शेतकरी उत्पादक कंपनीसाठी समभाग निधी योजना

केंद्र शासनाने सन २०१४ हे वर्ष “शेतकरी उत्पादक कंपन्यांचे वर्ष” म्हणून घोषित केले होते. शेतकरी उत्पादक कंपन्यांना सुरवातीच्या काळात कृषी व्यवसाय करण्यास प्रोत्साहन व साहाय्य व्हावे या हेतूने शासनाने काही नावीन्यपूर्ण योजनांच्या अंमलबजावणीस सुरवात केली आहे.
Farmer Company's Shopping Center
Farmer Company's Shopping Center

केंद्र शासनाने सन २०१४ हे वर्ष “शेतकरी उत्पादक कंपन्यांचे वर्ष” म्हणून घोषित केले होते. शेतकरी उत्पादक कंपन्यांना सुरवातीच्या काळात कृषी व्यवसाय करण्यास प्रोत्साहन व साहाय्य व्हावे या हेतूने शासनाने काही नावीन्यपूर्ण योजनांच्या अंमलबजावणीस सुरवात केली आहे. केंद्र शासनाने सन २०१४ हे वर्ष “शेतकरी उत्पादक कंपन्यांचे वर्ष” म्हणून घोषित केले होते. शेतकरी उत्पादक कंपन्यांना सुरवातीच्या काळात कृषी व्यवसाय करण्यास प्रोत्साहन व साहाय्य व्हावे या हेतूने शासनाने काही नावीन्यपूर्ण योजनांच्या अंमलबजावणीस सुरवात केली आहे. याशिवाय विविध केंद्र पुरस्कृत अभियानांतर्गत देखील विशेष तरतूद केली आहे. यामध्ये प्रामुख्याने छोट्या शेतकऱ्यांचा कृषी व्यापार संघ (SFAC) यांच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपनीसाठी समभाग निधी योजना सुरु करण्यात आलेली आहे.  यंत्रणेचे नाव  छोट्या शेतकऱ्यांचा कृषी व्यापार संघ (Small Farmer Agribusiness Consortium – New Delhi)  उद्देश

 • शेतकरी उत्पादक कंपनी सक्षम व्हावी व ती शाश्वत चालावी. 
 • शेतकरी उत्पादक कंपनीची मालकी वाढविणे आणि समभाग वाढविणे.
 • शेतकऱ्यांनी उत्पादक कंपनीत सक्रिय सहभाग घ्यावा.
 • निकष

 • उत्पादक कंपनीची कंपनी कायदा २०१३ नुसार Registrar of Company (ROC) यांचेकडे नोंदणी झालेली असावी.
 • कंपनीचे भागभांडवल सर्व शेतकऱ्यांनी मिळून उभे केलेले असावे.       
 • भागधारकांची संख्या ५० पेक्षा कमी नसावी.       
 • भागधारकांचे भागभांडवल ३० लाखांपेक्षा जास्त नासावे.       
 • अल्प, मध्यम आणि भूमिहीन शेतकऱ्यांचा ३३ टक्के समभाग असावा.       
 • कोणत्याही एका सभासदाचे भागभांडवल कंपनीच्या एकूण भांडवलाच्या ५ टक्यांपेक्षा जास्त नसावे.
 • कंपनीत कमीत कमी ५ ते १५ च्या मर्यादेत कायदेशीर व्यवस्थापकीय संचालक मंडळ असावेत व त्यात किमान एक महिला प्रतिनिधी असणे अनिवार्य आहे.       
 • कंपनीचे पुढील १८ महिन्यांचे उत्पन्न,प्रगती, नियोजन आणि अंमलबजावणी विषयीचा आराखडा सादर करणे अपरिहार्य आहे.    
 • उत्पादक कंपनीचे बँकेत खाते असावे.       
 • कंपनीचे किमान १ वर्षाचे लेखापरिक्षण सनदी लेखापाल यांच्याकडून केलेले असावे.     
 • अर्ज प्रक्रिया  पात्र शेतकरी उत्पादक कंपनीसाठी समभाग निधीच्या सहाय्यासाठी www.sfacindia.com या वेबसाइट वरती ऑनलाइन अर्ज विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह सादर करणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रांची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

