स्फुरद उपलब्धतेच्या समस्येवर वन्यजीवच ठरतील उत्तर

आधुनिक शेतीमध्ये रासायनिक खतांचा नियमित पुरवठा महत्त्वाचा ठरतो. या खतांपैकी मुख्य खत म्हणजे स्फुरदाचे प्रमाण कमी होत आहे.
fertilizer
fertilizerAgrowon
Published on: 
Updated on: 

आधुनिक शेतीमध्ये (Modern Farming) रासायनिक खतांचा (Chemical fertilizer) नियमित पुरवठा महत्त्वाचा ठरतो. या खतांपैकी मुख्य खत म्हणजे स्फुरदाचे प्रमाण कमी होत आहे. त्याचा मानसिक आणि आर्थिक ताण शेतकऱ्यांवर (Farmer) वाढत आहे. त्यातच युक्रेन व रशियादरम्यान सुरू असलेल्या युद्धाचा युरोपमधील पुरवठ्यावर विपरीत परिणाम होत आहे. अनेक देशांतील स्फुरदाचे साठे कमी होत असून, त्याचा अंतिम परिणाम अन्नसुरक्षेवर होण्याचा धोका वाढणार आहे. या समस्येवर मार्ग काढण्यासाठी वन्यजीवसृष्टी उपयुक्त ठरू शकेल, असा दावा अमेरिकेतील उत्तर अॅरिझोना विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केला आहे.

स्फुरद हे खत प्रामुख्याने दगडामधून खाणकाम करून मिळवले जाते. त्याचा वापर शेतीमध्ये पिकांच्या वाढीसाठी केला जातो. अर्थात, हे दिलेले संपूर्ण खत पिकाकडून (Crop Fertilizer) वापरले जात नाही. त्याचे वेगवेगळी संयुगे नैसर्गिकरीत्या तयार होऊन हळूहळू त्यांची पिकांसाठी असलेली उपलब्ध कमी होत जाते. अशी जमिनीमध्ये साठलेली खते पाऊस किंवा सिंचनाच्या अतिरिक्त पाण्यासोबत निचरा होऊन परिसरातील जलस्रोत किंवा समुद्रापर्यंत पोहोचत आहेत. समुद्रात खोलवर जाऊन गाळामध्ये गाडली जात आहेत. म्हणजेच सहज खाणकाम काढण्यायोग्य स्फुरद कमी होत असून, त्याची मागणीच्या तुलनेमध्ये कमतरता भासू लागली आहे.

fertilizer
स्फुरद कमतरतेमुळे होतो ‘हा’ आजार | Sulfer Deficiency in Animals | ॲग्रोवन

उत्तर अॅरिझोना विद्यापीठातील पर्यावरण माहिती शास्त्रातील पोस्ट डॉक संशोधक अॅन्ड्यू अब्राहम यांनी या जागतिक समस्येसंदर्भात अभ्यास केला असून, त्याचे निष्कर्ष सायन्स ऑफ दी टोटल एन्व्हायर्न्मेंट मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. त्यांच्या मते या जागतिक समस्येवर मात करण्यासाठी प्राचीन उत्तर म्हणजेच वन्यजीव सृष्टीच कामाला येणार आहे.
आपल्या संशोधनाविषयी माहिती देताना त्यांनी सांगितले, की प्राचीन काळी खोल समुद्रातील स्फुरदाच्या पुन्हा जमिनीवर परत आणण्याच्या कामामध्ये समुद्रातील व्हेल, समुद्रपक्षी, मासे आणि हिमअस्वले ही मोलाची भूमिका निभावत असत. ते एकूणच बायोस्फिअरमधील पोषक घटकांचा मोठा हिस्सा स्थिर करीत. त्यांच्यामुळे जमिनीचा (Land) सुपीकतेला चालना मिळत होती. मात्र अलीकडे यातील काही सजीव हे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, तर अनेक सजिवांची संख्या लक्षणीयरित्या कमी झाली आहे. समुद्रामध्ये येणाऱ्या नद्या किंवा गोड्या पाण्याच्या स्रोतांवर वेगवेगळी धरणे, (Dam) बांध इत्यादी घातली जात असल्याने त्या त्या ठिकाणी स्फुरद वाढत आहे. पण सागरामध्ये येणाऱ्या स्फुरदांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली आहे.

