रत्नागिरी : हापूससह (Hapus Mango) विविध प्रकारचे आंबा कलमे आणि काजू रोपांची ‘मनरेगा’तून मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे. कोकणातील हापूसच्या कलमांना राज्यात (Hapus clauses demand in the state) मागणी आहे. गतवर्षी दर्जेदार रोपे मिळू शकली नव्हती. त्याचे नियोजन यंदा रोपवाटिकाधारकांनी करावे’’, असे आवाहन फलोत्पादन विभागाचे संचालक डॉ. कैलास मोते यांनी केले. रोपवाटिकाधारकांच्या समस्या ऐकून घेत त्यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत सभागृहात डॉ. मोते बोलत होते. या वेळी परवानाधारक व खासगी रोपवाटिकाधारक, काजू बागायतदार (Cashew gardener) व प्रक्रिया युनिट धारकांसह जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे, पणनचे सहायक सरव्यवस्थापक मिलिंद जोशी आदी उपस्थित होते.
‘रोहयो’मधून २०२०-२१ या आर्थिक वर्षात राज्यात ४२ हजार हेक्टर आंबा (Mango) , काजूची लागवड झाली. दरवर्षी त्यामध्ये वाढ होत आहे. गतवर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर या कालवधीत राज्यातून अनेकांनी रोपांची मागणी केली होती; परंतु कोकणातील रोपवाटिकांमधून (Nursery in Konkan) रोपे मिळाली नाहीत. विदर्भामधूनही या रोपांसाठी मागणी नोंदविली जात आहे, याचा आढावा डॉ. मोते यांनी घेतला.
तर नुकसान होईल
कोकण कृषी विद्यापीठाकडून रोपांची अपेक्षित माहिती दिली जात नाही. चार वर्षांपूर्वी रोपे तयार केली गेली होती; मात्र म्हणावा तसा उठाव झाला नाही. त्यामुळे रोवाटिकावाल्यांना भुर्दंड बसला होता. त्यासाठी विदर्भातून खरेदी करणाऱ्यांची लेखी यादी फलोत्पादन विभागाने दिल्यास त्यानुसार नियोजन करता येईल. अन्यथा, रोपे (Plant) तयार केल्यानंतर ती विकली गेली नाही, तर नुकसान होईल, याकडे तांबे यांनी लक्ष वेधले. याबाबत हमी देण्याविषयी विचार केला जाईल, असे सकारात्मक उत्तर मोते यांनी दिले.
शासनाने याकडे लक्ष द्यावे
- काजू बीला हमीभाव द्या,
- उत्पादन खर्च प्रतिकिलो ४०-५० रुपये
- परदेशातील काजू कमी दरात आयात
- इनपुट ड्यूटी वाढवावी
-प्रक्रिया प्रकल्प उभारा
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.