उन्हाळी नाचणीच्या चाऱ्याचे व्यवस्थापन

नाचणीची कणसे खुडून झाल्यावर लगेचच चारा जमिनीलगत कापून घेऊन उन्हात सुकवून पेंढ्या बांधून ठेवाव्यात किंवा कडबा कुट्टी यंत्रावर बारीक करून मुरघास तयार करून ठेवावा.
Management of summer fodder Finger millet
Management of summer fodder Finger millet

नाचणीची कणसे खुडून झाल्यावर लगेचच चारा जमिनीलगत कापून घेऊन उन्हात सुकवून पेंढ्या बांधून ठेवाव्यात किंवा कडबा कुट्टी यंत्रावर बारीक करून मुरघास तयार करून ठेवावा. यामुळे दुभत्या जनावरांना चांगल्या दर्जाच्या सकस चारा उपलब्ध होतो. उन्हाळी नाचणी पीक साधारणपणे एप्रिलच्या अखेरीस पक्व झाल्यावर कणसे खुडून झाली, की शेतात शिल्लक राहतो तो हिरवा रसरशीत चारा. या चाऱ्याचे नियोजन केल्यास त्याच्या विक्रीतून एक तर नाचणीचा उत्पादन खर्च बाहेर पडतो किंवा घरच्या दुभत्या जनावरांना सकस चारा उपलब्ध होतो.

  • मे महिन्यात जेव्हा इतर हिरव्या चाऱ्याची उपलब्धता कमी असते तेव्हा उन्हाळी नाचणीपासून चारा मिळतो. खरिपातल्या नाचणीपेक्षा जास्त प्रमाणात म्हणजेच एकरी चार ते पाच टन चारा उन्हाळी नाचणीपासून उपलब्ध होतो.
  • फुले नाचणी जातीला उन्हाळी हंगामात नत्राची योग्य मात्रा आणि पुरेसे पाणी दिले गेले असल्यास पिकाची साडेतीन ते चार फूट उंची मिळते. नाचणीची कणसे खुडून झाली तरी पाने हिरवी आणि खोड रसरशीत असते.
  • नाचणीची कणसे बऱ्याचदा दोन टप्प्यांत काढायला तयार होतात. कणसे खुडून झाल्यावर लगेचच चारा जमिनीलगत कापून घेऊन उन्हात सुकवून पेंड्या बांधून ठेवावा किंवा कडबा कुट्टी यंत्रावर बारीक करून मुरघास तयार करून ठेवावा. 
  • टंचाई काळात लोह आणि कॅल्शिअमचा एक उत्तम स्रोत असलेला हा चारा जनावरांच्या पोषणासाठी उपयुक्त ठरतो. मुरघास तयार करताना सायलो कल्चर किंवा युरियाचा वापर मुरघासाचा दर्जा सुधारण्यासाठी उपयोगी ठरतो.
  • नाचणीची कणसे खुडून झाल्यानंतर जर चारा कापणीसाठी काही कारणाने वेळ लागणार असेल तर पिकाला एखादे हलके पाणी द्यावे. 
  • सकस नाचणी चारा 

  •   नाचणीचा ओला चारा आणि सुका कडबा यांचे पृथक्करण केले असता त्यात कच्च्या प्रथिनांचे ओल्या चाऱ्यातील प्रमाण ८.८७ टक्के आणि सुक्या कडब्यात ७.४५ टक्के, कॅल्शिअमचे प्रमाण अनुक्रमे ०.५५ आणि ०.८८ टक्का, फॉस्फरस ०.११  टक्का आणि ०.०३ टक्का, झिंक २०.५ आणि २९.०१ पीपीएम, मँगेनीज १८३ आणि २३३ पीपीएम, तांबे ५.८५ आणि ४.६७ पीपीएम. 
  • जनावरांच्या शरीरातील चाऱ्याची पाचकता अनुक्रमे ७३.०२ आणि ५०.०१ टक्के.
  • - पराग परीट,  ९९२११९०६७१,  (तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, कृषी विभाग, गगनबावडा, जि.कोल्हापूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com