शेतकरी नियोजन : गाय-म्हैस पालन

सध्या माझ्याकडे १५ गाई व ३ वासरे आहेत. त्यातील १२ गाई दुभत्या असून त्यासाठी मुक्त संचार गोठा केलेला आहे. गाईंच्या मुक्तसंचारासाठी ७ वर्षापूर्वी गोठा बांधलेला आहे. गेल्या वर्षभरापासून दुधाचे दर सातत्याने कमी होत असल्याने दूध व्यवसाय अडचणीत आहे. सध्या दिवसाला दोन वेळचे मिळून साधारण १७० लिटर दूध संकलन होते.
Farmer Planning: dairy
Farmer Planning: dairy
Published on
Updated on

सध्या माझ्याकडे १५ गाई व ३ वासरे आहेत. त्यातील १२ गाई दुभत्या असून त्यासाठी मुक्त संचार गोठा केलेला आहे. गाईंच्या मुक्तसंचारासाठी ७ वर्षापूर्वी गोठा बांधलेला आहे. गेल्या वर्षभरापासून दुधाचे दर सातत्याने कमी होत असल्याने दूध व्यवसाय अडचणीत आहे. मात्र, तरीही आम्ही हा व्यवसाय तग धरुन ठेवला. सध्या दिवसाला दोन वेळचे मिळून साधारण १७० लिटर दूध संकलन होते. शेतकरी :  नंदू गंगाधर रोकडे गाव:  खडकी, ता. जि. नगर एकूण जनावरे :  १५ गायी, ३ वासरे एकूण दूध संकलन :  १७० लिटर आमच्याकडे जमीन क्षेत्र (२ एकर) कमी आहे. त्यामुळे दूध व्यवसायाला अधिक प्राधान्य दिले आहे. आमचा पूर्वीपासून छोटासा दूग्ध व्यवसाय होता. त्यात वाढ करत गेलो. सध्या माझ्याकडे १५ गाई व ३ वासरे आहेत. त्यातील १२ गाई दुभत्या असून त्यासाठी मुक्त संचार गोठा केलेला आहे. गाईंच्या मुक्तसंचारासाठी ७ वर्षापूर्वी गोठा बांधलेला आहे. गेल्या वर्षभरापासून दुधाचे दर सातत्याने कमी होत असल्याने दूध व्यवसाय अडचणीत आहे. मात्र, तरीही आम्ही हा व्यवसाय तग धरुन ठेवला. सध्या दिवसाला दोन वेळचे मिळून साधारण १७० लिटर दूध संकलन होते. ते दूध संकलन केंद्रावर पाठविले जाते. सध्या प्रती लिटर ३१ रुपये असा दर मिळत आहे. मी जनावरांच्या चारा, पाणी आणि आरोग्य व्यवस्थापनाला अधिक प्राधान्य देतो. त्यामुळे संभाव्य नुकसान टाळता येते. उत्पादित दुधाला पुरेसा दर मिळाला नाही तर मात्र खुराकावरील खर्च कमी करावा लागतो. दैनंदिन नियोजन 

  • गायींसाठी १०० बाय ५० फूट आकाराचा मुक्तसंचार गोठा बांधलेला आहे. गायींना अन्य वेळी बसण्यासाठी व दूध काढण्यासाठी बंदिस्तपणे २० ते ३० फूट आकाराचे शेड बांधलेले आहे.
  • सकाळी ५ वाजता व्यवस्थापनाला सुरवात होते. सुरवातीला शेण बाजूला केले जाते. त्यानंतर दूध काढण्यासाठी साधारणपणे २ तासाचा वेळ लागतो. त्यासाठी २० बाय ५० फूट आकाराच्या दोन दावणी आहेत.
  • दूध काढण्यासाठी मशिनचा वापर केला जातो. दूध काढल्यानंतर सकाळी ७ ते साडेसात आणि सायंकाळी ७ वाजता जनावरांना चारा दिला जातो.
  • चाऱ्यासाठी एकावेळी गवत, मका, ऊस यांची कुट्टी करून एकत्रित दिली जाते. सरासरी प्रती गाय २० किलो चाऱ्याची कुट्टी दिली जाते. त्यात अडीच किलो खुराक मिसळून टाकतो. सायंकाळी ४ वाजता याच पद्धतीने चारा एकत्रित करून दिला जातो.
  • शेडमध्ये पाण्यासाठी १३ फुटाच्या दोन दावणी आहेत. त्यामध्ये सकाळी ६ आणि संध्याकाळी ६ वाजता पाणी भरले जाते.
  • दररोज सकाळी ८ वाजता गोठ्यातील शेड धुवून काढले जाते.
  • गोठ्यातील शेण दररोज काढून त्याची साठवण केली जाते. दर महिन्याला साधारणपणे ३ ट्रॉली शेण साठते. प्रती ट्रॉली साडेतीन हजार रुपये याप्रमाणे शेणखताची जागेवर विक्री केली जाते.
  • चाऱ्यासाठी १ एकरावर गिन्नी गवत, १ एकरावर लसूण घास आणि अर्ध्या एकरावर उसाची लागवड केली आहे.
  • पुढील पंधरवड्यातील नियोजन 

  • या महिन्यात गरजेनुसार चाऱ्यासाठी शेतातील गिन्नी गवत, मक्याची कापणी करणार आहे.
  • शेतातील चारा कमी पडला तर बाजारातूनदेखील जनावरांसाठी चारा आणला जातो. त्यानुसार नगर येथील बाजारातून ८ दिवसाला २ टन ऊस आणला जातो.
  • जनावरांना प्रतिदिन १० ते १५ किलो खुराक लागतो. त्यानुसार येत्या ८ दिवसांचा खुराक या आठवड्यात खरेदी करणार आहे. खुराकामध्ये सरकी पेंड, गोळी पेंड, खनिज मिश्रण दिले जाते.
  • पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार ३ महिन्यातून एकदा प्रती जनावर १ जंतनाशकाची गोळी दिली जाते. या महिन्यात जंतनाशकाची गोळी देण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा मे महिन्यात गोळी दिली जाईल.
  • पशुसंवर्धन विभागाच्या सल्ल्यानुसार २ ते ३ वेळा गाईंना वेगवेगळे लसीकरण केले जाते. लाळ्या खुरकुतसाठी वर्षातून एकदा लसीकरण केले जाते. मागील लसीकरण ऑक्टोबर महिन्यात केले आहे. आता पुढील लसीकरण नोव्हेंबर महिन्यात केले जाईल.
  • मुक्तसंचार गोठा पद्धत असल्याने गायींना धुण्याची जास्त गरज लागत नाही. तरीदेखील गरजेनुसार ५ ते ६ दिवसांतून एकदा गायी धुतल्या जातात.
  • - नंदू रोकडे, ९०२२४१७०५१

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon - Agriculture News
    agrowon.esakal.com