शेतकरी नियोजन : पीक गहू

लागवडीपासून काढणीपर्यंत योग्य व सेंद्रिय पद्धतीने नियोजन करत असल्यामुळे चांगला बाजारभावही मिळण्यास मदत होते.चालू वर्षी मॉन्सूनोत्तर पाऊस आणि ढगाळ वातावरण अशी स्थिती कायम आहे. त्यामुळे वातावरणाचा अंदाज घेऊन १५ डिसेंबरनंतर पेरणीचे नियोजन केले आहे.
शरद सावंत यांच्या शेतातील ‘फुले समाधान’ वाणाचा उत्पादित गहू
शरद सावंत यांच्या शेतातील ‘फुले समाधान’ वाणाचा उत्पादित गहू

लागवडीपासून काढणीपर्यंत योग्य  व सेंद्रिय पद्धतीने नियोजन करत असल्यामुळे  चांगला बाजारभावही मिळण्यास मदत होते. चालू वर्षी मॉन्सूनोत्तर पाऊस आणि ढगाळ वातावरण अशी स्थिती कायम आहे. त्यामुळे वातावरणाचा अंदाज घेऊन १५ डिसेंबरनंतर पेरणीचे नियोजन केले आहे.   शेतकरी : शरद कारभारी सावंत   गाव : चांदोरी, ता. निफाड, जि. नाशिक   एकूण क्षेत्र : २.५ एकर (स्वतःचे), वाटा पद्धतीने ३ एकर.    गहू क्षेत्र : २.५ एकर. मी मागील १५ वर्षांपासून गव्हाचे उत्पादन घेत आहे. हवामान बदलास अनुकूल, अधिक उत्पादकता, तांबेरा प्रतिरोधक आणि चव या मुख्य बाबी पडताळून ‘फुले समाधान’ या गहू जातीची लागवड करत आहे. मागील तीन वर्षांपासूनचा या जातीचा माझा अनुभव चांगला आहे. अति थंडीमध्ये अन्य जातीच्या गहूओंब्या पिवळ्या पडतात. मात्र ‘फुले समाधान’ जातीवर  कमी आणि जास्त तापमानाचा फारसा परिणाम होत नसल्याने चांगले उत्पादन मिळते.  लागवडीपासून काढणीपर्यंत योग्य  व सेंद्रिय पद्धतीने नियोजन करत असल्यामुळे  चांगला बाजारभावही मिळण्यास मदत होते.  चालू वर्षी मॉन्सूनोत्तर पाऊस आणि ढगाळ वातावरण अशी स्थिती कायम आहे. त्यामुळे वातावरणाचा अंदाज घेऊन १५ डिसेंबरनंतर पेरणीचे नियोजन केले आहे. व्यवस्थापनातील बाबी 

  • शेतामध्ये शेणखत, कंपोस्ट खत खतांचा उपलब्धतेनुसार वापर केला जातो. शेणखत २ ते ३ वर्षांतून एकदा आणि कंपोस्ट खत दरवर्षी असे खतांचे नियोजन असते.
  • पेरणीपूर्वी जमिनीची खोल नांगरट करून सेंद्रिय खतावर जिवाणू खते पसरवून खते एकत्र केली जातात. त्यानंतर पुढील १४ ते १६ तासांत पेरणी करून लगेच पाणी दिले जाते. 
  • पेरणीसाठी एकरी साधारण ४० किलो बियाणे लागते. 
  • पेरणीपूर्वी बियाण्यांवर जैविक बुरशीनाशकांची प्रक्रिया केली जाते. त्यामुळे उगवणक्षमता चांगली होते.
  • गव्हाच्या लांबी आणि जाडीनुसार पेरणीचे नियोजन केले जाते. ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्राद्वारे पेरणी केली जाते.
  • पेरणीनंतर २१ व्या दिवसानंतर आंबवणी फुटवा अवस्थेत, तर पुढील पाणी ३६ व्या दिवशी वाफसा स्थितीचा अंदाज घेऊन दिले जाते.
  • तर ५६ व्या दिवसानंतर वाढीच्या अवस्थेत पाणी देताना स्फुरद व पालाश विरघळविणारी जिवाणू खते प्रवाही पद्धतीने पाण्यातून दिली जातात. यासाठी एकरी एक किलो प्रमाणे जैविक खते २०० लिटर पाण्यात मिसळून सलाइनद्वारे पाण्यात सोडली जातात.
  • पाच एचपी विद्युत पंपाला एक एकर भरणा करण्यासाठी ८ तास लागतात. त्यानुसार प्रति तास २५ लिटर द्रावण सोडण्याचे नियोजन असते. 
  • तण दिसून येताच निंदणी व गरजेनुसार तणनाशक फवारणी केली जाते. 
  • काढणी

  • गहू परिपक्व झाल्यानंतर कंबाईन हार्वेस्टरच्या साह्याने काढणी केला जाते.
  • एकरी सरासरी २० ते २२ क्विंटल गहू उत्पादन मिळते. 
  • दाण्यांना चकाकी व एकसारखी प्रतवारी यामुळे १८०० ते २२०० दरम्यान प्रति क्विंटल दर मिळतो. थेट विक्रीमुळे नफ्यात वाढ होते
  • -शरद सावंत, ९७६६८६४९७४

    Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

    ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com