Silt-Free River : लोकसहभागातून ‘काजळी’ झाली गाळमुक्त

River Sludge : ‘चला जाणू या नदीला’ या उपक्रमांतर्गत संगमेश्‍वर तालुक्यातील काजळी नदीतील गाळ लोकसहभागातून काढण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत.
Kajali River
Kajali RiverAgrowon

Ratnagiri News : ‘चला जाणू या नदीला’ या उपक्रमांतर्गत संगमेश्‍वर तालुक्यातील काजळी नदीतील गाळ लोकसहभागातून काढण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. आतापर्यंत शिपोशी आणि किरबेट येथील सुमारे दहा हजार घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. हे काम पाच जूनपर्यंत चालू राहणार आहे. यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी निधी संकलन केले आहे. गाळ काढण्यासाठी खासगी संस्थेने यंत्रणेची सोय केली आहे.

सह्याद्री डोंगररागांमधून वाहणाऱ्या काजळी नदीमध्ये अनेक वर्षांपासून ठिकठिकाणी दगड, माती साचली आहेत. नदीपात्र गाळाने भरून गेले असून कोंडीमध्ये पाणी साठत नाही. त्यामुळे नदीत बारमाही साठणाऱ्या पाण्यातील मासे पकडून त्यावर उदरनिर्वाह करणाऱ्यांचा रोजगार हिरावला आहे. ग्रामपंचातीसह ग्रामस्थांच्या लोकसहभागातून, सेवाभावी संस्था आणि जिल्हा प्रशासनाने ‘चला जाणू या नदीला’ अभियानांतर्गत गाळमुक्त काजळी नदी उपक्रम हाती घेतला आहे.

Kajali River
Sludge Remove Campaign : ‘घरणी’तील गाळ उपसा मोहिमेची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

या अंतर्गत किरबेट-भोवडेवाडी, शिपोशी येथील नदी खोलीकरणास सुरुवात झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून अशासकीय राज्य समिती सदस्य डॉ. सुमंत पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल जयराम कांबळे, रोहन रमेश इंगळे, सरपंच अस्मिता अडबळ, रेवती निंबाळकर, मनोज जायगडे, माधवी जायगडे, मुकुंद बाईंग आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने नदीतील गाळ काढण्याचे काम सुरू आहे.

Kajali River
River Sludge : शेतकऱ्यांने स्वखर्चाने काढला नदीपात्रातील गाळ

यंत्रणेच्या साह्याने काढलेला गाळ नदी काठापासून प्रवाहाच्या प्रभाव क्षेत्रात येणार नाही अशा ठिकाणी टाकण्यात येत आहे. यंत्रासाठी लागणारा इंधनाचा खर्च हा स्थानिक ग्रामस्थांनी संकलित केलेल्या निधीतून केला जातो. किरबेट परिसरातून सुमारे सात हजार आणि शिपोशीमधून तीन हजार घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. पाऊस पडेपर्यंत हे काम सुरू राहील, असे डॉ. सुमंत पांडे यांनी सांगितले.

नदी काठावर गॅबियन बंधारा

किरबेट येथे नदी काठावर गॅबियन बंधारा बांधण्याबाबत निर्णय झाला आहे. त्यासाठी आवश्यक जाळ्या लोकसहभागातून मिळविण्यात येणार आहेत. नदीपात्रातून काढलेले दगड, गोटे जाळ्यांमध्ये भरून त्यापासून हा बंधारा बनविण्यात येणार आहे.

पावसाळ्यात मोजकेच दिवस काजळी नदीला पूर येतो. गेली अनेक वर्षे नदीमध्ये गाळ, दगडगोटे साचले होते. पुढील दोन वर्षे नदीतून गाळ काढण्याचे काम करावे लागणार आहे. सध्या किरबेट, शिपोशीत चांगले काम झाले आहे. या कामामध्ये ग्रामस्थ आणि युवकांचा चांगला सहभाग आहे. काजळी नदीतील जैवविविधता अबाधित राहाण्यासाठी लोकसहभागातून आमचे प्रयत्न सुरू आहेत.
डॉ. सुमंत पांडे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com