 • सनदी लेखापाल यांनी तपासून प्रामाणिक केलेली समभाग धारक व त्यांचे भागभांडवलासह यादी.       
 • शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालक मंडळाचा समभाग निधी योजनेत सहभाग नोंदविण्याबाबतचा मंजूर ठराव.       
 • भागधारकांची संमती यामध्ये भागधारकाचे नाव, लिंग त्याचे एकूण भागभांडवलाचे दर्शनी मूल्य, जमीन धारणा या माहितीसह छोट्या शेतकऱ्यांचा कृषी व्यापार संघास देण्यात आलेली संमती, त्यामध्ये कंपनीमध्ये भागधारकांच्या भाग भांडवला इतक्या रक्कमेचे अतिरिक्त समभाग निधी हे कंपनीच्या खात्यावर जमा करून वैयक्तिक भागधारकास मिळणेबाबत माहितीचा समावेश असेल. त्याचप्रमाणे नियमाप्रमाणे कंपनीतून बाहेर पडणे किंवा समभाग हस्तांतरित करणेबाबतच्या प्रक्रियेची माहिती असावी.      
 • सनदी लेखापाल यांचेकडून तपासून प्रामाणिक केलेले कंपनीच्या नोंदणी झालेल्या वर्षापासून सर्व वर्षाचे खर्चाचे लेखापरिक्षण अहवाल सादर करणे आवश्यक.           
 • ज्या बँकेच्या शाखेत शेतकरी उत्पादक कंपनीचे बँक खाते उघडण्यात आलेले आहे अशा बँकेच्या व्यवस्थापनाकडून प्रमाणित  करण्यात आलेले बँकेच्या खाते पुस्तकातील एकूण मागील महिन्यांच्या नोंदीची छायांकित प्रत सादर करणे आवश्यक असेल.      
 • नोंदणीकृत कंपनीचा व्यवसाय आराखडा व पुढील १८ महिन्यांच्या अंदाजपत्रकाची माहिती सादर करणे आवश्यक असेल.       
 • समभाग निधी योजनेअंतर्गत संचालक मंडळाने स्वाक्षरी व अंमलबजावणीसाठी शेतकरी  उत्पादक कंपनीने प्राधिकृत केलेले संचालक यांची सविस्तर माहिती ज्यामध्ये त्यांचे नाव, छायाचित्र,ओळखीचा पुरावा (यासाठी शिधापत्रिका, आधारकार्ड, निवडणूक पत्र, पारपत्र याचा समावेश आहे) सादर करणे आवश्यक राहील.       
 • अर्जासोबत सादर करण्यात आलेल्या सर्व दस्तऐवजांच्या सर्व पृष्ठावर किमान दोन संचालक मंडळाचे सदस्य किंवा कंपनीचे प्रतिनिधी यांनी स्वाक्षरी करणे आवश्यक राहील.       
 • शेतकरी उत्पादक कंपनीने त्यांची पत विश्वासार्हता शाश्वत व उत्पादकता निर्धारित करण्यासाठी त्यांचे प्रशासकीय बाबी, व्यवसाय आराखड्याची उत्पादन क्षमता व वित्तीय शिस्त याचा विचार करून समभाग निधी योजनेअंतर्गत अर्ज सादर करावा.       
 • वरील बाबींची सत्यता व विश्वासार्हता ही योजनेंतर्गत समभाग निधी अर्थ साहाय्य मिळविण्यासाठी सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या आधारे, प्रत्यक्ष भेटीतून व पुरस्कर्त्या संस्थेच्या माध्यमातून पडताळून पाहण्यात येईल.     
 • - गणेश जगदाळे,  ७५८८०७०४७३ (व्यवस्थापक, नाबार्ड पोपी प्रकल्प, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे)

  Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
  Agrowon
  agrowon.esakal.com