पूर्वी स्फुरदाच्या पुनर्चक्रीकरणामध्ये कार्यरत सजीवांचा वाटा कमी होत असून, त्यावर मानवी हस्तक्षेपाचा प्रभाव वाढत आहे. शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या स्फुरदाचा अकार्यक्षम वापर ही आणखी वेगळीच समस्या आहे. त्यातून जलस्रोत आणि सागरी यामध्ये स्फुरद विखुरला जात आहे. तो परत मिळविण्यासाठी सध्याचे तंत्रज्ञान पुरेसे ठरणारे नाही. म्हणजेच माणसांच्या कृतीमुळे सागरात मिसळल्या जाणाऱ्या स्फुरदाच्या तुलनेमध्ये फारच अल्प आपण परत मिळवू शकतो. अशा वेळी काय करता येईल, असा प्रश्‍न उद्‍भवतो.
या प्रश्‍नांवर अब्राहम यांनी नावीन्यपूर्ण उत्तर सुचवले आहे. ते म्हणतात, आमच्या अभ्यासातून इतिहासातील अनेक उदाहरणे आणि आकडेवारी समोर आली आहे. वन्यजीव स्फुरदाच्या वहनामध्ये मोलाची भूमिका बजावू शकतात. अन्य नैसर्गिक स्फुरद (Natural phosphorus) प्रवाहामध्ये धुळीचे वाऱ्यासोबत वाहून जाणारे व स्थिर होणारे कण आणि वणवे यांचा महत्त्वाचा वाटा असतो. त्यातील महत्त्वाची बाब म्हणजे जलचर वन्यजीव हे पाण्यातून स्फुरद पुन्हा जमिनीवर आणून टाकू शकतात. या सजीवांच्या एकमेकांमध्ये गुंफलेल्या साखळीतून नैसर्गिक अन्नद्रव्यांच्या वहनाच्या आणि प्रसाराचे प्राचीन मार्ग विकसित झालेले आहेत. असे मार्ग पुन्हा जीवित करणे शक्य असून, त्याचा फायदा मानवाद्वारे केल्या जाणाऱ्या शेतीला होऊ शकतो.

या संशोधनाचे सहलेखक व व्हर्मोंट विद्यापीठातील संवर्धन जीवशास्त्रज्ञ जो रोमन म्हणाले, की प्राणी स्फुरदाच्या नैसर्गिक (Natural phosphorus) चक्राचे भाग आहेत. त्यांच्या मलमूत्र आणि सांगाड्याच्या माध्यमातून हे पोषक द्रव्य विखुरले जाते. या प्राण्यांकडून दिल्या जाणाऱ्या सेवेचा फायदा शेती (Farming) पिकविण्यासाठी होऊ शकतो. त्याच प्रमाणे आपल्या ग्रहाच्या दीर्घकालीन आरोग्यासाठीही ते अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते.स्फुरदाच्या व्यापार प्रणालीमध्ये मोठ्या संधी असल्या तरी सागराच्या तळाशी जाऊन अडकून पडलेल्या महत्त्वाच्या पोषक घटकांना परत मिळवण्याचे सामुदायिक ध्येय आपल्याला ठेवावे लागणार असल्याचे डॉटी सांगतात. त्यासाठी जैवविविधता विषयक प्रकल्पामध्ये गुंतवणूक करणे स्वस्त आणि सोपे ठरणार आहे. त्या संदर्भात ते सध्याच्या कार्बन क्रेडिटसारख्या (Carbon credits) प्रणालीचे उदाहरण देतात.या पद्धतीचा सर्वसामान्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष फायदा होऊ शकतो. उदा. गुनायू पक्ष्यामार्फत होणारे खत वितरण इ.

स्फुरद हे मानव आणि अन्य सर्वच नैसर्गिक प्रणालीतील अपरिहार्य घटक आहे. सजीवांतील या घटकांच्या वहनातील क्षमता लक्षात घेऊन, त्यांना सागरी वातावरण आणि पुन्हा जमिनीशी जोडून त्यांचा प्रसार करता येईल. वन्यजीवांची संख्या वाढवणे हा स्फुरदाच्या नैसर्गिक चलनाला गती देऊ शकते. त्यातून संपूर्ण जगालाच फायदा होऊ शकतो.

अॅन्ड्यू अब्राहम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.