मिरची पिकामध्ये रस शोषक किडीमध्ये महत्त्वाची कीड म्हणजे फुलकिडे. या किडीच्या आतापर्यंत ‘थ्रीप्स टॅबॅसी’ आणि ‘र्स्कीरटोथ्रीप्स डॉरसॅलिस’ या दोन प्रजाती मिरचीमध्ये आढळत असत. मात्र अलीकडे महाराष्ट्रातील विदर्भ व मराठवाडा व राज्याशेजारील आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक व गुजरात राज्यांमध्ये मिरचीवर नव्या प्रजातीचे फुलकिडे आढळत आहेत. भारतामध्ये बहुतांश सर्व राज्यात मिरची पिकाची लागवड केली जाते. त्यातही आंध्र प्रदेश, तमिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात ही राज्ये मिरची पिकामध्ये अग्रगण्य आहेत. महाराष्ट्रामध्ये या पिकाखाली सुमारे ३०,५९० हेक्टर क्षेत्र आहे. नागपूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर व पुणे या जिल्ह्यांत मिरची पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात होते. मिरची पिकाच्या विविध अवस्थेमध्ये अनेक किडींचा प्रादुर्भाव होतो. त्यात फुलकिडे, मावा, पांढरी माशी व कोळी या रस शोषक किडी; कळ्या, फुले पोखरणारी कीड (बड बोरर) तसेच तंबाखूवरील पाने खाणारी अळी (स्पोडोप्टेरा लिट्यूरा), हरभऱ्यावरील घाटेअळी (हेलीओथिस) तसेच केसाळ अळी (हेअरी कॅटरपीलर) या प्रमुख किडी आहेत. मिरची पिकामध्ये रस शोषक किडीमध्ये महत्त्वाची कीड म्हणजे फुलकिडे. या किडीच्या आतापर्यंत ‘थ्रीप्स टॅबॅसी’ (Thrips tabaci) आणि ‘र्स्कीरटोथ्रीप्स डॉरसॅलिस’ (Scirtothrips dorsalis) या दोन प्रजाती मिरचीमध्ये आढळत असत. मात्र अलीकडे महाराष्ट्रातील विदर्भ व मराठवाडा विभागामध्ये व राज्याशेजारील आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक व गुजरात अशा राज्यांमध्ये मिरचीवर नव्या प्रजातीचे फुलकिडे आढळत आहेत. त्याचे शास्त्रीय नाव ‘थ्रीप्स पार्विस्पिनस’ (Thrips parvispinus) असे आहे. ओळख फुलकिडीच्या थ्रीप्स पार्विस्पिनस या प्रजातीचे मूळ उगमस्थान इंडोनेशिया आहे. ही प्रजाती भारतामध्ये सन २०१५ प्रथम पपई या पिकावर व त्यानंतर दक्षिण भारतातील फूल पिकांवर आढळली होती. यजमान पिके मिरची, ढोबळी मिरची, पपई, वांगी, बटाटे व फूलपिके इ. जीवनक्रम
प्रादुर्भावाची लक्षणे व नुकसान
एकात्मिक कीड व्यवस्थापन
रासायनिक नियंत्रण ( फवारणी प्रमाण : प्रति ५०० लिटर पाणी प्रति हेक्टरी)
टीप : वरील सर्व कीटकनाशकांसाठी ॲड हॉक लेबल क्लेम देण्यात आले आहेत. - सोमनाथ पवार, ९९२२५७२९३० (कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.