कोरडवाहू रब्बी ज्वारी पेरणी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत करावी. त्यासाठी जमिनीत पुरेशी ओल असणे आवश्यक आहे. हस्ताच्या पावसानंतर केलेली पेरणी फायदेशीर ठरते.       रब्बी ज्वारीच्या दर्जेदार उत्पादनासाठी संकरित व सुधारित जातींची निवड करावी. जमिनीच्या खोलीनुसार जातींची निवड केल्यास अधिक उत्पादन मिळते. ज्वारी पेरणी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या काळात करावी. पाऊस आणि जमिनीतील उपलब्ध ओलाव्याचा अंदाज घेऊन पेरणीचे नियोजन करावे. कोरडवाहू आणि बागायती क्षेत्रासाठी रब्बी ज्वारीचे शिफारस केलेल्या सुधारित/संकरित जातींची जमिनीच्या प्रकारानुसार लागवड करावी.       जमिनीच्या प्रकारानुसार जातींची निवड      
  	  		  			| हलकी जमीन (खोली ३० सेंमी) | फुले अनुराधा, फुले माऊली | 
  		  			| मध्यम जमीन (खोली ६० सेंमी) | फुले सुचित्रा, फुले माऊली, परभणी मोती, मालदांडी ३५-१, | 
  		  			| भारी जमीन( ६० सेंमी पेक्षा जास्त) | सुधारित वाण :  फुले वसुधा, फुले यशोदा, सी.एस.व्ही २२, पी.के.व्ही. क्रांती, परभणी मोती. | 
  		  			| संकरित वाण :  सी.एस.एच.१५ आणि सी.एस.एच. १९. | 
  		  			| बागायती | फुले रेवती, फुले वसुधा, सी.एस.व्ही.१८, सी.एस.एच.१५, सी.एस.एच. १९. | 
  		  			| हुरड्यासाठी | फुले उत्तरा, फुले मधुर | 
  		  			| लाह्यांसाठी | फुले पंचमी | 
  		  			| पापडासाठी | फुले रोहिणी | 
  	  
      जातींची वैशिष्ट्ये        फुले अनुराधा   
कोरडवाहू क्षेत्रासाठी, हलक्या जमिनीत लागवडीस योग्य. पक्व होण्याचा कालावधी १०५ ते ११० दिवस. कडबा अधिक पौष्टिक व पाचक. खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम कोरडवाहू जमिनीत धान्य उत्पादन हेक्टरी ८ ते १० क्विंटल व कडबा ३० ते ३५ क्विंटल. हलक्या व मध्यम जमिनीत लागवडीस योग्य. पक्व होण्याचा कालावधी ११० ते ११५ दिवस.  धान्याचे उत्पादन :  हलक्या जमिनीत हेक्टरी ७ ते ८ क्विंटल व कडबा २० ते ३० क्विंटल  धान्याचे उत्पादन :  मध्यम जमिनीत हेक्टरी १५ ते २० क्विंटल व कडबा ४० ते ५० क्विंटल पक्व होण्याचा कालावधी ११० ते ११५ दिवस उत्कृष्ट धान्य व कडबा प्रत धान्य उत्पादन २४ ते २८ क्विंटल व कडबा ६० ते ६५ क्विंटल भारी, कोरडवाहू व बागायती जमिनीसाठी शिफारस पक्व होण्याचा कालावधी ११६ ते १२० दिवस मोत्यासारखे पांढरेशुभ्र चमकदार दाणे. खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम कोरडवाहू धान्य उत्पादन हेक्टरी २४ ते २८ क्विंटल व कडबा ६५ ते ७० क्विंटल बागायती धान्य उत्पादन ३० ते ३५ क्विंटल व कडबा ७०ते ७५ क्विंटल भारी जमिनीत लागवडीस योग्य. पक्व होण्याचा कालावधी १२० ते १२५ दिवस दाणे मोत्यासारखे, पांढरेशुभ्र चमकदार  कोरडवाहू :  धान्य उत्पादन हेक्टरी २५ ते २८ क्विंटल व कडबा ६० ते ६५ क्विंटल  बागायती :  धान्य उत्पादन हेक्टरी ३० ते ३५ क्विंटल व कडबा ७० ते ८० क्विंटल भारी, कोरडवाहू व बागायती जमिनीसाठी शिफारस. पक्व होण्याचा कालावधी ११६ ते १२० दिवस खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम  कोरडवाहू :  धान्य उत्पादन हेक्टरी २४ ते २८ क्विंटल व कडबा ६५ ते ७० क्विंटल  बागायती :  धान्य उत्पादन हेक्टरी ३० ते ३५ क्विंटल व कडबा ७० ते ८० क्विंटल भारी, कोरडवाहू व बागायती जमिनीसाठी शिफारस पक्व होण्याचा कालावधी १२५ ते १३० दिवस मोत्यासारखे, पांढरेशुभ्र चमकदार दाणे. खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम  कोरडवाहू :  धान्य उत्पादन हेक्टरी १७ क्विंटल व कडबा ५० ते ६० क्विंटल  बागायती :  धान्य उत्पादन हेक्टरी ३२ क्विंटल व कडबा ६० ते ७० क्विंटल भारी, बागायती जमिनीसाठी शिफारस पक्व होण्याचा कालावधी ११८ ते १२० दिवस मोत्यासारखे, पांढरे चमकदार दाणे धान्य उत्पादन ४० ते ४५ क्विंटल व कडबा ९० ते १०० क्विंटल मध्यम, खोल जमिनीत कोरडवाहूसाठी शिफारस पक्व होण्याचा कालावधी ११८ ते १२० दिवस धान्य उत्पादन हेक्टरी १५ ते १८ क्विंटल व कडबा ६० क्विंटल हुरड्याची अवस्था येण्यास ९०-१०० दिवस भोंडातून दाणे सहज बाहेर पडतात. सरासरी ७०-९० ग्रॅम इतका हुरडा मिळतो. हुरडा चवीस सरस अत्यंत गोड, शिवाय ताटेही गोड असल्याने जनावरे कडबा चवीने खातात. लाह्याचे प्रमाण (वजनानुसार) ८७.४ टक्के लाह्या मोठ्या प्रमाणात फुटून रंगाने पांढऱ्या शुभ्र होतात खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम महाराष्ट्रातील कोरडवाहू क्षेत्रामध्ये लाह्यांसाठी प्रसारित कोरडवाहू पेरणी १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत करावी. त्यासाठी जमिनीत पुरेशी ओल असणे आवश्यक आहे. योग्य वेळी पेरणी न झाल्यास खोडमाशीचा प्रादुर्भाव अधिक होतो. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास गंधक (३०० मेश) ४ ग्रॅम याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी. बीज प्रकिया केल्यामुळे काणी रोग येत नाही. गंधकाची प्रक्रिया केल्यानंतर १० किलो बियाण्यास प्रत्येकी २५० ग्रॅम ॲझोटोबॅक्टर व पीएसबी या जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया करावी. पेरणीसाठी हेक्टरी १० किलो बियाणे वापरावे. पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने ४५ सेंमी अंतरावर एकाच वेळी खते व बियाणे स्वतंत्र दोन चाड्यातून पेरावे. अपेक्षित उत्पादन मिळविण्यासाठी ज्वारीची पेरणी ४५ बाय १२ सेंमी अंतरावर करावी. कोरडवाहू ज्वारीसाठी दोन रोपांतील अंतर २० सेंमी ठेवावे. पेरणीच्या वेळी संपूर्ण नत्र, स्फुरद व पालाश द्यावे.  - डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९   (मृद शास्त्रज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी जि. नगर)