ताडगूळ निर्मिती प्रक्रिया
ताड, माड, पाम आणि खजुरीच्या झाडांपासून मिळणारा गोड रस आटवून ताडगूळ तयार करतात. निरनिराळ्या प्रदेशांत ताडाचा रस काढण्याचा हंगाम वेगवेगळा आहे. या रसापासून त्याच्या वजनाच्या ८–१० टक्के गूळ मिळू शकतो.
ज्याप्रमाणे उसाचा रस आटवून त्यापासून गूळ तयार करतात, त्याचप्रमाणे ताड (बोरॅसस फ्लॅबेलिफॉर्मिस), माड (कोकॉस न्यूसिफेरा), सॅगो पाम (कॅरिओटा यूरेन्स) आणि खजुरी (फीनिक्स सिल्व्हेस्ट्रिस) यांच्या झाडांपासून मिळणारा गोड रस आटवून गूळ तयार करतात. या प्रकारच्या गुळाला ‘ताडगूळ’ हे एकच नाव देण्याची पद्धत आहे. या प्रकारात वरील चारच प्रकारची झाडे महत्त्वाची मानली जातात. यांपैकी कोणत्याही प्रकारच्या झाडापासून मिळालेल्या रसापासून एकाच पद्धतीने गूळ तयार करतात. वरील चार प्रकारांपैकी ताड आणि खजुरी ही जास्त महत्त्वाची असून, भारतातील सुमारे ९७ टक्के ताडगूळ या दोन झाडांच्या रसापासून केलेला असतो. ताडाची झाडे साधारण पंधरा वर्षांची झाल्यानंतर त्यांच्यापासून रस काढावयास सुरुवात करतात. साधारणपणे ५० वर्षांपर्यंत ती रस देऊ शकतात. ५ ते ६ वर्षांपासून ते २५ वर्षांपर्यंत ही झाडे रस देऊ शकतात. ही झाडे १०-१५ वर्षांची झाली म्हणजे त्यावर फुलोरा दिसू लागतो, त्या वेळी ती रस काढण्यास योग्य झाली असे समजतात. या झाडापासून २५-३० वर्षे रस मिळू शकतो. सॅगो पाम ही झाडे मलबार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आसाम आणि बंगाल या राज्यांत आढळतात. ही झाडे १०-१५ वर्षांची झाल्यानंतर त्यांच्यापासून रस काढण्यास सुरुवात करतात व १५-२० वर्षे ती रस देऊ शकतात. रस काढण्याची क्रिया व उत्पन्न
रस काढणे
उत्पादन पद्धती
साठवण ताडगुळात क्षपणक साखर आणि आर्द्रताशोषक लवणे असल्यामुळे ताडगूळ पोत्यांत किंवा ताडाच्या पानांच्या चटयांत बांधतात. रवे रचून ठेवताना प्रत्येक थरात आणि आजूबाजूला सरकीचा जाड थर पसरतात. टोपल्यांत गूळ साठवितानासुद्धा सरकी वापरतात. पातळ गूळ किंवा काकवी लॅकर लावलेल्या मातीच्या भांड्यात साठवितात. संपर्क ः समाधान खुपसे, ९७६६८६४००८ (अन्नप्रक्रिया व तंत्रज्ञान विभाग, अन्नतंत्र महाविद्यालय, आष्टी, जि. बीड)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.