शेतकरी उत्पादक कंपनीसाठी समभाग निधी मंजुरी

शेतकरी उत्पादक कंपनीच्या भागधारकांच्या वर्गवारीनुसार प्रत्येकास प्राप्त होणारी समभाग निधीची अधिकतम रक्कम ही वैयक्तिक भाग धारकास १००० रुपये आणि वैयक्तिक भाग धारकाचा गट / समूह (उदा.स्वंयसहाय्यता गट / शेतकरी गट) यांना एकूण सभासद संख्याप्रमाणे प्रति समभाग (शेअर) १००० रुपये आणि जास्तीत जास्त रक्कम २०,००० रुपयांपर्यंत असेल.
शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत विविध उपक्रम राबविले जातात
शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत विविध उपक्रम राबविले जातात

शेतकरी उत्पादक कंपनीच्या भागधारकांच्या वर्गवारीनुसार प्रत्येकास प्राप्त होणारी समभाग निधीची अधिकतम रक्कम ही वैयक्तिक भाग धारकास १००० रुपये आणि वैयक्तिक भाग धारकाचा गट / समूह (उदा.स्वंयसहाय्यता गट / शेतकरी गट) यांना एकूण सभासद संख्याप्रमाणे प्रति समभाग (शेअर) १००० रुपये आणि जास्तीत जास्त रक्कम २०,००० रुपयांपर्यंत असेल. संस्थात्मक भागधारक (उदा.शेतकरी उत्पादक कंपनी) त्यांचेसाठी एक लाख एवढे असेल. शेतकरी उत्पादक कंपनीच्या भागधारकांच्या वर्गवारीनुसार प्रत्येकास प्राप्त होणारी समभाग निधीची अधिकतम रक्कम ही वैयक्तिक भाग धारकास १००० रुपये आणि वैयक्तिक भाग धारकाचा गट / समूह (उदा.स्वंयसहाय्यता गट / शेतकरी गट) यांना एकूण सभासद संख्याप्रमाणे प्रति समभाग (शेअर) १००० रुपये आणि जास्तीत जास्त रक्कम २०,००० रुपयांपर्यंत असेल. संस्थात्मक भागधारक (उदा.शेतकरी उत्पादक कंपनी) त्यांचेसाठी एक लाख एवढे असेल.

 • शेतकरी उत्पादक कंपनीस समभाग भांडवलाची रक्कम ही कमाल दोन हप्त्यात काढता येते. पहिला हप्ता अर्ज केल्यापासून २ वर्षाच्या आत आणि कमाल मर्यादा १५ लाख प्रती शेतकरी उत्पादक कंपनी आहे. जर शेतकरी उत्पादक कंपनीने पहिल्या हप्त्यात १० लाखापेक्षा कमी भाग भांडवल घेतले असेल, पण उत्पादक कंपनीने आपली सभासदांची संख्या वाढवून भागभांडवल कमाल मर्यादा १५ लाख इतके उभे केल्यास दुसऱ्या हप्त्यासाठी केलेला अर्ज हा नवीन अर्जाप्रमाणे गृहित धरला जातो. त्याप्रमाणे सर्व प्रक्रिया पुन्हा करावी लागते.
 • मंजुरीच्या अटी स्वीकारल्यानंतर शेतकरी उत्पादक कंपनी छोट्या शेतक-यांच्या कृषी व्यापार संघाशी करारबद्ध होईल.
 • मंजूर निधीची रक्कम शेतकरी उत्पादक कंपनीच्या बँक खात्यावर जमा करण्यात येते. मंजूर झालेल्या समभाग निधीची रक्कम प्राप्त झाल्यानंतर शेतकरी उत्पादक कंपनीने समभाग निधीच्या प्रमाणात प्राप्त झालेले अधिकचे समभाग हे ४५ दिवसांपर्यंत समभागधारकांच्या नावावर जमा करणे आवश्यक असते.
 • शेतकरी उत्पादक कंपन्यांनी समभाग निधी अंतर्गत प्राप्त झालेली रक्कम ही भागधारकाच्या नावे जमा केल्याचे प्रमाणपत्र छोट्या शेतकऱ्यांच्या कृषी व्यापार संघाला कळविणे आवश्यक आहे.
 • शेतकरी उत्पादक कंपनीशी झालेल्या करारान्वये छोट्या शेतकऱ्यांचा कृषी व्यापार संघ, नवी दिल्ली हे भागधारकांच्या खात्यावरील समभाग निधीची माहिती तपासू शकते.
 • शेतकरी उत्पादक कंपनीने छोट्या शेतकऱ्यांच्या कृषी व्यापार संघाबरोबर लेखी करार केल्यानंतरच समभाग निधी योजनेच्या अंतर्गत अर्थ साहाय्य वितरण करण्यात येते.
 • याबाबत कोणत्याही मर्यादेचे उल्लंघन किंवा करारनाम्यातील अटी व शर्थीचे अनुपालन न केल्यास छोट्या शेतकऱ्यांच्या कृषी व्यापार संघ हे समभाग निधीचा योजनेची रक्कम परत मागावू शकते व ते कंपनीवर बंधनकारक राहील. छोट्या शेतकऱ्यांच्या कृषी व्यापार संघ (योजनेच्या मर्यादेत) कायदेशीर कारवाई करू शकते.
 • कार्यपद्धती  प्रत्येक भागधारकास एक समभाग प्राप्त व्हावा यासाठी भागधारकांच्या चालू भाग भांडवलाच्या समभाग वाटप करण्यात येते. परंतु मंजूर समभागनिधीची रक्कम ही जर सर्व भागधारकास किमान एक समभाग मिळण्या इतकी अपुरी असल्यास समभाग निधीचे वाटप हे समभागधारकाच्या चालू जमीन धारणे एवढे करावे लागते. परंतु त्यासाठी कमीत-कमी जमीन धारकाच्या वाटपापासून सुरुवात करण्यात यावी. यासाठी पारदर्शक पध्दतीचा अवलंब करावा की ज्यामुळे भागधारकाची ओळख अगोदर कळणार नाही.

