अधिक उत्पादनक्षम, भुरी प्रतिकारक स्नो पी ः स्वर्ण तृप्ती

स्नो पी किंवा चायनीज पी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शेंगाचे शास्त्रीय नाव Pisum sativum L. असे आहे. या शेंगा पातळ सालीच्या आणि तंतू विरहित असतात. या शेंगाची काढणी बिया तयार होण्याच्या पुरेशा आधी, त्या सपाट असतानाच केली जाते.
disease resistant variety snow pea golden trupti
disease resistant variety snow pea golden trupti
Published on
Updated on

स्नो पी किंवा चायनीज पी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शेंगाचे शास्त्रीय नाव Pisum sativum L. असे आहे. या शेंगा पातळ सालीच्या आणि तंतू विरहित असतात. या शेंगाची काढणी बिया तयार होण्याच्या पुरेशा आधी, त्या सपाट असतानाच केली जाते. स्नो पी किंवा चायनीज पी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शेंगाचे शास्त्रीय नाव Pisum sativum L. असे आहे. या शेंगा पातळ सालीच्या आणि तंतू विरहित असतात. या शेंगाची काढणी बिया तयार होण्याच्या पुरेशा आधी, त्या सपाट असतानाच केली जाते. या शेंगा अत्यंत पोषक असून, कच्च्या स्वरूपात सॅलड म्हणून किंवा भाजी करून खाल्ल्या जातात. आपल्या देशातील पूर्वेकडील राज्यांमध्ये ऑक्टोबर ते मार्च या काळामध्ये त्यांची लागवड करणे शक्य आहे. मात्र, या शेंगाची व्यावसायिक लागवड करण्यासाठी आजवर सुधारित जात उपलब्ध नव्हती. मात्र, भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या रांची (झारखंड) येथील पर्वतीय आणि पठारी प्रदेशासाठी कृषी प्रणाली संशोधन केंद्रामध्ये १९९९ पासून पैदास कार्यक्रम राबवण्यात आला. त्यामध्ये स्नो पीची स्वर्ण तृप्ती ही जात विकसित करण्यात आली आहे. HASP-१ही जात भुरी रोगासाठी प्रतिकारक असून, तिचा विकास हिरव्या शेंगा आणि भुरीसाठी प्रतिकारक असलेल्या JP-५८५ आणि फिक्कट हिरव्या मात्र, भुरीसाठी संवेदनशील असलेल्या स्नो पी जातीपासून संकरीकरणातून करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षापासून झारखंड, बिहार आणि पश्चिम बंगाल येथे शेतकऱ्यांच्या शेतामध्येही चांगल्या प्रकारे उत्पादन देत आहे. ही नवी जात भुरी रोगासाठी प्रतिकारक असून, त्यावरील सरासरी रोग प्रादुर्भावाचा दर १ ते ५ च्या निकषावर १.५ इतकाच आहे. उत्तम गुणवत्ता आणि विविध वातावरणामध्येही चांगल्या प्रकारे येण्याची क्षमता पाहता २००८ मध्ये स्वर्ण तृप्ती या जातीला संपूर्ण भारतामध्ये व्यावसायिक लागवडीसाठी म्हणून प्रसारित करण्यात आले. वैशिष्ट्ये  स्नो पी लागवड पठारी प्रदेशात प्रामुख्याने हिवाळी हंगामात करणे योग्य असून, पर्वतीय प्रदेशामध्ये बिगरहंगामीही घेता येते. झारखंडमध्ये अर्ध रब्बी आणि उन्हाळी ( जानेवारी ते एप्रिल) या काळामध्ये लागवड शक्य आहे. लागवडीनंतर ८० ते ८५ दिवसामध्ये पीक काढणीला येते. स्नो पीच्या शेंगा पातळ कडांच्या, फायबररहित असून, बऱ्यापैकी सपाट असतात. शेंगाचा आकार ७.३-७.५ सेंमी x १.८५-१.८८ सेंमी असून, मॉल आणि निर्यातीमध्ये चांगली मागणी आहे. हिरव्या शेंगाचा २४० ते २८० क्विंटल प्रति हेक्टर इतके उत्पादन मिळते. या शेंगांना १० ते १६ रुपये प्रति किलो असा दर साधारणपणे मिळतो. प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडील लागवड

  • रांची येथील कृषी ग्राम विकास केंद्रातर्फे या जातींच्या हिरव्या शेंगाचे उत्पादन घेऊन पंचतारांकित हॉटेल्समध्ये विक्री केली जात आहे.
  • मुझफ्फरपूर (बिहार) येथील लिची निर्यातदारांच्या वतीने स्वर्ण तृप्तीच्या शेंगा निर्यातीसाठी उत्तम असून, निर्यातीमध्ये त्यांना चांगली मागणी राहू शकते, असे सांगितले आहे.
  • महाराष्ट्रामध्ये वरपूड (जि. परभणी) येथील शेतकरी चंद्रकांत देशमुख हे स्वर्ण तृप्ती या जातीच्या स्नो पी चे उत्पादन घेत आहेत.
  • स्नो पी शेंगामध्ये तंतूमय पदार्थ नसल्याने वेगाने पचते. त्यातील प्रथिनांचे व पोषक घटकांचे प्रमाणही अधिक असल्याने स्वर्ण तृप्ती या जातीच्या शेंगाचा समावेश झारखंड येथील एनएआयपी आणि एव्हिआरडिसी (तैवान) - एसआरटीटी (मुंबई) यांच्या तर्फे चालवण्यात येणाऱ्या शाश्वत उपजीविका सुरक्षा कार्यक्रमामध्येही केला आहे.
  • संपर्क ः डॉ. आर. एस. पान, ०९४३१९१६६१५ (प्रमुख शास्त्रज्ञ आणि पैदासकार, फळबाग- भाजीपाला , आयसीएआर, पूर्वेकडील पर्वतीय आणि पठारी प्रदेशासाठी शेती प्रणाली संशोधन केंद्र, नमकुम, रांची, झारखंड.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com