शेतकरी कंपन्यांना व्यवसाय उभारणीसाठी उद्यम परवाना

उद्यम नोंदणी ही एमएसएमईसाठी नोंदणीची नवीन प्रक्रिया आहे. यासाठी फक्त आधार आणि पॅन कार्ड आवश्यक असते. उद्यम नोंदणी ही दोन दिवसाxत पूर्ण होते. तुमच्या ई-मेल आयडीवर त्याचे प्रमाणपत्र प्राप्त होते.
Having an enterprise license makes it possible for a farmer company to set up a business.
Having an enterprise license makes it possible for a farmer company to set up a business.
Published on
Updated on

उद्यम नोंदणी ही एमएसएमईसाठी नोंदणीची नवीन प्रक्रिया आहे. यासाठी फक्त आधार आणि पॅन कार्ड आवश्यक असते. उद्यम नोंदणी ही दोन दिवसाxत पूर्ण होते. तुमच्या ई-मेल आयडीवर त्याचे प्रमाणपत्र प्राप्त होते.  शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पर्यायी बाजार निर्मितीच्या दृष्टीने व व्यवसाय उभारणीच्या दृष्टीने विविध परवाने प्राप्त करून घेण्यासाठी संकेतस्थळांना भेट देऊन आपल्या कंपनीचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे. सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणारा उद्यम परवाना घेताना काही ठळक बाबी निर्दशनास आलेल्या असून त्यात काही बदल झालेले आहेत. एमएसएमई नोंदणी ही एमएसएमई खात्यांतर्गत उद्योगांच्या नोंदणीसाठी जुनी प्रक्रिया होती. त्याचप्रमाणे त्यात अतिरिक्त फॉर्म समाविष्ट होते. उद्यम नोंदणी ही एमएसएमईसाठी नोंदणीची नवीन प्रक्रिया आहे, ज्यासाठी फक्त आधार आणि पॅनकार्ड आवश्यक असते.  उद्यम नोंदणी ही दोन दिवसात पूर्ण होते. तुमच्या ईमेल आयडीवर त्याचे प्रमाणपत्र प्राप्त होते. शेतकरी उत्पादक कंपनी किंवा उद्योजक यांनी उद्यम नोंदणी केली असेल आणि त्यांना पत्त्यामध्ये राज्य आणि जिल्हा किंवा इतर बदल करावयाचे असल्यास त्यांना तसा बदल करता येत नाही. तथापि, त्याच शहरात किंवा नगरात संस्था स्थलांतरित झाल्यास तुम्हाला स्थानिक पत्ता बदलता येऊ शकतो. याकरिता एमएसएमई च्या शासकीय पोर्टलवर  (https://udyamregistration.gov.in/Government-India/Ministry-MSME-registration.htm) जाऊन आवश्यकते नुसार बदल करावेत.  एखाद्या व्यक्तीकडे किंवा संस्थेकडे २ पेक्षा जास्त उद्यम नोंदणी असू शकत नाही. एक व्यक्ती किंवा संस्था त्यांच्या पॅनकार्ड व आधारकार्ड सह फक्त १ उद्योगासाठी अर्ज सादर करू शकते.  शेतकरी उत्पादक कंपन्या किंवा इतर संस्था उद्यम प्रमाणपत्रासह कर्जासाठी सहज अर्ज करू शकतात. एमएसएमई(सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योग) यांना सरकारकडून प्राथमिक क्षेत्रातील कर्जाचा लाभ दिला जात असल्याने संस्थांना तारणा शिवाय आणि कमी व्याजदरात विविध वित्तीय संस्थांकडून कर्ज सहजपणे मिळू शकते.  चालू आर्थिक वर्षात सुमारे ७५ लाख उद्योगांनी उद्यम नोंदणी केली असून त्यात ७१ लाख सूक्ष्म, ३ लाख लघू व ३५ हजार मध्यम उद्योगांनी नोंदणी केलेली आहे.

