हरितगृहातील गुलाबावरील लाल कोळी व्यवस्थापन

फुलांची निर्यात करताना अनेक देशांमध्ये असलेल्या कठोर फायटोसॅनिटरी नियमामुळे अडचणीवाढतात. सध्या उन्हाळा वाढत असून, या काळात सर्वाधिक त्रासदायक ठरणारी कीड म्हणजे लाल कोळी होय.
Red spider management on roses in the greenhouse
Red spider management on roses in the greenhouse

फुलांची निर्यात करताना अनेक देशांमध्ये असलेल्या कठोर फायटोसॅनिटरी नियमामुळे अडचणी वाढतात. सध्या उन्हाळा वाढत असून, या काळात सर्वाधिक त्रासदायक ठरणारी कीड म्हणजे लाल कोळी होय. हरितगृहामध्ये संरक्षित गुलाबाची लागवड केल्यानंतर पिकाच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण पुरविल्यामुळे फुलांची प्रत चांगली मिळते. मात्र पिकामध्ये निर्माण झालेले सूक्ष्म अनुकूल वातावरण हे कीड आणि रोगांच्या प्रादुर्भाव, वाढीसाठी अनुकूल ठरते. हरितगृहामध्ये अति उच्च घनतेमध्ये (म्हणजे प्रति चौरस मीटर ६-९ झाडे) गुलाबाची लागवड असते. त्यामुळे रोग किडीचा प्रसारही वेगाने होतो. फुलांची निर्यात करताना अनेक देशांमध्ये असलेल्या कठोर फायटोसॅनिटरी नियमामुळे अडचणी वाढतात. सध्या उन्हाळा वाढत असून, या काळात सर्वाधिक त्रासदायक ठरणारी कीड म्हणजे लाल कोळी होय. स्पायडर माइट (शा. नाव -टेट्रानिचस अर्टिकार कोच) - ही पिकांच्या नुकसानीसह निर्यातीमध्येही उत्पादन नाकारले जाण्याइतपत अडथळे निर्माण करते. सध्या उष्ण आणि कोरडी परिस्थिती माइट्सच्या विकासासाठी अनुकूल असते. तिथे लाल कोळींची वाढ व पुनरुत्पादन जलद होते. त्यांची संख्या वाढते.  अनुकूल वातावरण लाल कोळी उबदार हवामान आणि कमी आर्द्रतेमध्ये सर्वांत सक्रिय आणि पुनरुत्पादक होतात. दिवसाचे तापमान २८ ते ३० अंश सेल्सिअस, रात्रीचे तापमान १८ ते २०अंश सेल्सिअस, आर्द्रता ४० ते ५० % असताना त्यांची वेगाने वाढ होते. ते उन्हाळ्यात जास्त कार्यरत असतात. ते वाऱ्याद्वारे पसरतात.   जीवनक्रम अंडी ते प्रौढ या दरम्यान वाढीचे चार टप्पे असून, त्यांचा कालावधी तापमानावर अवलंबून असतो.

 • अंडी : लहान, गोलाकार, चमकदार पांढऱ्या रंगाची असून, अंडी देण्याचा कालावधी चार ते सहा दिवसांचा असतो.
 •   अळी (larva) : सहा पाय, रंगहीन, अंड्यापेक्षा किंचित मोठी असते. ते थोडे थोडे अन्न खाऊ लागतात.  
 • बाल्यावस्था (Nymph) : आठ पाय, प्रौढांसारखीच पण आकाराने लहान, लैंगिकदृष्ट्या प्रौढ नसते. याच्या प्रोटो निम्फ आणि डियुटोनिम्फ अशा दोन अवस्था. 
 • प्रौढ अवस्था : प्रौढ मादीचे पोट गोल, आठ पाय आणि आकार १ मिमीपेक्षा कमी. प्रौढ नराचे पोट शंकूसारखे, लहान असून, ८ पाय असतात. रंग फिकट पिवळा ते हिरवा ते नारिंगी ते तपकिरी असा होत जातो. वरून पाहताना त्यावर रंगद्रव्ये असलेले २ डाग दिसतात. मादी संपूर्ण आयुष्यात ५० ते १०० अंडी घालते. फलित अंडी मादीमध्ये विकसित होतात. लिंग गुणोत्तर मोठ्या प्रमाणात बदलू शकते.
 • नुकसानीचा प्रकार 

