मे महिन्याच्या शेवटी व जून, जुलै महिन्यात जांभळाची फळे भरपूर प्रमाणात येतात. जांभूळ हे औषधी गुणधर्म असलेले फळ आहे. जांभळा मध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस व क जीवनसत्व याचे प्रमाणही अधिक असते. स्क्वॅश
प्रथम परिपक्व निरोगी फळे घ्यावीत. ती स्वच्छ पाण्याने धुवावीत. पल्परच्या साह्याने त्याचा रस काढून घ्यावा. रस ८० ते ८२ अंश सेल्सिअस तापमानात ३० मिनिटे गरम करावा. साधारण एक लिटर रसासाठी एक किलो साखर, एक लिटर पाणी आणि दीड ग्रॅम सायट्रीक ॲसिड मिसळून पाक तयार करून घ्यावा. त्यामध्ये पाचशे ते सहाशे मिलिग्रॅम सोडिअम बेन्झोएट मिसळावे. हे सर्व मिश्रण तयार जांभळाच्या रसात टाकावे. त्यानंतर रस गाळून घ्यावा. थोडा वेळ गरम करावा. थंड झाल्यानंतर निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटलीत भरून ठेवावा जांभळाची फळे पाण्याने धुवावीत. गर काढून घ्यावा. एक किलो गरात एक किलो साखर व १.५ ग्रॅम सायट्रिक आम्ल मिसळावे. हे मिश्रण पसरट भांड्यामध्ये पातळ थरात पसरवावे.२४ तास हे मिश्रण वाळवावे. नंतर त्याच्या वड्या तयार कराव्यात. पॅकिंग करून साठवून ठेवाव्यात. प्रथम पिकलेली निरोगी फळे निवडावीत. फळांपासून गर काढून घ्यावा. एक किलो गरामध्ये एक किलो साखर आणि प्रति किलो १.५ ग्रॅम सायट्रिक ॲसिड व्यवस्थित मिसळावे. मिश्रण मंद आचेवर ६७.५% ब्रिक्स येईपर्यंत शिजवावे. थंड झाल्यावर निर्जंतुक बाटलीमध्ये भरून ठेवावे. बाटल्या सील करण्यासाठी मेणाचा वापर करावा. परिपक्व जांभळाची फळे स्वच्छ धुवावीत. रस काढून घ्यावा. रसाच्या वजना इतकी साखर घ्यावी. प्रति किलोसाठी १.५ सायट्रिक ॲसिड मिसळावे त्यामध्ये ४ ग्रॅम पेक्टीन मिसळावे. जेणेकरून जेलीला घट्टपणा येईल. मिश्रण मंद आचेवर ६७.५% ब्रिक्स येईपर्यंत तापवावे. त्यानंतर थंड झाल्यास तयार जेली निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटलीत भरून ठेवावी. जांभळाच्या फळापासून गर काढल्यानंतर राहिलेल्या बिया स्वच्छ धुवाव्यात.बिया ड्रायरमध्ये ५५ ते ६० अंश सेल्सिअस तापमानाला १८ ते २० तास ठेवाव्यात. बियांची मिक्सरच्या साह्याने पावडर तयार करावी. पावडर पॉलिथिन बॅगमध्ये भरून ठेवावे. ही पावडर मधुमेह आजारावर अत्यंत गुणकारी असते. संपर्क- सौ. रोहिणी भरड ८१४९८२६०१३ (शास्त्रज्ञ, गृह विज्ञान विभाग, कृषि विज्ञान केंद्र, अंबाजोगाई,जि.बीड)