  योजनेचे फायदे

 • पात्रता धारक शेतकरी उत्पादक कंपनीस त्यांच्या एकूण समभागा एवढा निधी या योजने अंतर्गत मिळण्यास मदत होते. तसेच नोंदणीकृत झालेल्या शेतकरी उत्पादक कंपन्या ज्यांचे भागभांडवल अर्ज केलेल्या तारखेस जास्त नाही अशा कंपन्यांना प्राधान्य देण्यात येते. यामुळे अशा कंपन्यांची भांडवली पत विस्तारण्यास मदत होते. 
 • समभाग निधी हा शेतकरी उत्पादक कंपनीच्या सभासदांने धारण केलेल्या समभागा इतकाच व त्याची कमाल रक्कम १५ लाख प्रति शेतकरी उत्पादक कंपनी इतकी असते. 
 • समभाग निधीची रक्कम ही थेट शेतकरी उत्पादक कंपनीच्या बँक खात्यावर जमा करण्यात येते. समभाग हे भागधारकांच्या वर्ग करणे अनिवार्य असते.
 • लवाद

 • छोट्या शेतकऱ्यांचा कृषी व्यापार संघ यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचना व त्या अंतर्गत अटी व शर्ती यांचे उल्लंघन केल्यास तसेच समभाग निधी योजने अंतर्गत वितरित करण्यात आलेल्या रक्कमेचा गैरवापर झाल्यास किंवा अफरातफर केल्यास छोट्या शेतकऱ्यांच्या कृषी व्यापार संघ तो सर्वच्या सर्व निधी परत घेण्यास व त्याप्रमाणे कार्यवाही करण्यास सक्षम आहे.
 • छोट्या शेतकऱ्यांच्या कृषी व्यापार संघ व शेतकरी उत्पादक कंपनी यांचेतील करार हा प्रचलित कायद्यानुसार करण्यात येईल. या करारा बाबत काही विवाद किंवा दावे निर्माण झाल्यास किंवा कराराचा भंग झाल्यास किंवा मोडल्यास, कायदेशीर पद्धतीने व दिल्ली स्थित लवादाच्या निर्णयाच्या निकालानुसार सोडविण्यात येईल. तथापि, कोणतीही कायदेशीर कृती करण्यापूर्वी दोन्ही पक्षांनी सर्वतोपरी प्रयत्न व चर्चेतून सर्व समावेशक समझोता शोधणे आवश्यक राहील.
 • सदरील योजनेचा शेतकरी उत्पादक कंपनीस लाभ मिळविण्याच्या दृष्टीने करावयाचे अर्ज व तत्सम बाबींचे महामंडळाकडून सशुल्क सेवा पुरविली जात आहे. याबाबत आपण महामंडळाशी संपर्क साधावा.
 • महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ हे एकमेव सरकारी संस्था आहे की, जे शेतकऱ्यांना रास्त दरामध्ये शेतकरी उत्पादक कंपनी ची स्थापना करून देते. ज्या शेतकऱ्यांना नवीन शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करावयाचे आहे तसेच शासनाच्या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत महामंडळाकडून केली  जाणार आहे. शेतकरी उत्पादक कंपनी चे वर्षभराचे सर्व कागदोपत्री पूर्तता एकाच छताखाली मोफत दिली  जाणार आहे.
 • - गणेश जगदाळे,  ७५८८०७०४७३ ( व्यवस्थापक नाबार्ड पोपी प्रकल्प, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे.)

  Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

  ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  Agrowon
  agrowon.esakal.com