
कृषी कर्जाचे प्रत्यक्ष कर्ज आणि अप्रत्यक्ष कर्ज असे दोन प्रकार पडतात. प्रत्यक्ष शेती कर्ज म्हणजे शेती आणि शेती संलग्न व्यवसाय (उदा. दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, पशुपालन, कुक्कुटपालन, मधुमक्षिकापालन, रेशीम उद्योग) यासाठी वैयक्तिक शेतकरी, बचत गट (स्वयंसाह्यता गट), शेतकरी समूह यांना बॅंकानी दिलेले कर्ज. तसेच शेती आणि शेती संलग्न व्यवसायासाठी कार्पोरेट कंपनी, भागीदारी फर्म आणि संस्था यांना बॅंकांनी दिलेले एकत्रित २ कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज. शेतीसाठीचे अप्रत्यक्ष कर्ज म्हणजे, खत, बी-बियाणे, शेतीसाठी कीडनाशकांचे विक्रेते आणि तत्सम अप्रत्यक्षरीत्या शेतीवर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांना दिलेले कर्ज होय.
प्रत्यक्ष शेती कर्जासाठी बॅंकेस लागणारे तारण
जमीन गहाणखताचे प्रकार
जमीन तारणाविषयी महत्त्वाचे
कृषिकर्ज तारण विषयक धोरण १) पीककर्ज अ) कर्ज रक्कम १,६०,००० रुपये असेल तेव्हाः ज्या कारणासाठी कर्ज दिले तेच फक्त तारण. म्हणजे पीक तारण (Hypothecation of Crop).अन्य कोणतेही तारण लागत नाही. ब) कर्ज रक्कम रु. १,६०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तेव्हा ः ज्या पिकासाठी कर्ज ते पीक तारण (Hypothecation of Crop) आणि जमिनीचे गहाण खत (Mortgage of Land)* करणे आवश्यक आहे.
२) मध्यम /दीर्घ मुदत कर्ज अ) कर्ज रक्कम १,६०,००० रुपये ज्या कारणासाठी कर्ज दिले आहे फक्त तेच तारण. (Hypothecation of assets created out of Bank loan) ब) कर्ज रक्कम १,६०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तेव्हा ः ज्या कारणासाठी कर्ज दिले तेच तारण (Hypothecation of assets created out of Bank loan). आणि जमिनीचे गहाण खत (Mortgage of Land)* ( टीप* : गहाणखताऐवजी, कृषिविषयक कर्जाच्या सोयीची तरतूद करण्याबाबत अधिनियम, १९७४ नुसार बँकेच्या कर्जाची नोंद (Charge by Declaration) जमिनीवर केली जाते किंवा अतिरिक्त तारण (Collateral Security) घेतले जाते.) वर नमूद केलेल्या दोन्ही शेती कर्जाशिवाये अन्य अप्रत्यक्ष शेती कर्ज उदा. खत, बी-बियाणे, कीडनाशक विक्रीसाठी वगैरे यांच्या तारणासाठी वरील धोरण लागू होत नाही. (लेखक बॅंक ऑफ इंडियाचे निवृत्त सहायक महाव्यवस्थापक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.