Banana Crop: शेतकरी नियोजन पीक केळी

माझा मृग बहर केळी लागवडीवर भर आहे. या केळीची लागवड प्रामुख्याने मे, जून, जुलै व ऑगस्ट या महिन्यांत केली जाते. मृग बहरातील लागवडीच्या बागेचे अधिक लाभ आहेत. शिवाय दरही चांगला मिळतो. रोगाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो, असा माझा अनुभव आहे. सध्या ३५ हजार केळी कांदे बागेतील झाडांची काढणी पूर्ण होत आली आहे.
banana orchard is covered with Green net
banana orchard is covered with Green net

माझा मृग बहर केळी लागवडीवर भर आहे. या केळीची लागवड प्रामुख्याने मे, जून, जुलै व ऑगस्ट या महिन्यांत केली जाते. मृग बहरातील लागवडीच्या बागेचे अधिक लाभ आहेत.

शिवाय दरही चांगला मिळतो. रोगाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो, असा माझा अनुभव आहे. सध्या ३५ हजार केळी कांदे बागेतील झाडांची काढणी पूर्ण होत आली आहे. तर मृग बागेतील २५ हजार केळी झाडांची काढणी सुरू होत आहे. या दोन्ही बागांच्या व्यवस्थापनासाठी कार्यवाही सुरू आहे.

शेतकरी :     प्रेमानंद हरी महाजन

गाव   :   तांदलवाडी, ता. रावेर, जि. जळगाव

एकूण क्षेत्र  :  ११० एकर.

केळीखालील क्षेत्र  :   ६० एकर (९० हजार झाडे)

माझी एकूण ११० एक शेती आहे. त्यापैकी ६० एकरांत विविध टप्प्यांत केळीची लागवड केली आहे. माझा मृग बहर केळी लागवडीवर भर आहे. या केळीची लागवड प्रामुख्याने मे, जून, जुलै व ऑगस्ट या महिन्यांत केली जाते. मृग बहरातील लागवडीच्या बागेचे अधिक लाभ आहेत.

शिवाय दरही चांगला मिळतो. रोगाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो, असा माझा अनुभव आहे. सध्या ३५ हजार केळी कांदे बागेतील झाडांची काढणी पूर्ण होत आली आहे. तर मृग बागेतील २५ हजार केळी झाडांची काढणी सुरू होत आहे. या दोन्ही बागांच्या व्यवस्थापनासाठी कार्यवाही सुरू आहे. पिलबागेचे नियोजन 

 1. बागांची  साडेपाच बाय साडेपाच फूट आणि ६ बाय ६ फुटांवर लागवड करण्यात आली आहे.

 1. ज्या ३५ हजार केळी झाडांची काढणी पूर्ण होत आली आहे. त्यात फेब्रुवारी अखेरीस पिलबाग (खोडवा) नियोजन करण्यात आले आहे.

 1. यातील १२ हजार झाडांमध्ये पिलबाग घेणार आहे. ज्या झाडाचा घड २० ते ३० दिवसांत काढणीवर येणार होता, त्या झाडांचे फुटवे (पिल) तसेच सोडून दिले आहेत. 

 1. काढणी झाल्यानंतर संबंधित झाडाची पाने काढून बागेची स्वच्छता केली. रोगग्रस्त पाने बागेबाहेर काढून जाळली.

 1. मागील २० ते २५ दिवसांपासून फुटव्यांना प्रतिदिन प्रतिझाड किमान २४ लिटर पाणी दिले जात आहे. 

 1. सध्या तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे पाणी व्यवस्थापनावर विशेष भर देत आहे.

 1. उष्णतेपासून बागेचे संरक्षण होण्यासाठी बागेच्या पश्‍चिम व दक्षिण बाजूस हिरवी शेडनेट लावण्यात आली आहे.

 1. शेवरी, निरगुडी, उंच वाढणारे संकरित गवत ही लावण्यात आले आहेत.

 1. २५ हजार केळी झाडे असलेल्या बागेत काढणी लवकरच सुरू होईल. त्या बागेत ड्रीपमधून मिश्र खते, सूक्ष्‍म अन्नद्रव्ये देत आहे. या बागेला प्रतिदिन प्रतिझाड ३५ लिटर पाणी दिले जाते.

 1. या बागेत पिलबाग घेण्याचे नियोजन नाही. त्यामुळे खोडाभोवती (झाडाच्या खांबानजीक) वाढलेले फुटवे कापत आहे. कारण फुटवे मुख्य झाडासोबत अन्नद्रव्ये आणि पाण्यासाठी स्पर्धा करतात. त्यामुळे फुटवे काढून त्याच सरीमध्ये नैसर्गिक आच्छादन म्हणून टाकली आहेत. 

पुढील १५ दिवसांचे नियोजन 

 • आगामी काळात तापमान ४१ ते ४२ अंश सेल्सिअसच्या वर जाईल. त्यानुसार पाण्याची मात्रा वाढवली जाईल.
 • पिलबागेचे व्यवस्थापन केलेल्या बागेत पालाश, स्फुरद व सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा दिली जाईल. तसेच सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि दुय्यम खतेही दिली जातील. 
 • गरजेनुसार तणनियंत्रण करावे लागणार आहे. फुटवे सतत येत आहेत. ते काढले जातील.
 • फुटव्यांची वाढ कशी आहे, हे लक्षात घेऊन खत व्यवस्थापनासंबंधीचा कालावधी निश्‍चित केला जाईल.
 • काढणीवर आलेल्या बागेस प्रतिदिन प्रतिझाड किमान ४० लिटर पाणी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यानंतर दिले जाईल. कारण काढणीवरील बागेस पाण्याचा ताण बसल्यास नुकसान होण्याची शक्यता असते. 
 • निसवण होत असलेल्या घडांचे उन्हापासून संरक्षण होण्यासाठी त्यावर बागेतील कोरड्या पानांचा गठ्ठा ठेवला जाईल. फुटवे वाढणार नाहीत, यावरही लक्ष दिले जाईल.
 • काढणी साधारणपणे एप्रिलमध्ये सुरू होईल. उतिसंवर्धित रोपे असल्याने काढणी एकाच वेळी अर्ध्या बागेत होऊ शकते. यामुळे काढणी अर्ध्या बागेत आटोपल्यानंतर या बागेचे खत व्यवस्थापन बंद केले जाईल.
 • - प्रेमानंद महाजन,  ९७६३८९३७७७  (दुपारी दोन ते तीन या वेळेत संपर्क साधावा.)

  Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

  ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  agrowon.esakal.com