बेलाचे फळ अतिशय गुणकारी आहे. बेलफळांचा वापर आयुर्वेदिक औषधांमध्ये केला जातो. उपचारात्मक फळ म्हणून बेलफळ ओळखले जाते. औषधीमूल्य, पौष्टिक फळावर प्रक्रिया करून मूल्यवर्धन करावे.
बेलफळे शुद्ध पाण्याने धुवून घेतल्या नंतर कठीण आवरण फोडून त्यामधील बिया आणि तंतुमय पदार्थ स्टेनलेस स्टीलच्या चमच्याने काढून घ्यावे. गर तयार करण्यासाठी समान प्रमाणात पाणी मिसळून एकजीव करावे. चाळणीने बीज आणि तंतुमय पदार्थ वेगळे केल्यानंतर गर मिळतो. एक किलो बेल गरामध्ये १ किलो साखर व १० ग्रॅम पेक्टिन मिसळावे. आचेवर ठेवून मिश्रण ढवळत राहावे. मिश्रण घट्ट होत असताना त्यामध्ये प्रतिकिलो गरास ५ ग्रॅम सायट्रिक ॲसिड मिसळावे. मिश्रणाचा ब्रिक्स ६८.५ अंश ब्रिक्स आल्यानंतर जॅम काचेच्या बाटलीत भरून थंड जागेत ठेवावा. बेलाच्या २.५ सेंमी. लांबीच्या फोडी करून घ्याव्यात. गरातील बिया काढून टाकाव्यात. २४ तास पाण्यात मुरू द्याव्या, नंतर शिजवाव्यात. साखरेचा पाक करून घ्यावा. पाकात फोडी टाकाव्यात. नंतर साखरेचे प्रमाण रोज वाढवत जावे. साखरेचे प्रमाण ७८ टक्क्यांपर्यंत आल्यावर तयार मुरंबा बाटलीत भरून ठेवावा. या प्रक्रियेस एक आठवड्याचा कालावधी लागतो. मिश्रणाचे साखरेचे प्रमाण ७८ टक्के झाल्यावर पाकात भरलेल्या बेलाच्या फोडी काढाव्यात. फोडी ट्रेमध्ये पसरवून तो ट्रे ड्रायरमध्ये ५५ ते ६० अंश सेल्सिअस तापमानाला १८ तास ठेवाव्यात. सुकल्यानंतर कॅन्डी तयार होईल. २५० मि.लि. बेलाचा गर घ्यावा. ४२० ग्रॅम साखर, ३२४ मिलि. पाण्यामध्ये मिसळून पाक तयार करावा. गरज पडल्यास त्याला मंद आचेवर ठेवून विरघळावे आणि त्यात ५ ग्रॅम सायट्रिक ॲसिड मिसळावे. पाक गाळून घ्यावा. त्यामध्ये २५० मि.लि. बेलाचा गर मिसळावा. हे मिश्रण ४३ अंश ब्रिक्स येईपर्यंत मंद आचेवर ढवळावे. स्कॅश गरम असताना बाटलीत भरावा. ४) पाश्चरायझेशन प्रक्रिया पूर्ण करावी. (८० अंश सेल्सिअस,२ मिनिटे) आणि थंड करावे. बाटल्या भरल्यानंतर निर्जंतुकीकरण करावे. बेलाचा गर १०० मि.लि. घ्यावा. १२० ग्रॅम साखर, ७७० मि.लि. पाण्यामध्ये विरघळावी आणि त्यात ५ ग्रॅम सायट्रिक ॲसिड मिसळावे. बेलाचा गर पाकात मिसळावा. १० अंश ब्रिक्स येईपर्यंत त्या पाकाला मंद आचेवर ठेवून ढवळावे. मिश्रण गरम असताना बाटलीत भरून नंतर थंड करावे. बेलाच्या १ किलो गरामध्ये १ किलो साखर, १५० ग्रॅम मक्याचे पीठ व १०० ग्रॅम बटर घ्यावे. हे मिश्रण नंतर मंद आचेवर शिजवावे. मिश्रणाचा ब्रिक्स ७० टक्के इतका आल्यावर त्यात १ ग्रॅम मीठ टाकावे. शिजवण्याची क्रिया ८२ ते ८५ टक्के ब्रिक्स येईपर्यंत चालू ठेवावी. हे मिश्रण बटर लावलेल्या ट्रेमध्ये ओतणे व थंड झाल्यावर त्याचे तुकडे पाडावे. तयार झालेली टॉफी ड्रायरमध्ये ५० ते ६० सेल्सिअस तापमानास सुकवावी. बेलाच्या फळाला मुळातच सुगंध असल्याने कोणत्याही प्रकारचा कृत्रिम स्वाद मिसळण्याची गरज नाही. बेलाचा रस १५० ग्रॅम (१५ टक्के), साखर १३० ग्रॅम (१५ टक्के), आम्लता १.५ ग्रॅम ( १.२५ टक्के), पाणी ७०० मि.लि. (७० टक्के), सोडियम बेन्झेएट १०० पी.पी.एम. वरील सर्व घटक चांगले मिसळून घ्यावेत. - शैलेंद्र कटके, ९९७०९९६२८२
(अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, परभणी)