅग्नेशियमच्या वापराने जस्ताचे शोषण वाढते. मका, कापूस, फळ पिके, मधू मका, ज्वारी, कडधान्ये, हरभरा, तूर, सोयाबीन, भात या पिकांस जस्त दिल्यास उत्पादनात वाढ होते.
  • जस्ताचे विविध स्रोत  

    उत्पादन     सर्वसाधारण जस्ताचे प्रमाण
    झिंक सल्फेट     ३६%
    झिंक ऑक्झिसल्फेट   ३८-५०%
    झिंक ऑक्साइड     ५०-८०%
    झिंक क्लोराइड  ५०%
    झिंक (ई.डी.टी.ए.) चिलेट ६-१४%
    झिंक (एच.ई.डी.टी.ए.) चिलेट   ६-१०%

        उपलब्धतेवर परिणाम करणारे घटक   जमिनीचा सामू   सामू जास्त असल्यास कमतरता जाणवते. मात्र हा नियम सर्वच ठिकाणी लागू होत नाही, ॲसिडीक स्वरुपातील जस्ताचा वापर करून कमतरता दूर करता येते.  जस्त आणि स्फुरदाचे गुणोत्तर   जास्त प्रमाणातील स्फुरदामुळे जस्ताची कमतरता जाणवते. नत्राची कमी प्रमाणातील उपलब्धता पिकाच्या वाढीवर करत असलेल्या दुष्परिणांमुळे अन्नद्रव्यांचे शोषण कमी होते, हाच परिणाम जस्तावर देखिल लागू पडतो.  सेंद्रिय पदार्थ  जमिनीतील सेंद्रिय पदार्थ जस्ताचा पुरवठा करीत असतात. तसेच जमिनीतील सेंद्रिय पदार्थांमुळे इनऑरगॅनिक स्वरुपातील जस्ताचे चिलेशन होऊन त्याची पिकास उपलब्धता वाढते. जस्त आणि तांबे यांचे गुणोत्तर   पीक जस्त आणि तांबे  एकाच पद्धतीने शोषून घेत असल्याने जर एकाचे प्रमाण वाढले तर दुसऱ्याची कमतरता जाणवते.  जस्त आणि मॅग्नेशिअमचे गुणोत्तर  मॅग्नेशिअमच्या वापराने जस्ताचे पिकाद्वारे शोषण वाढते. जमिनीतील  पाणी  जास्त प्रमाणातील पाण्यामुळे जस्ताची उपलब्धता कमी होते.  कमतरतेची लक्षणे 

  • फळझाडांना पाने कमी लागतात,झाडांची वाढ खुंटते. 
  • गव्हाच्या पानावर तांबड्या रंगाचे डाग पडतात. 
  • मक्याच्या पानाचा अर्धा भाग पांढरा होतो. कणसांमध्ये दाणे भरत नाहीत. 
  • जस्ताची कमतरता विशेषतः धान्य पिकांमध्ये (मका, ज्वारी, सोयाबीन) व भाजीपाल्यामध्ये टोमॅटोत अधिक असते. पाने लहान होऊन शिरामधील भाग पिवळा होतो. पाने ठिकठिकाणी वाळलेली दिसतात. 
  • पिकास द्यायची पद्धत  माती परीक्षणानुसार आणि पिकाच्या प्रकारानुसार हेक्टरी १० ते २० किलो झिंक सल्फेट जमिनीतून द्यावे किंवा अर्धा ते एक किलो झिंक सल्फेट प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून पिकावर फवारावे. (मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग, डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com