चिंच प्रक्रियेतून उद्योगाच्या संधी

चिंचेच्या आंबट-मधुर व आम्लकारक चवीमुळे याचा वापर विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, बेकरी पदार्थ आणि कन्फेक्‍शरी पदार्थांमध्ये होतो. महिला बचत गटांना चिंच प्रक्रिया उद्योगामध्ये चांगली संधी आहे.
Industry opportunities through Tamarind processing
Industry opportunities through Tamarind processing
Published on
Updated on

चिंचेच्या आंबट-मधुर व आम्लकारक चवीमुळे याचा वापर विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, बेकरी पदार्थ आणि कन्फेक्‍शरी पदार्थांमध्ये होतो. महिला बचत गटांना चिंच प्रक्रिया उद्योगामध्ये चांगली संधी आहे. रस 

  • चिंचेच्या गरामध्ये ०.२ टक्के पेक्‍टीनेझ एन्झाइम टाकून त्यास न हलविता ४ तास ठेवून द्यावे. नंतर हे मिश्रण सेंट्रिफ्युगल यंत्रामध्ये  किंवा व्हॅक्‍यूम फिल्टरमध्ये घालून त्यातील रस वेगळा करावा.
  • हा रस निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये साठवून ठेवावा. हा रस आपणास सरबत व सिरप तयार करण्यासाठी वापरता येतो.
  • रस दीर्घ काळ साठवून ठेवण्यासाठी ८० अंश सेल्सिअस  तापमानास २० मिनिटे गरम करून त्यामध्ये ३५० पीपीएम (३.५ मिलिग्रॅम प्रति १००० ग्रॅम रस) एवढे सोडिअम बेन्झोइट मिसळावे.
  • सिरप 

  • सिरप तयार करताना प्रथम गरातील शर्करांश (साखरेचे प्रमाण-ब्रिक्स) तपासून त्यातील मूळ रसाचे प्रमाण ३५ टक्के ठेवून साखरेचे प्रमाण ६० टक्के व आम्लता १.२ टक्के ठेवावी. 
  • सिरप तयार झाल्यानंतर तो गाळून घेऊन निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये भरावा. 
  • पिण्यास वापरताना या सिरपमध्ये एकास पाच पट पाणी, चवीनुसार मीठ व जिऱ्याची पावडर टाकून थंड झाल्यावर आस्वाद घ्यावा. 
  • सरबत 

  • सरबत तयार करण्यासाठी चिंचेचा गर १० टक्के , साखर १५ टक्के, आम्लता ०.५ टक्के ठेवून  उरलेले पाणी मिसळून चवीनुसार मीठ व जिरा पावडर टाकावी.हे सरबत थंड झाल्यावर घेतल्यास उत्कृष्ट लागते. 
  • जास्त काळ साठवून ठेवावयाचे झाल्यास सरबत थोडा वेळ गरम करून त्यात १०० पीपीएम (१ मिलिग्रॅम प्रति १००० ग्रॅम रस) सोडिअम बेन्झोइट मिसळून निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये भरावे. बाटल्यांना झाकण लावून त्या पाश्‍चराईझ करून थंड करून साठवाव्यात. 
  • स्क्वॅश

  • स्क्वॅश हे फळांचा रस साठवून ठेवण्याचे एक प्रकारचे पेय आहे. याचा पिण्यासाठी वापर करताना १ भाग स्क्वॅश आणि ३ भाग पाणी मिसळून एकत्र करावे. 
  • स्क्वॅश तयार करताना प्रथम गर/पल्पचा शर्करांश (साखरेचे प्रमाण-ब्रिक्स) तपासून त्यातील मूळ रसाचे प्रमाण २५ टक्के ठेवून साखरेचे प्रमाण ३५ टक्के व आम्लता १ टक्के ठेवावी. 
  • स्क्वॅश तयार झाल्यानंतर तो गाळून घेऊन त्यात २०० पीपीएम (२ मिलिग्रॅम प्रति १००० ग्रॅम रस) सोडिअम बेन्झोइट मिसळावे. तयार झालेला स्क्वॅश निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये भरावा.
  • टॉफी 

  • पिकलेली चिंच फळे घेऊन त्यापासून गर (पल्प) तयार करावा. टॉफी तयार करण्यासाठी गर (पल्प) १ किलो, साखर ७०० ग्रॅम., लिक्विड ग्लुकोज ८५ ग्रॅम., दूध पावडर ५५ ग्रॅम. आणि वनस्पती तूप १०० ग्रॅम या प्रमाणात वापरावे.
  • चिंच गर जाड बुडाच्या कढईत टाकून त्यात वितळलेले वनस्पती तूप मिसळून गर गॅसच्या मंद आचेवर चांगला शिजवून आटवावा. मोजलेली साखर, दूध पावडर हे घटक मिसळून मिश्रण एकजीव करावे.
  • मंद आचेवर मिश्रण सतत ढवळून शेवटी त्यात लिक्विड ग्लुकोज मिसळून मिश्रणाचा शर्करांश (साखरेचे प्रमाण) ७०-७२  अंश ब्रिक्सच्या (शर्करांश मोजण्यासाठी हॅन्ड रिफ्रक्ट्रोमीटरचा वापर करावा) दरम्यान आल्यावर गॅस बंद करून मिश्रण तूप लावलेल्या ट्रेमध्ये किंवा प्लेटमध्ये पसरून ठेवावे.
  • मिश्रण थंड झाल्यावर त्याचे ०.७ ते १ सें. मी. जाडीचे काप करावेत. तयार टॉफी पॉलिथिन, बटर पेपर किंवा टॉफी रॅपरमध्ये पॅक करावी. 
  • कार्बोनेटेड शीतपेये

  • चिंचेच्या गरापासून उत्कृष्ट प्रतीचे कार्बोनेटेड शीतपेय तयार करता येते. यासाठी मूळ रसातील साखर व आम्लता विचारात घेऊन रसामध्ये साखर मिसळावी.
  • रसातील साखरेचे प्रमाण ५५ टक्के व सायट्रिक आम्ल टाकून आम्लता १.५  टक्के व ३५० पीपीएम सोडिअम बेन्झोएट (३.५ मिलिग्रॅम प्रति १००० ग्रॅम रस), चवीनुसार जिऱ्याची पावडर, कोकम रस, मीठ वापरून पेय तयार करून घ्यावे. 
  • हे पेय काचेच्या बाटलीमध्ये भरून त्यामध्ये कार्बोनेशन मशीनच्या साहाय्याने कार्बन-डाय-ऑक्साइड वायू भरावा. लगेच बाटल्या हवाबंद कराव्यात. नंतर या बाटल्या ८० अंश सेल्सिअस तापमानास १५ मिनिटे गरम कराव्यात. थंड झाल्यावर बाटल्यांना लेबल लावून थंड जागी (शीतगृहात) साठवून ठेवाव्यात.  ः
  • संपर्क- डॉ. अमोल खापरे,८०५५२२६४६४ (अन्नतंत्र महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com