शेतकरी उत्पादक कंपन्यांचे डिजिटायझेशन

डिजिटायझेशन तंत्रज्ञानामुळे शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) खरेदीदारासोबत संपर्क साधण्यास सक्षम होऊ शकतात. यामुळे त्यांची विश्वासार्हता वाढते; निरंतर गुणवत्ता आणि सातत्य यामुळे खरेदीदार हे शेतकरी कंपनीकडून आगाऊ बुकिंग करण्यास तयार होतील.
Digitization of farmer producer companies
Digitization of farmer producer companies
Published on
Updated on

डिजिटायझेशन तंत्रज्ञानामुळे शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) खरेदीदारासोबत संपर्क साधण्यास सक्षम होऊ शकतात. यामुळे त्यांची विश्वासार्हता वाढते; निरंतर गुणवत्ता आणि सातत्य यामुळे खरेदीदार हे शेतकरी कंपनीकडून आगाऊ बुकिंग करण्यास तयार होतील.   अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आणि उत्पादकांची एकत्रित वाटाघाटी करण्याची क्षमता सुधारण्याचा एक मार्ग म्हणून सहकारी संस्थानी दीर्घ काळ काम केले आहे. १९९५ च्या म्युच्युअल एडेड कोऑपरेटिव्ह सोसायटी अॅक्ट (एमएसीएस) नुसार अंतर्गत बऱ्याच  शेती सहकारी संस्था अस्तित्वात आल्या आहेत. शेतमालाचे एकत्रीकरण अधिक बळकट होण्याच्या अनुषंगाने कंपनी अधिनियमान्वये एफपीओ नोंदणीसाठी २०१३ मध्ये शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) धोरण सुरू केले. त्याअनुषंगाने १० शेतकऱ्यांना एकत्रित घेऊन कंपनी कायदा २०१३ सेक्शन ५८१-सी अंतर्गत नोंदणी झालेली संस्था म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी. अशा प्रकारच्या शेतकरी उत्पादक कंपन्यांची देशामध्ये नोंदणी होऊन पर्यायी बाजारपेठ उभारण्याच्या दृष्टीने पाऊल उचलेले आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शेतकरी समूहामार्फत  गुंतवणूक, तंत्रज्ञानाचा वापर, निविष्ठा विक्रीचे व्यवस्थापन  आणि बाजारपेठांशी जोडणी या माध्यमातून शेतकरी कंपनीचा प्रवास पर्यायी बाजारपेठेच्या दृष्टीने होणार आहे. कृषी क्षेत्रातील आव्हाने

  • शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) आणि अन्न प्रक्रिया उद्योजक, घाऊक खरेदीदारांना मागणी-पुरवठा डेटा कनेक्ट करण्याचा आणि देवाणघेवाण करण्याचा सोपा मार्ग नाही. बहुतेक एफपीओमध्ये मार्केट लिंकेज आणि त्यांच्या भागधारक सदस्यांद्वारे उत्पादित केलेल्या वास्तविक उत्पादनाविषयी आणि त्यांच्या दिवसाच्या कामकाजाचा समन्वय यामध्ये तफावत आहे.
  • शेतकरी उत्पादक संस्था, फेडरेशन किंवा सहकारी समूहासारख्या आपल्या संस्थांना दैनंदिन कामकाज करण्यासाठी कमी भांडवलाची गुंतवणूक आवश्यक आहे. 
  • एफपीओ भागधारक सदस्य व्यवस्थापन, निविष्ठा आणि व्यवसायाकरिता विक्री आणि स्टॉक व्यवस्थापन, विविध डॅशबोर्ड्‌स, भागीदार व भागीदारांशी निर्णय घेणे इत्यादीसाठी   सर्व माहिती असणे आवश्यक आहे .
  • कंपन्यांचे  व्यवस्थापन  बहुतेक शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) तुलनेने नवीन आहेत.  उपलब्ध मनुष्यबळाचा वापर करून चालविल्या जात आहेत. एफपीओच्या दैनंदिन कामकाजासाठी भागधारक शेतकरी, एमसीडीसी सारख्या आधार देणाऱ्या संस्था आणि इतर घटक जसे की खरेदीदार, पुरवठादार  आणि वाहतूक क्षेत्रातील व्यक्ती यांच्यात समन्वय साधणे आवश्यक आहे. एफपीओच्या कामकाजाची गती आणि यशस्वी प्रमाणात कामकाजातील दैनंदिन समन्वय, कार्यालय व्यवस्थापन आणि क्षेत्रीय स्तरावरील व्यवस्थापन करण्यासाठी मनुष्यबळाचा खर्च शेतकरी कंपन्यांना परवडणारा नाही.  कार्यालयीन खर्च कमी करण्यासाठी सामान्य एफपीओ सहसा दोन किंवा तीन कर्मचाऱ्यासह कामकाज करतात. यासाठी कामकाजाचे लेखे ठेवणे आणि रेकॉर्ड बुक ठेवणे यामुळे त्रुटीची शक्यता वाढते. व्यवसायातील व्यवहारांमध्ये ताळमेळ घालणे कठीण होऊन बसते. यामुळे एफपीओसाठी सोप्या डिजिटल साधनांची निर्मिती करणे आवश्यक असून एफपीओ कर्मचाऱ्यांची कार्यकुशलता सुधारण्यास मदत होऊ शकते.  त्याचप्रमाणे सोप्या आणि सुरक्षित पद्धतीने सर्व व्यवसायातील सर्व व्यवहारांचा डिजिटल मागोवा घेण्यास मदत होऊ शकते.  संकेतस्थळाची सुरुवात