  •  एमएसएमई / उद्यम नोंदणी प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाइन, कागद विरहित व स्वघोषणापत्रावर आधारित असते.
  • नोंदणीकरीता आधार नंबर व्यतिरिक्त कोणतेही कागदपत्र लागत नाही.
  • पॅन व जीएसटी नंबरशी जोडलेले सर्व व्यवहार व संस्थेची उलाढाल शासनाच्या माहिती पोर्टलवरुन आपोआप घेतली जाते.
  • एमएसएमई चे संकेतस्थळ इन्कम टॅक्स आणि  जीएसटी च्या संकेतस्थळाशी थेट जोडलेले असते.
  • एप्रिल २०२१ पासून पॅन, आधार व जीएसटी इन (GST IN) उद्यम नोंदणीकरीता आवश्यक आहे.(CGST Act २०१७)
  •   ज्या संस्थांकडे यापूर्वी EM-II / UAM नोंदणी / इतर नोंदणी केल्याचे प्रमाणपत्र असेल त्यांनी पुन्हा उद्यम नोंदणी करावी.
  • उद्यम प्रमाणपत्र आजीवन वैध असते. तुम्ही उद्यम नोंदणीसाठी अर्ज केला की, तुम्ही ते आयुष्यभर वापरू शकता. तथापि, तुम्हाला उद्यम नोंदणीमधील चुका दुरुस्त करायच्या असतील तर तुम्ही उद्यम नोंदणीच्या अधिकृत वेबसाइटवरून तुमचे तपशील अदयावत करू शकता.
  • नोंदणीबाबत काही इतर बाबी 

  • उद्यम नोंदणी अर्ज पोर्टलवर उपलब्ध असतो.
  • उद्यम नोंदणीकरीता कोणतीही फी लागत नाही.
  • आधार नंबर उद्यम नोंदणीकरिता आवश्यक
  • प्रोप्रायटर फर्मच्या बाबतीत आधार नंबर प्रोप्रायटरचा असावा, भागीदारी संस्था बाबतीत आधार नंबर भागीदाराचा असावा आणि हिंदू अविभाज्य कुंटुबांच्या बाबतीत (HVF) आधार नंबर कुटुबांच्या करत्या पुरुषाचा असावा.
  • एक उद्योजक एक पेक्षा जास्त उद्यम प्रमाणपत्र घेऊ शकत नाही. यात फक्त उत्पादक किंवा सेवापुरवठादार किंवा दोन्ही उपक्रम याबाबत माहिती देणे बंधनकारक असते.
  • उद्यम नोंदणी करताना संस्था किंवा उद्योजक यांच्याकडून चुकीची माहिती सादर केल्याचे निदर्शनास आल्यास सेक्शन २७ नुसार सदर संस्था किंवा उद्योजक यांना दंड होऊ शकतो. 
  • केंद्रीय मंत्रालयाच्या प्रोत्साहनपर योजना शासकीय योजना कोणत्याही शेतकरी कंपनीने आपला हक्क असल्याप्रमाणे गृहीत न धरता व्यवसाय करताना खरोखर ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी अशा शासकीय योजनांचे सहकार्य घ्यावे. एमएसएमई मंत्रालयाने उद्योगांना बँकांशी जोडण्यासाठी, त्याचप्रमाणे उद्योगातील कमी कालावधीसाठी भांडवल उपलब्धीसाठी विविध प्लॅटफॉर्मला लिंक करण्याच्या सूचना केल्या आहेत. अशा प्रकारचे प्लॅटफॉर्म च्या संकेतस्थळावर उपलब्ध असून महाराष्ट्र सहकार विकास महामंडळामार्फत अशा तरतुदी शेतकरी कंपन्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. याकरिता rxil m१xchange, invoicemart  अशा केंद्र शासनाने सुचविलेल्या प्लॅटफॉर्मसोबत करार करून शेतकरी कंपन्यांना पुढील विक्रीचे ‍नियोजन, खेळते भांडवल अशा गरजा भागविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय मंत्रालयाने काही प्रोत्साहनपर योजना एमएसएमई विभागामार्फत तयार केले आहे.

    चॅम्पियन  या प्रोत्साहनपर योजनेत सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांनी पुढील प्रगती करून मोठ्या उद्योगात रूपांतरित व्हावे, याकरिता अशा उद्योगांच्या अडचणी कमी करण्यात येणार आहेत. योजनेचे उद्देश 

