नॅनो पार्टिकल्स रोखणार पिकांवरील कीड

हे कीडनाशक पिकांचे किडीपासून आणि विविध आजारांच्या प्रादुर्भावापासून संरक्षण करणार आहे. विशेषतः भातपिकावरील कीड रोखण्यासाठी या बायोडीसीएमचा (BioDCM) उपयोग होणार आहे.
Nanoparticles to protect rice, other crops
Nanoparticles to protect rice, other crops
Published on: 
Updated on: 

हैद्राबाद विद्यापीठ (UoH) ,इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ राईस रिसर्च (IIRR) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), कानपूर या संस्थांमधील शास्त्रज्ञांनी एकत्रितपणे नॅनो पार्टीकल आधारित बायोडिग्रेडेबल  कार्बनॉईड मेटॅबोलाईट (BioDCM) हे कीड व रोगनियंत्रक विकसित केलं आहे. 

हे कीडनाशक पिकांचे किडीपासून आणि विविध आजारांच्या प्रादुर्भावापासून संरक्षण करणार आहे. विशेष भातपिकावरील कीड रोखण्यासाठी या बायोडीसीएमचा  (BioDCM) उपयोग होणार आहे. भातपिकांवरील संभाव्य किडींच्या प्रादुर्भावाची शक्यता लक्षात घेऊन या रोगनियंत्रक औषधाची निर्मिती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे जैविक कीडनाशक असल्याने पिकांवर याचे दुष्परिणाम होणार नाहीत.

व्हिडीओ पहा   

हैद्राबाद विद्यापीठातील स्कुल ऑफ केमिस्ट्रीचे आर. बालमुरूगन आणि मऊ मंडल (R. Balamurugan and Mou Mandal from School of Chemistry, UoH), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ राईस रिसर्चचे दिव्य मिश्रा आणि सी. कन्नान  (C.Kannan and Divya Mishra from ICAR-IIRR) आणि आयआयटी- कानपूरच्या जैव-अभियांत्रिकी आणि जैविकशास्त्र विभागाचे पियुष कुमार आणि एस. के. मिश्रा (Santosh K. Misra and Piyush Kumar from Department of Biological Sciences and Bioengineering, IIT-Kanpur) या संशोधकांच्या टीमने हे संशोधन केलं आहे.    

हे कीडनाशक बायोडिग्रेडेबल (bio-degradable) असून वापरास अतिशय सुरक्षित असे आहे. पिकांवरील संभाव्य किडीचा अंदाज घेऊन त्यावर अचूक मारा करण्यात प्रभावी आहे. या कीडनाशकाचा प्रत्यक्षात वापर करून बघण्यात आलेला आहे. हे कीडनियंत्रक परिणामकारकतेबाबत रासायनिक कीडनाशकांपेक्षा प्रभावी आणि मानवी हाताळणीस सुरक्षित असल्याची ग्वाही हैद्राबाद विद्यापीठातर्फे देण्यात आलीय.    

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.