  • आपण निवडलेला संकेतस्थळ निर्माण कर्ता व आपल्या संकेतस्थळाची क्लिष्टता यावर संकेतस्थळ निर्मितीचा खर्च ठरतो. संकेतस्थळ निर्मिती व्यतिरिक्त वेबसाइट होस्टिंगकरिता अत्यंत कमी खर्च येतो. परंतु प्रति रुपया होणाऱ्या फायद्याचे मूल्य अधिक असते. 
  • संकेतस्थळ निर्मितीकरिता साधारणपणे दहा हजार रुपये खर्च होतो. आपल्या शेतकरी कंपनीच्या व्यवसाय आराखड्यानुसार आपल्या व्यवसायातील परतावा पाच वर्षांत होणार असेल, तर आपण संकेतस्थळासाठी गुंतवलेला निधी एकाच विक्रीमध्ये किंवा एकाच व्यवहारात मिळू शकतो. संकेतस्थळाचा फायदा कायमचा होत राहतो. 
  • संकेतस्थळाबद्दल महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकदा त्यात गुंतवणूक केल्यास ते कायमचे कार्यरत असते. 
  • संकेतस्थळामुळे जगातील कुणालाही व्यवसाय व उत्पादन शोधणे शक्य होते. आपल्या कडील उत्पादन सहज विक्रीयोग्य असेल तर आपण ऑनलाइन ग्राहक खूप लवकर वाढवू शकतो. संकेतस्थळामुळे आपल्या भौगोलिक क्षेत्रापलीकडील ग्राहक सुद्धा उपलब्ध होऊ शकतात.
  • संकेतस्थळ आपल्या शेतकरी कंपनीचे अधिकारी,कर्मचारी, ग्राहक यांच्याकरिता डेटा सेंटर म्हणून कार्य करते. मजुरीचे तास आणि खर्च वाचवण्यासाठी वेबसाइट डेटा केंद्र म्हणून वापरली जातात. आपल्या उत्पादनाचे विविध प्रकार, प्रतवारी, मानांकने याचा पेपर कॅटलॉग बनविण्याऐवजी डिजिटल कॅटलॉगमुळे पैशांची बचत होते.
  • संकेतस्थळामुळे ग्राहक सेवा सुधारणे शक्य होते.
  • संकेतस्थळावर द्यावयाची माहिती

  • संचालक व अधिकारी वर्गाविषयी थोडक्यात माहिती.
  • शेतकरी कंपनीच्या स्थापनेविषयी माहिती.
  • शेतकरी कंपनीचा उद्देश, ध्येय, शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सेवा 
  • शेतकरी कंपनीचे सद्यसः्थितीतील उपक्रम, यापूर्वीचे उपक्रम 
  • संपर्क क्रमांक, गुगल लोकेशन 
  • कंपनीस मिळालेले पुरस्कार
  • फोटो गॅलरी, कंपनी ब्रॅण्ड इमेज, प्रॉडक्ट लोगो 
  • शेतकरी कंपनीकडे असलेल्या उत्पादनांची यादी व फोटो
  • आगामी आकर्षण. डिजिटल स्टोअर लिंक 
  • - प्रशांत चासकर, ९९७०३६४१३०. (कृषी व्यवसाय पणन व्यवस्थापक, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या., साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com