
नत्र,स्फुरद आणि इतर अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढवण्यासाठी जिवाणू संवर्धके फायदेशीर ठरतात. रासायनिक खतांची अंशतः गरज भागविण्यासाठी जिवाणू संवर्धनाचा वापर करणे महत्त्वाचा आहे. वातावरणात सुमारे ७८ टक्के मुक्त नत्र वायुरुपात अस्तित्वात आहे. या मुक्त नत्राचा उपयोग स्वतः:करिता करून घेण्याची क्षमता फक्त कडधान्य पिके आणि द्विदल तेलबिया पिकांमध्ये आहे. कारण या पिकांच्या मुळांवरील गाठीमध्ये रायझोबियमचे सूक्ष्म जिवाणू असतात. हे जिवाणू वातावरणातील नत्र शोषून मुळांच्या गाठीमध्ये एकवटून विकराच्या मदतीने मुक्त नत्राचे रूपांतर रासायनिक नत्र (अमोनिया,नायट्रेट) खतामध्ये करतात आणि पिके त्यांचा उपयोग करतात. ही नत्रस्थिरिकरणाची प्रक्रिया सहजीवी असून पिके अमोनियाचे शोषण करतात आणि त्या मोबदल्यात रायझोबियम जिवाणूस अन्न आणि खनिजे पुरवितात. सूक्ष्म जिवाणूंनी स्थिर केलेल्या नत्रापैकी ९० टक्के नत्र उभ्या पिकांना उपलब्ध होते. पीक काढणीच्या वेळी मुळांवरील गाठी जमिनीत राहात असल्याने सुमारे १० टक्के नत्र जमिनीत मिसळून जाते. हे नत्र दुसऱ्या पिकास उपयोगी पडते. यासाठी कडधान्य पिकांच्या मुळांच्या सानिध्यात असलेल्या जमिनीत रायझोबियम या सूक्ष्म जिवाणूंची संख्या योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे. रायझोबियम जिवाणू अतिशय कार्यक्षम असून त्यांच्या वापराने हेक्टरी २५ ते ३० टक्के पीक उत्पादनात वाढ दिसून येते. रायझोबियम जिवाणूंचे त्यांच्या उपयुक्ततेच्यादृष्टीने सात गट पाडले आहेत. एका गटाचे जिवाणू दुसऱ्या गटाला उपयोगी पडत नाहीत. त्यामुळे बियाणाला जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करताना ते कोणत्या गटाचे आहे हे पाहणे आवश्यक आहे. या सात गटातील रायझोबियम जिवाणूंची नत्र स्थिरीकरणाची क्षमता भिन्न आहे. एका वर्षात सुमारे ४० ते १६० किलो नत्र प्रति हेक्टरी स्थिर करण्याचे कार्य होते. रायझोबियम जिवाणूंचे गट
गट | पिके |
वाटाणा गट | वाटाणा, मसूर, लाख |
घेवडा गट | श्रावण घेवडा व इतर घेवडे |
बरसीम गट | बरसीम घास |
अल्फा अल्फा गट | लसूणघास, मेथी |
हरभरा गट | हरभरा |
सोयबीन गट | सोयबीन |
चवळी गट | चवळी, भुईमूग, तूर, उडीद,मुग, वाल, मटकी, गवार, ताग, बोरू इ. |
प्रत्येक गटाप्रमाणे जिवाणू संवर्धन बियाणास प्रक्रिया केल्यास भरपूर प्रमाणात नत्र स्थिर केले जाते. नत्र खताची बचत होते. रायझोबियम जिवाणू संवर्धनामुळे पिकांच्या नत्र स्थिरीकरण क्षमतेत आणि उत्पादनात वाढ होते. रायझोबियम जिवाणूचा उत्पादनावर परिणाम रायझोबियम जिवाणू संवर्धक काही संजीवके आणि जीवनसत्त्व पिकांना पुरवितात. उदा. इंडॉल अॅसिटिक अॅसिड . रायझोबियम जिवाणू संवर्धक रासायनिक खतांपेक्षा स्वस्त असून त्याच्या सतत वापरामुळे जमिनीची प्रत सुधारते. स्फुरद जिवाणू संवर्धक
जिवाणू संवर्धक वापरताना घ्यावयाची काळजी
रायझोबियम जिवाणू संवर्धकाचा वापर
द्रवरूप जिवाणू खते वापरावयाच्या पद्धती आणि मात्रा बीज प्रक्रिया
माती प्रक्रिया एक एकरासाठी नत्र स्थिर करणारे व पीएसबी जिवाणू प्रत्येकी १ लिटर प्रति ४०० किलो बारीक चाळलेले शेणखत किंवा कंपोस्ट खतामध्ये मिसळून पेरणी पूर्वी किंवा पेरणी करते वेळी दुचाडी पाभरीतून पेरावे. ठिबक सिंचनाद्वारे वापर नत्र स्थिर करणारे व पीएसबी जिवाणू संवर्धक प्रत्येकी १ लिटर प्रती एकरासाठी व्हेंन्चुरी टँकमध्ये मिसळून ठिबक सिंचनाद्वारे पिकास द्यावे. उभ्या पिकास पिकाच्या मुळाभोवती देणे एक एकर क्षेत्रासाठी नत्र स्थिर करणारे आणि पीएसबी जिवाणू संवर्धक प्रत्येकी १ लिटर हे १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी पंपाचा नोझल काढून रोपाच्या जवळ सकाळी किंवा संध्याकाळी फवारावीत. जिवाणू संवर्धकाचे फायदे
संपर्क: डॉ. दीपाली कांबळे,९३०७१६३९३९ (कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ , परभणी)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.