शेतकरी नियोजन पीक : केसर आंबा

माझी एकूण १४ एकर शेती आहे. त्यापैकी ३.५ एकरावर केसर आंबा लागवड आहे.मी केसर आंब्याची २००२ साली दोन एकरांत १५ बाय २० फूट अंतरावर २०० झाडे आणि २०१० रोजी दीड एकरांत १६ बाय ८ फूट अंतरावर ३०० झाडे लावली.
Saffron Mango Garden of Gajendra Khot.
Saffron Mango Garden of Gajendra Khot.
Published on
Updated on

शेतकरी- गजेंद्र खोत गाव- टेंभूर्णी ता. जाफ्राबाद जि. जालना एकूण शेती- १४ एकर केसर आंबा - ३.५ एकर (झाडे ५००) माझी एकूण १४ एकर शेती आहे. त्यापैकी ३.५ एकरावर केसर आंबा लागवड आहे. उर्वरीत क्षेत्रामध्ये द्राक्ष २ एकर, चिकू १ एकर आणि सीताफळाची २ एकर यासह पेरू, रामफळ, आवळा, जाभूळ अशा विविध फळपिकांची लागवड आहे. याशिवाय ८ गायींचा गोठा असून त्यात प्रत्येकी ४ गीर आणि देशी गायी आहेत. गायींच्या शेणखत आणि गोमुत्राचा वापर फळबागांमध्ये केला जातो. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ याचे पालन करत सर्व फळपिकांच्या लागवडीतून नंदनवन उभारण्याचा प्रयत्न केला आहे. यंदा झाडांना मोहर चांगला लागला असून किमान २० ते २२ टन उत्पादनाची आशा आहे. मी केसर आंब्याची २००२ साली दोन एकरांत १५ बाय २० फूट अंतरावर २०० झाडे आणि २०१० रोजी दीड एकरांत १६ बाय ८ फूट अंतरावर ३०० झाडे लावली. आंबा तज्ज्ञ डॉ.भगवानराव कापसे वेळोवेळी बागेस भेट देऊन मार्गदर्शन करत असतात. त्यानुसार संपूर्ण बागेचे व्यवस्थापन केले जाते. व्यवस्थापनातील बाबी 

  •  दरवर्षी जून महिन्यामध्ये प्रति झाड ४० किलो शेणखत २ वेळा विभागून दिले जाते. याशिवाय ३ किलो युरीया, ३ किलो सिंगल सुपर फॉस्फेट, १ किलो पोटॅशची मात्रा दोन वेळा विभागून दिली जाते.
  •  ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी बाग ताणावर सोडली जाते. हा ताण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तोडतो.
  •  ताण तोडल्यानंतर बागेस एक दिवसाआड ३ तास पाणी दिले जाते.
  •  माझ्याकडे ३ विहीरी आणि १ शेततळे असून त्यातील पाणी ठिबकद्वारे झाडांना दिले जाते.
  •  तण नियंत्रणासाठी शिफारशीत तणनाशकांचा वापर ऑगस्टच्या शेवटी आणि फेब्रुवारीमध्ये केला जातो. याशिवाय अधूनमधून औताच्या सहाय्यानेही तण नियंत्रण करतो.
  •  बागेमध्ये आजपर्यंत करपा, भूरी, पाने खाणारी अळी, तुडतुडे, फुलकिडे आदींचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. कीड-रोगांचा प्रादुर्भाव ओळखून नियंत्रणासाठी शिफारशीप्रमाणे कीटकनाशक आणि बुरशीनाशकांचा वापर केला जातो.
  • पुढील महिनाभराचे नियोजन 

  •  सध्या बागेत हरभरा ते बोराच्या आकाराची फळे लागली आहेत. फळगळ नियंत्रणासाठी आणि आकार वाढीसाठी जिब्रेलिक ॲसिड आणि नॅप्थील ॲसिटिक ॲसिड (एनएए) यांचा वापर केला जाईल.
  •  सध्या तापमान वाढण्यास सुरुवात झाली आहे. बागेत गारवा राहण्यासाठी २ ते ३ वेळा मोकळे पाणी दिले जाईल.
  •  वेळापत्रकानुसार ठिबकद्वारे विद्राव्य खते दिली जातीत.
  •  साधारण एप्रिल ते मे महिन्याच्या शेवटी फळे तोडणीयोग्य होतील.
  • उत्पादन 

  •  मागील वर्षी बागेतून १५ टन आंबा उत्पादन मिळाले. त्यास प्रतिकिलो साधारण १०० ते १५० रुपये इतका दर मिळाला.
  •  सर्व आंबा फळांची विक्री घरूनच ग्राहकांना थेट विक्री केली जाते. त्यामुळे दरही चांगला मिळतो.
  •  यावर्षी २० ते २२ टन आंबा उत्पादनाची अपेक्षा आहे.
  • रायपनिंग चेंबरची करणार उभारणी  ग्राहकांना थेट विक्री केल्यामुळे गतवर्षी सुमारे १५ लाखांचे उत्पन्न मिळाले. थेट विक्रीमुळे अधिक चांगला दर मिळतो. बागेतील आंब्यास जाफ्राबाद, भोकरदन, बुलडाणा जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून मागणी वाढत आहे. त्यामुळे यावर्षी घरगुती स्तरावर रायपनिंग चेंबर उभारणी करण्याचा विचार करत आहे. यावर्षी जून-जुलै महिन्यात २ एकरावर अतिघन पद्धतीने केसर आंब्याची लागवड करण्याचे नियोजन आहे. - गजेंद्र खोत : ९१५६४२९५१२  

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com