 • पिले व प्रौढ पानाच्या खालील भागातून रस शोषतात. जास्त प्रादुर्भावग्रस्त पानातील हरितद्रव्ये ७० टक्क्यांपर्यंत कमी होतात. पाने तपकिरी होऊन वाळतात.
 • पाने पिवळी पडल्याने प्रकाश संश्‍लेषण प्रक्रियेवर विपरीत परिणाम होतो. झाडांची वाढ खुंटते. पाने वाळल्यानंतर ही कीड अतिशय लहान धाग्यांचे जाळे विणत नवीन फुटीकडे मोर्चा वळवते. पुढे फुलांवर आक्रमण करते. परिणामी, फुलांचा रंग भुरकट, करडा होऊन फुलांचा दर्जा घटतो.
 • हंगामानुसार प्रादुर्भाव या किडीचा प्रादुर्भाव डिसेंबर महिन्यात सुरू होतो. पुढे तापमान वाढताना, आर्द्रता कमी होत गेल्यास एप्रिल, मे महिन्यामध्ये सर्वाधिक प्रादुर्भाव होतो. विशेषतः पाण्याचा ताण बसलेल्या ठिकाणी झाडे किडीस लवकर बळी पडतात. हवेद्वारे त्यांचा एका ठिकाणाहून दुसरीकडे प्रसार होतो.  निरीक्षण ही कीड आकाराने लहान असून, डोळ्याने सहज दिसत नाही. १० पट मोठे दृश्य दर्शविणाऱ्या भिंगाच्या साह्याने बागेचे निरीक्षण करत राहावे. पानाच्या वरील बाजूला पिवळेपणा, ठिपके दिसल्यास मागील बाजूस अंडी, प्रौढ यांचा शोध घ्यावा. ही कीड ओळखण्यासाठी अशी पिवळसर पाने एखाद्या जाडकागदारवर आपटावीत. कोळी पांढऱ्या कागदावर हलताना दिसतील.  उपाययोजना  मशागतीय नियंत्रण ग्रीन हाउसमधील उष्ण ठिकाणे (हॉटस्पॉट) ओळखणे   फुले काढताना व अन्य कामे करताना कामगारांच्या साह्याने निरीक्षण करता येते. कारण ते दिवसातून किमान दोन वेळा पॉलिहाउसच्या प्रत्येक ओळीतून फिरत असतात. त्यांच्या साह्याने असे हॉटस्पॉट ओळखावेत. त्यामागील कारणे जाणून ती दूर करावीत.  हॉटस्पॉट तयार होण्यामागील कारणे 

 • दोषपूर्ण ग्रीनहाउस रचनेमुळे हवा खेळती न राहणे. 
 • ठिबक सिंचन किंवा मिस्टिंग प्रणाली ठरावीक जागी बंद असणे.  
 • ठरावीक जागी अतितीव्र सूर्यप्रकाश अधिक काळ राहणे. 
 • उपाययोजना 

 • अशा ठिकाणी होज पाइपने शॉवरिंग करावे. 
 •  ड्रीप सर्वत्र व्यवस्थित चालू असल्याची खात्री करावी. वाढलेल्या तापमानात मिस्टिंगच्या फेऱ्या देणे.
 • नियमितपणे क्षेत्र साफ करून घ्यावा. विशेषतः वाळलेली पाने वेचून घ्यावीत.
 • पाण्याची फवारणी करून दिवसा चांगली आर्द्रता (७० टक्क्यांपेक्षा अधिक) राखावी. 
 • जैविक नियंत्रण परदेशामध्ये लाल कोळीच्या नियंत्रणासाठी जैविक पद्धतीवर भर दिला जात आहे. मात्र लाल कोळीच्या शत्रूंच्या संख्येत वाढ होण्यासाठी, ते तग धरण्यासाठी बागेमध्ये फवारण्याची संख्या मर्यादित ठेवणे, निम किंवा करंजयुक्त वनस्पतिजन्य कीटकनाशकांचा वापर करणे यावर भर द्यावा. तेव्हा कोळी किडीचे नैसर्गिक भक्षक उदा. फायटोस्क्युलस पर्सिमिलिस, अम्बलिसियस कॅलिफोर्निकस इ. वाढतात. रासायनिक नियंत्रण किडीचा प्रादुर्भाव दिसताच कोळीनाशकांची वेळीच फवारणी करावी. सुरुवातीलाच आटोक्यात आणल्यास नियंत्रण सोपे होते. पुढे एकदा हरितगृहामध्ये  पसरल्यास व विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यात असलेल्या कोळी किडीचे नियंत्रण करणे अवघड होत जाते. बाजारात अनेक कोळीनाशके उपलब्ध आहे. मात्र एकाच प्रकारच्या कोळीनाशकांच्या वापरामुळे कोळ्यांमध्ये त्याविरुद्ध प्रतिकारशक्ती तयार होऊ  शकते. 

 • प्रत्येक फवारणीनंतर चोवीस तासांने पिकाचे निरीक्षण करावे. किमान ९० टक्क्यांपेक्षा अधिक नियंत्रण मिळणे अपेक्षित आहे.  कोळीचे प्रमाण ७५ टक्क्यांनी कमी झाले असले तरी तिसऱ्या दिवशी फवारणी करावी लागेल.  
 • विशिष्ट उत्पादने ठरावीक कालावधीत परिणाम देतात. तो कालावधी जाणून घ्यावा. (उदा. ओवीसाईडस, जैविक उत्पादने)
 • शेतकरी लाल कोळीच्या नियंत्रणासाठी दुपारी, कडक उन्हामध्ये रसायनांच्या फवारणी करतात. अनेक रसायने विशिष्ट प्रमाणात प्रकाशासाठी संवेदनशील असतात. (फायटोटॉक्सिक) अशा रसायनांची फवारणी तीव्र सूर्यप्रकाश, कमी आर्द्रतेमध्ये केल्यास झाडांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. पाने, फुले यांचे कार्यावर परिणाम होतो. झाडांची वाढ थांबते. योग्य वेळीच फवारणी केली पाहिजे.
 • - दशरथ पुजारी, ९८२३१७७८४४, ९८८१०९७८४४. (लेखक निर्यातक्षम फूल उत्पादनामध्ये अनुभवी आहेत.)  

  Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

  ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  agrowon.esakal.com