व्हर्जीन कोकोनट तेलाचे फायदे

नारळ फळ हे चरबीयुक्त आम्लाचा एकमेव संयोग असून त्याच्या सेवनाने शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. व्हर्जीन कोकोनट ऑइल हे तेल उष्ण प्रक्रिया पध्दत थंड प्रक्रिया पद्धतीने तयार केले जाते.
Virgin Coconut Oil
Virgin Coconut Oil

नारळ फळ हे चरबीयुक्त आम्लाचा एकमेव संयोग असून त्याच्या सेवनाने शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. व्हर्जीन कोकोनट ऑइल हे तेल उष्ण प्रक्रिया पध्दत थंड प्रक्रिया पद्धतीने तयार केले जाते. नवीन न फोडलेले नारळ हे त्याच्या उगमस्थानानुसार सामान्य तापमानाच्या जवळ जवळ चार महिने साठवून ठेवू शकतो. नारळ पाण्यामध्ये साखर व अन्य काही घटक विपूल प्रमाणात असून ते शरीरातील रक्त प्रवाह वाढविण्यास मदत करतात. नारळ फळाचे उत्तम खाद्य पदार्थामध्ये वर्गवारीत केलेले आहे. नारळ फळ हे चरबीयुक्त आम्लाचा एकमेव संयोग असून त्याच्या सेवनाने शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. व्हर्जीन कोकोनट ऑइल हे तेल उष्ण प्रक्रिया पध्दत थंड प्रक्रिया पद्धतीने तयार केले जाते.

  • व्हर्जीन कोकोनट ऑइल म्हणजेच १० ते ११ महिन्याच्या नारळ खोबऱ्याच्या किसापासून दूध काढून ते शिजवल्यानंतर मिळणारे तेल. नारळाच्या खोबऱ्यापासून काढण्यात येणाऱ्या तेलापेक्षा भिन्न असते.
  • हे तेल तयार करताना यामध्ये कोणतीही रासायनिक प्रक्रिया केली जात नाही. हे तेल नैसर्गिक सर्वश्रेष्ठ लार्वीक आम्लाचा स्तोत्र आहे.
  • हे तेल मानवाच्या जीवनात अतिशय महत्त्वाचा भाग आहे. नारळापासून तयार केलेले व्हर्जीन कोकोनट ऑइल अत्यंत बहुगुणी आणि बहुपयोगी तेल आहे.
  • नारळापासून तयार केलेल्या खाद्यपदार्थाला जगात 'सुपर फूड' म्हणून ओळख आहे. नारळापासून मिळणाऱ्या फॅटीअॅसिडचा उपयोग आरोग्याच्यादृष्टीने सकारात्मक आहे.
  • व्हर्जीन कोकोनट तेलाचे फायदे 

  • कंठग्रथी उत्तेजक : संशोधनामध्ये असे दिसून येते की, हे तेल मध्यम साखळी चरबीयुक्त आम्ल वाढविण्यास गती देते. त्यामुळे चयापचय क्रियेस उत्तेजन मिळते. जास्त प्रमाणात ऊर्जा मिळण्यास मदत होते.
  • तेल लार्वीक आम्लाचा स्तोत्र असल्यामुळे ते रक्तातील एकूण लाल पेशी कमी करून आवश्यक मज्जापेशीजाल निर्माण करते. त्यामुळे हृदयाचे संरक्षण होते.
  • हे तेल जरी चरबीयुक्त असले तरी प्रत्यक्षात शरीरातील वजन हानी भरून काढण्यास मदत करते. निरोगी मध्यम साखळी असणारे चरबीयुक्त आम्ल हे इतर चरबीयुक्त आम्लासारखे रक्त प्रवाहाचा प्रसार करत नाहीत. ते थेट यकृतात प्रसार करतात आणि त्याचे उर्जेत रूपांतर करतात. त्यामुळे व्हर्जीन कोकोनट तेलाचे सेवन केल्यास शरिरात चरबी साठविली जात नाही. त्याऐवजी त्याचा वापर ऊर्जा निर्मितीस केला जातो.
  • हे तेल आपल्या रक्तप्रवाहात शर्करा उत्पादित करत नसून त्याऐवजी रक्तातील शर्करा नियंत्रित करण्यास मदत करते. त्यामुळे रक्तातील इन्शुलिन स्त्रवण्याच्या क्रियेस सुधारणा होते.
  • पूर्णपणे विरघळलेले तेलाचे सेवन केल्यास त्यांचे एकूण कॅलरी घेण्याच्या क्षमतेत ३० ते ६० टक्के वाढ होते. तसेच त्यांच्यामध्ये हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगांचा दर जवळपास अस्तित्वात नसल्याचे आढळून आले होते.
  • जठरासंबंधी आजार असणाऱ्या व्यक्तीच्या त्वचेला तेल लावल्याने संयोगिक जीवनसत्त्व 'ई' चा त्वचेद्वारे पुरवठा होतो. ही एक जठरासंबंधी आजारावर पर्यायी उपाय योजना आहे.
  • हे तेल लार्वीक आम्लाचा स्तोत्र म्हणजेच उत्कृष्ट पौष्टिक पदार्थ असल्याने रोग प्रतिसारी प्रणाली वाढविण्यास मदत होते.
  • हे तेल त्वचेवर लावल्यास जिवाणू प्रतिबंध थर बनवून बाधित भागास संरक्षण कवच म्हणून काम करते. तसेच जखम भरून काढण्यास गती देते.
  • मेंदूचे आकलन कार्य सुधारण्यास, सुरवातीच्या टप्प्यातील चेतातंतू सुधारणेस तेल चालना देते.
  • तेल लोकांचे आजारपण बरे करण्यास मदत करते. हे तेल केवळ नैसर्गिक उपलब्ध कमी उष्मांक चरबी असणारा पदार्थ आहे. तेल रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. मानवातील एथेरोस्क्लेरोसिस, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगांपासून बचाव करण्यास मदत करते. पचनक्रिया सहजतेने होण्यास मदत करते. चयापचन उत्तेजित करते. लठ्ठपणा कमी करण्यास मदत होते.कर्करोगास कारणीभूत ठरणाऱ्या घटकास प्रतिबंध करते.
  • हे तेल जीवनसत्वे, खनिजे व अमिनो आम्लाचे शरीरात मोठ्या प्रमाणात शोषण वाढवते. व्हर्जीन कोकोनट ऑइल मधील असणाऱ्या पॉलीफिनोल व मध्यम शृंखला फॅटी अॅसिडच्या उपलब्धतेमुळे अॅटीट्रेस किया वाढवते.
  • संपर्क : ०२३५२ - २५५०७७ (प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र,भाट्ये, रत्नागिरी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com