डाळिंब पिकातील रोगांचे व्यवस्थापन

बदललेल्या वातावरणामध्ये डाळिंबावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यांच्या व्यवस्थापनासाठी उपाययोजना
डाळिंब पिकातील रोगांचे व्यवस्थापन
डाळिंब पिकातील रोगांचे व्यवस्थापन
Published on
Updated on

तेलकट डाग रोग तेलकट डागासाठी फळ पिकाच्या कालावधीत फवारणी (७ ते १० दिवसांच्या अंतराने) १) बोर्डो मिश्रण (बहार व्यवस्थापनात छाटणीनंतर फक्त अर्धा टक्के आणि विश्रांती काळात १ टक्के) त्यानंतर २) स्ट्रेप्टोमायसीन* ०.५ ग्रॅम किंवा २-ब्रोमो, २-नायट्रो प्रोपेन -१, ३-डायओल (ब्रोनोपोल) ०.५ ग्रॅम अधिक कॉपर ऑक्सीक्लोराइड किंवा कॉपर हायड्रॉक्साईड २ ते २.५ ग्रॅम प्रति लिटर अधिक स्प्रेडर स्टिकर ०.५ मि.लि.प्रति लिटर पाणी फळबागेत असलेल्या बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावानुसार ताम्रयुक्त (कॉपर) फॉर्म्युलेशनवर आधारित बुरशीनाशकात योग्य बदल केले जाऊ शकतात. या व्यतिरिक्त सॅलिसीलिक ॲसिडच्या ०.३ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे चार फवारण्या घ्याव्यात. सूक्ष्मअन्नद्रव्ये (एकत्रित) २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे ४ फवारण्या कराव्यात. तेलकट डाग रोगासाठी तातडीच्या फवारण्या हिरव्या लिंबाच्या अवस्थेतील फळांवर तेलकट डागाचा प्रादुर्भाव दिसताच, त्वरीत लवकरच ४ दिवसांच्या अंतराने पुढील एक किंवा दोन फवारण्या घ्याव्यात. १. स्ट्रेप्टोमायसीन ०.५ ग्रॅम अधिक २-ब्रोमो, २-नायट्रो प्रोपेन -१, ३-डायओल (ब्रोनोपोल) ०.५ ग्रॅम अधिक कोसाइड २ ग्रॅम अधिक स्प्रेडर स्टिकर ०.५ मि.लि. प्रति लिटर पाणी). २. स्ट्रेप्टोमायसीन ०.५ ग्रॅम अधिक २-ब्रोमो, २-नायट्रो प्रोपेन -१, ३-डायओल (ब्रोनोपोल) ०.५ ग्रॅम अधिक कार्बेंडाझिम १ ग्रॅम अधिक स्प्रेडर स्टिकर ०.५ मि.लि. प्रति लिटर पाणी टीप ः शिफारशीत मात्रेनुसार फक्त आवश्यक फवारण्या घ्याव्यात. पाऊस झाल्यानंतर अतिरिक्त फवारणी घ्यावी. बोर्डो मिश्रणाशिवाय अन्य फवारणीत नॉन आयोनिक स्प्रेडर स्टीकर वापरावे. प्रत्येक फवारणी करण्यापूर्वी सर्व जीवाणूजन्य डाग, रॉट प्रादुर्भावित फळे काढून जाळावीत. बोर्डो मिश्रण ताजे तयार करावे व त्याच दिवशी वापरावे. फवारण्या संध्याकाळी घ्याव्यात. विश्रांती कालावधीत (फवारणीमध्ये १०-१५ दिवसांचे अंतर.) १ टक्के बोर्डो मिश्रण किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड २ ते २.५ ग्रॅम किंवा कॉपर हायड्रॉक्साईड २ ते २.५ ग्रॅम अधिक स्प्रेडर स्टिकर ०.५ मि.लि. प्रति लिटर. डाळिंबामधील बुरशीजन्य स्कॅब, स्पॉट्स आणि रॉट्ससाठी काही उपयोगी बुरशीनाशके (फवारणी प्रमाण प्रति लिटर पाणी) मॅंडीप्रोपॅमिड (२३.४ % एससी) १ मि.लि. प्रोपिकोनॅझोल (२५% ईसीः १ मि.लि. अधिक ॲझोक्सीस्ट्रॉबिन १ मि.लि. ॲझॉक्सिस्ट्रोबिन (२०%) अधिक डायफेनोकोनॅझोल (१२.५% एससी) (संयुक्त बुरशीनाशक) २ मि.लि. बोर्डो मिश्रण ०.५% ट्रायसायक्लॅझोल (१८%) अधिक मॅन्कोझेब (६२% डब्ल्यूपी) २ ते २.५ ग्रॅम क्लोरोथॅलोनिल (७५% डब्ल्यूपी) २ ग्रॅम प्रॉपिकोनॅझोल १ मि.लि. क्लोरोथॅलोनील (७५ % डब्ल्यूपी) २ ग्रॅम प्रोपीकोनॅझोल १ मि.लि. टीप ः १. वरीलपैकी कोणत्याही २ बुरशीनाशकाच्या फुलधारणा आणि फळधारणेच्या कालावधीत १५ दिवसांच्या अंतराने फवारण्या केल्यास चांगला फायदा होतो. तसेच पुढील काळात अनेक फवारण्या टाळता येतात. २.