तंत्र कोथिंबीर लागवडीचे...

कोथिंबीर पिकास नियमित ४ ते ५ दिवसांनी पाणी द्यावे. बी पेरणीपूर्वी वाफे चांगले भिजवून घ्यावेत. वाफसा आल्यानंतरच पेरणी करावी. पेरणीनंतर बी खत मातीने झाकून हलके पाणी द्यावे.
Techniques of Coriander Cultivation
Techniques of Coriander Cultivation
Published on
Updated on

कोथिंबीर पिकास नियमित ४ ते ५ दिवसांनी पाणी द्यावे. बी पेरणीपूर्वी वाफे चांगले भिजवून घ्यावेत. वाफसा आल्यानंतरच पेरणी करावी. पेरणीनंतर बी खत मातीने झाकून हलके पाणी द्यावे. विशिष्ट स्वादयुक्त पानांमुळे कोथिंबिरीला वर्षभर मागणी असते. हे कमी वेळात येणारे आणि चांगला आर्थिक नफा मिळवून देणारे पीक आहे. उन्हाळी हंगामात कोथिंबिरीचे उत्पादन कमी असले तरी मागणी जास्त असते. पाण्याचे योग्य नियोजन केल्यास लागवड आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणारे पीक आहे.

  • मध्‍यम कसदार आणि मध्‍यम खोलीची जमीन पिकासाठी योग्य असते.
  • माती परीक्षण करून खतांचा योग्य पुरवठा केल्यास, हलक्या जमिनीत सुद्धा उत्पादन घेता येते.
  • लागवड कोणत्याही हंगामात करता येते.अति पावसाचा प्रदेश वगळता महाराष्ट्रातील हवामान कोथिंबिरीच्या वर्षभर लागवडीसाठी पोषक आहे.
  • उन्हाळ्यात तापमान ३६ अंश सेल्सिअसच्या वर गेल्यास वाढ कमी होते.
  • सुधारित जाती डी.डब्ल्यू.डी-९, जीसी-१,२,३, लाम.सी.एस.-२, लाम.सी.एस.-४, लाम.सी.एस.-६, को-१, कोकण कस्तुरी. बीजप्रक्रिया 

  • बियाणांची चांगली उगवण होण्यासाठी त्यावर प्रक्रिया करणे आवश्‍यक आहे. पेरणीपूर्वी धने फोडून बिया वेगळ्या कराव्यात.
  • पेरणीपूर्वी बी पाण्यात ऊबदार जागी १२ तास ठेवून नंतर लागवड करावी. त्यामुळे उगवण ८ ते १० दिवसांत होऊन काढणीस लवकर तयार होते.
  • लागवड 

  • उभी आडवी नांगरणी करून जमीन चांगली भुसभुशीत करावी.
  • लागवडीसाठी ३ बाय २ मीटर आकाराचे सपाट वाफे तयार करावेत. प्रत्येक वाफ्यात ८ ते १० किलो चांगले कुजलेले शेणखत टाकून मिसळावे.
  • पेरणीपूर्वी वाफे चांगले भिजवून घ्यावेत. वाफसा आल्यानंतरच पेरणी करावी.
  • वाफे सपाट करून बी फेकून पेरावे. बी खत मातीने झाकून हलके पाणी द्यावे.
  • लागवडीसाठी हेक्टरी ६० ते ८० किलो बी लागते.
  • प्रादुर्भावग्रस्त जमिनीत सतत कोथिंबीर पीक घेणे टाळावे. शेतामध्ये स्वच्छता ठेवावी.लागवडीसाठी रोग प्रतिकारक जातींचा वापर करावा.
  •  खत व पाणी व्यवस्थापन 

  • लागवडीपूर्वी जमिनीत हेक्टरी ५ ते ६ टन चांगले कुजलेले शेणखत टाकावे.
  • उगवल्यानंतर साधारणतः ३५ ते ४० दिवसांनी ४० किलो नत्राची मात्रा द्यावी. त्यासोबत प्रतिलिटर पाण्यात ८ ग्रॅम युरिया मिसळून २ फवारण्या कराव्यात.
  • पिकास नियमित पाण्याची गरज असते. त्यामुळे उन्हाळ्यात दर ४ ते ५ दिवसांनी पाणी द्यावे.
  • संपर्क : डॉ. एस. एस. विटनोर, ९५२७६७५१०३ डॉ. डी. जी. इंगोले, ८९५६८३३८८९ (छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, कांचनवाडी, जि. औरंगाबाद.)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon - Agriculture News
    agrowon.esakal.com