चिकूपासून बनवा आइस्क्रीम

नोव्हेंबर महिन्यापासून जास्त प्रमाणात चिकू फळांची आवक होते. चिकू गरापासून आइस्क्रीम तयार करणे शक्य असून, त्याला बाजारात चांगली मागणी आहे.
चिकूपासून बनवा आइस्क्रीम
चिकूपासून बनवा आइस्क्रीम
Published on
Updated on

आइस्क्रीम हा लहानथोराच्या आवडीचा विषय आहे. त्याला चिकू  (शा. नाव ः मैनिलकारा जपोटा) सारख्या गोड, थंड आणि भरपूर औषधी गुणधर्माने युक्त फळांची जोड दिल्यास फायदेशीर ठरू शकते. यातून पिकल्यानंतर अल्पायुषी असलेल्या या फळाला चांगले मूल्य मिळण्यासही मदत होते.        चिकूमध्ये ग्लुकोज व फ्रुक्टोजयुक्त शर्करेचे प्रमाण जास्त (१२ ते १४ टक्के) असते. सुक्रोजचे प्रमाण फक्त दोन टक्के असते. यामुळे त्यापासून तयार केलेल्या आइस्क्रीममध्ये गोडवा आणणारे अन्य पदार्थ कमी वापरावे लागतात. चिकूतील अँटीऑक्सिडेन्ट घटक आणि भरपूर प्रमाणातील लोह, क जीवनसत्त्व आणि पोटॅशिअम, तंतुमय पदार्थ हे आइस्क्रीमची पोषकता वाढवतात. चिकू आइस्क्रीम ः

  • मिक्सरमधून काढलेला चिकूचा गर मसलीन कापडामधून गाळून घ्यावा.
  • ५०० मि.ली. दूध, २५० ग्रॅम साखर, ५० ग्रॅम दूध पावडर एकत्र करून गॅसवर १० मिनिटे ठेवून सतत हलवत राहावे.
  • मिश्रण थंड झाल्यानंतर फ्रिजमध्ये ८ तासासाठी ठेवावे. चांगल्या प्रकारे फेटावे.
  • नंतर २०० ग्रॅम चिकूचा गर मिसळावा. पुन्हा १० मिनिटे चांगले फेटून घ्यावे.
  • नंतर राहिलेला २०० ग्रॅम चिकूचा दर मिसळून चांगले एकजीव करावे.
  • मिश्रण हवाबंद डब्यात ठेवावे.
  • हा डबा ८ ते १० तास फ्रिजरमध्ये ठेवावा.
  • त्यानंतर तयार झालेल्या थंड चिकू आइस्क्रीमचा आस्वाद दीर्घकाळापर्यंत घेऊ शकतो.
  • चिकू चटणी ः

  • ३५० ग्रॅम चिकूचे बारीक तुकडे करून घ्यावेत.
  • त्यामध्ये १० ग्रॅम मीठ, १० ग्रॅम जिरेपूड , ४ ते ५ हिरव्या मिरच्या, ७ ते ८ लसूण पाकळ्या, २५ ग्रॅम कोथिंबीर व ३५ ग्रॅम चिंच हे सर्व साहित्य एकत्र मिसळून घ्यावे.
  • या मिश्रणाची मिक्‍सरमध्ये चटणी वाटून घ्यावी. ही चटणी चवदार लागते.
  • घरातील सर्वांना चटकदार चटणी नक्कीच आवडते.
  • ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon - Agriculture News
    agrowon.esakal.com