  •   एमएसएमई यांना येणाऱ्या अडचणी जसे की, आर्थिक तरतूद ,कामगार, यांत्रिक मान्यता, कच्चा माल याकरिता सहकार्य करणे.
  •   सेवा व उत्पादक क्षेत्रातील नवीन संधी बाबत सहकार्य करणे.
  •   हुशार व कष्टाळू उद्योगांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी सहकार्य करणे.
  • या योजनेत सहभागी होण्यासाठी एक खिडकी योजना तयार करण्यात आली आहे. यासाठी अधिक माहिती करिता champions.gov.in/Ministry-MSME/single_window_system/Problems_complaints_grievanceshtm या लिंकला भेट देण्यात यावी. 
  • एमएसएमईच्या विविध योजनांसाठी  www.msme.gov.in  या संकेतस्थळास भेट देऊन विविध योजनांची माहिती घेऊन अर्ज करावेत. 
  • एमएसएमई – समाधान  ज्या उद्योगांनी कच्चा माल व प्रक्रिया केलेला माल बाजारात घेणे व विकणे असे व्यवहार केलेले आहेत परंतु दोन्ही बाजूने ठरलेल्या वेळेनुसार पुरवठादारांकडून किंवा खरेदीदारांकडून वेळेत पैशांची देवाण-घेवाण झालेली नाही अशा उद्योगांना साह्य करण्यासाठी व आलेल्या अडचणीवर तोडगा काढण्यासाठी एमएसएमई – समाधान योजना तयार करण्यात आलेली आहे.  ज्या सूक्ष्म उद्योगाकडे उद्यम परवाना आहे ते उद्योग या योजनेसाठी अर्ज करू शकतात. याकरिता https://samadhaan.msme.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन अधिक माहिती घ्यावी. चालू आर्थिक वर्षात १०,५६६८ कोटी रुपयांच्या प्रक्रिया केलेल्या मालाची उलाढाल झालेली असून, यामध्ये महिलांनी सुरू केलेल्या उद्योगातून ८१२ कोटींची उलाढाल झालेली आहे. उर्वरित उलाढाल इतर उद्योगांनी  केलेली आहे. एमएसएमई – संबंध  ज्या उद्योगांनी प्रक्रिया केलेला मालविक्रीसाठी बाजारात आणलेला आहे, त्यांच्याकरिता खरेदीदार व विक्रेता यांच्यासाठी प्लॅटफॉर्म तयार करण्यात आलेला आहे याकरिता या https://sambandh.msme.gov.in संकेतस्थळास भेट देण्यात यावी. चालू आर्थिक वर्षात ४१,३४७ उद्योगांनी याकरिता अर्ज केला असून, १३,३४७ उद्योगांना या योजनेचा फायदा झालेला आहे.      एमएसएमई – संपर्क  या योजनेत देशातील विविध स्तरावरील रोजगार देणारे, रोजगार शोधणारे अशा दोन्ही उद्योगांतील व्यक्तींना फायदा होणार आहे याकरिता sampark.msme.gov.in   या संकेतस्थळाला भेट द्यावी. उद्योजक कौशल्य ‍विकास कार्यक्रम (ESDP)  सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगातील कर्मचाऱ्यांमध्ये कौशल्य विकास व्हावा यासाठी या विभागामार्फत विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जातात. या विभागामार्फत आतापर्यंत ८,७६६ प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आले असून, सुमारे २,८६,२८७ प्रशिक्षणार्थ्यांना त्यांचा फायदा झालेला आहे. अधिक माहितीसाठी व प्रशिक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी  https://msmedi.dcmsme.gov.in/ या संकेतस्थळाला भेट देऊन आपण निवडलेल्या उद्योगाच्या गरजेनुसार प्रशिक्षण घ्यावे. उद्यम परवाना ‘एमएसएमई’अंतर्गत नोंदणीचे फायदे 

  •   उद्योगांकरिता तारणविरहित कर्ज.
  •   विविध करात सूट.
  •   विविध नोंदणीवर सूट / अनुदान.
  •   पतपुरवठा.
  •   क्रेडिट सुविधा.
  •   कर्ज हप्ता भरण्यात उशीर झाल्यास संरक्षण. 
  •   प्रक्रिया, उत्पादन क्षेत्रातील संस्थांना आरक्षण.
  •   व्यवसाय परवाने, मंजूर नोंदणीकरिता अतिशीघ्र व पारदर्शक प्रक्रिया.        
  •   आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांकरिता साह्य.
  •   शासकीय सुरक्षा निधीपासून मुक्तता / साह्य.
  •   करात सूट.
  •   वीजबिलात सूट.
  •   स्टॅम्प ड्युटूमध्ये सूट.
  •   आयएसओ प्रमाणपत्रामध्ये तरतूद.
  •   कर्जाच्या ओव्हरड्राफ्टवरील व्याजात १ टक्का सूट.
  •   बारकोड नोंदणीमध्ये तरतूद.
  •   राज्य उत्पादन शुल्कात सूट.
  •   पेटंट नोंदणीत ५० टक्के सूट.
  • - प्रशांत चासकर,  ९९७०३६४१३० (राज्य कृषी व्यवस्थापन व पणन तज्ञ, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या., पुणे)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com