बोर्डो मिश्रण वगळता सर्व फवारणीमध्ये स्प्रेडर स्टीकरचा वापर करावा ३. हंगामात ताम्रयुक्त बुरशीनाशकांशिवाय अन्य कोणत्याही कीडनाशकाचा वापर २ पेक्षा जास्त वेळा करू नये. बुरशीजन्य मर रोगाचे व्यवस्थापन फळ तोडणीनंतर ताणावर असताना किंवा पिकाच्या सुरुवातीच्या टप्प्यात ड्रेचिंगला प्राधान्य द्या. खालीलपैकी फक्त एक पद्धत वापरा. पहिली पद्धत :- १. प्रॉपिकोनॅझोल (२५ %) २ मि.लि. अधिक क्लोरपायरीफॉस २ मि.लि. प्रति लिटर (१० लिटर द्रावणाची ड्रेंचिग करावी. २. पहिल्या ड्रेचिंगच्या ३० दिवसानंतर अ‍ॅस्परजिलस नायजर ए एन २७ बुरशी ५ ग्रॅम प्रति झाड आणि २ किलो शेणखत. त्यानंतर ३० दिवसांनी व्हीएएम बुरशी (वेसिक्युलर आर्बस्क्युलर मायकोरायझा - राइझोफॅगस इररेगुलरिस) २५ ग्रॅम प्रति झाड आणि २ किलो शेणखत. किंवा दुसरी पद्धत : प्रॉपिकोनॅझोल (२५%) २ मि.लि. अधिक क्लोरपायरीफॉस २ मि.लि. (२० दिवसांच्या अंतराने ३ ड्रेचिंग करा.) किंवा तिसरी पद्धत : १. ड्रेचिंग - फोसेटिल ए एल (८०% डब्ल्यूपी) ६ ग्रॅम प्रति झाड (१० लिटर द्रावण) २. ड्रेचिंग - टेब्यूकोनॅझोल (२५.९% डब्ल्यू / डब्ल्यू ईसी) ३ मि.लि. प्रति झाड (१० लिटर द्रावण) ३. ड्रेचिंग - फोसेटिल ए एल (८०%) ६ ग्रॅम प्रति झाड ( १० लिटर द्रावण) ४. ड्रेचिंग - टेब्यूकोनॅझोल (२५.९%) ३ मिली प्रति झाड (१० लिटर द्रावण) वरील ड्रेचिंग २० दिवसांच्या अंतराने. अ‍ॅस्परजिलस नायजर ए एन २७ बुरशीचे फायदे १. अ‍ॅस्परजिलस नायजर या बुरशीचा वापर करून तयार केलेले जैविक किडनाशक आणि खत आहे. २.सूत्रकृमिसह मर रोगाच्या सर्व प्रकारच्या रोगकारक घटकांवर नियंत्रण ठेवते. ३. सर्व प्रकारच्या हवामानात, माती व पाणी परिस्थितीमध्ये कार्य करते. ४. पिकांसाठी उपयुक्त वनस्पती संप्रेरके सोडत असल्याने झाडाची वाढ, फुलधारणा, फळ उत्पादनाला प्रोत्साहन मिळते. ५.वनस्पतींमध्ये रोग व इतर ताणांसाठी प्रतिकार शक्ती वाढवते. ६.अ‍ॅस्परजिलस नायजर ए एन २७ बुरशी आणि व्हीएएम बुरशी (वेसिक्युलर आर्बस्क्युलर मायकोरायझा-राइझोफॅगस इररेगुलरिस) (यालाच पूर्वी ग्लोमस इंट्रारेडिस म्हणून ओळखले जाई.) यामध्ये एकरूपता आहे. ७. व्हीएएम बुरशी डाळिंबाच्या मुळांमध्ये स्थापित होते आणि पाण्याच्या ताण परिस्थितीत मदत करते. ८. दोन्ही बुरशी फॉस्फेट विरघळवणाऱ्या आहेत. सूत्र कृमींचा प्रादुर्भाव ताण अवस्था : बुरशीजन्य मर व्यवस्थापनामध्ये मुळांवर गाठी करणारे सूत्रकृमींचे (रूट नॉट नेमॅटोड्स) व्यवस्थापन करणेही महत्त्वाचे असते. सूत्रकृमीच्या व्यवस्थापनासाठी पर्यायी जैवफॉर्म्युलेशन उदा. पॅसिलोमायसिस किंवा ट्रायकोडर्मा यांचा वापर केला जाऊ शकतो. १. ॲझाडिरेक्टिन (१%) (१०००० पीपीएम) २ मि.लि. प्रति लिटर प्रमाणे ठिबक सिंचनाद्वारे द्यावे. २. प्रत्येक ड्रिपरच्या खाली ५-१० सें.मी. खोल असलेल्या खड्ड्यात फ्लुएनसल्फॉन (२% जीआर) ४० ग्रॅम प्रति झाड द्यावे. (१० ग्रॅम प्रति ड्रीपर) हलके पाणी द्यावे. ३. फ्लूओपायरम (३४.४८% एससी) २ मि.लि. प्रति झाड या प्रमाणे ड्रेंचिंग करावे. ड्रेंचिंग करण्यापूर्वी झाडांना पुरेसे पाणी देण्यात यावे. ०२१७-२३५००७४ दिनकर चौधरी, ९४०३३९०६२७ (राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com